आपल्या घरातचं अनेकदा अशी काही औषधंं उपलब्ध असतात की ज्यांच्यामुळे काही आजार घरच्याघरी बरे होऊ शकतात. मात्र आपल्याला त्यांच्या गुणधर्मांविषयी माहितीच नसते. त्यापैकीचं एक आहे तमालपत्र. तमालपत्र हे अनेक विकार आणि व्याधींवरचे रामबाण औषध आहे. याचं पत्राचा म्हणजे पानाचा वापर पूर्वीचे लोक औषध म्हणून करत असे. कालांतराने याचा वापर केवळ मासालाच्या पदार्थात केला गेला. मात्र त्या मागेही काही तरी तथ्य होते. त्यासाठीचं आज्जीच्या बटव्यामध्ये आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तमालपत्राच्या औषधी गुणधर्मांची माहिती.
तमालपत्राचा जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येतात.
भारतात तमालपत्र हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. तमालपत्रालाच दालचिनीची पाने म्हणतात. याचे शास्त्रीय Cinnamomum tamala असे आहे. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामुळे खाद्यपदार्थांची चव वाढवणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांपैकी हा एक प्रमुख घटक आहे. तसेच तमालपत्र खाणे एक अत्यंत फायद्याचे आहे.
औषधी उपयोग :
- सर्दी झाल्याने नाक बंद पडून, डोके व डोळे जड झाल्याने तमालपत्राचे बारीक चूर्ण नाकात फुंकले असता किंवा, एक-दोन शिंका येऊन नाक मोकळे व्हायला मदत मिळते.
- स्वयंपाकात तमालपत्राचा वापर नियमित केल्यास अन्नपचनाला मदत मिळते.
- सुगंधामुळे व रुची वाढवण्याचा गुण असल्यामुळे आणि श्वसनसंस्थेवर कार्य करत असल्याने च्यवनप्राश, वासावलेह, कंटाकार्यावलेह वगैरे अनेक औषधांत तमालपत्र वापरले जाते.
- तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील ज्या काही समस्या असतील तर तमालपत्रामुळे दूर होतात.
- चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कफ, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.
- ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. ते त्यांना अधिक लाभदायक आहे.
- तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. काही थेंब पाण्यात टाकून प्या.
- तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन प्यावे. किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर कमी करता येतात.
- जर तुम्हाला वेदना होत असतील तर तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो. डोके दुखत असेल. मान दुखत असेल तर तेलाने मसाज केल्याने त्याचा लाभ मिळतो.
- खायची इच्छा होत नसल्यास, पोटात जडपणा जाणवत असल्यास दोन चमचे लिंबाचा रस, चार चिमूट सैंधव मीठ व पाव चमचा तमालपत्राचे चूर्ण एकत्र करून थोडे थोडे चाटल्यास फायदा होतो.
अशाप्रकारे तमालपत्राचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मात्र यांचा उपयोग अनुभवी लोक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा.