आज्जीचा बटवा : जाणून घ्या नॅचरल बॅक्टेरियाचे आरोग्य आणि सौंदर्यासाठीचे फायदे….

0

नॅचरल बॅक्टेरिया…तुमच्यातील काही जणांना हे ऐकून नक्कीच काही प्रश्न पडले असतील. ते म्हणजे आज्जीच्या बटव्यात बॅक्टरीयाजचे काय काम? आम्ही तुम्हाला बॅक्टरीया बद्दल का सांगत आहोत? तर यात काही नवीन नाही. आज्जीच्या बटव्यात आम्ही तुम्हाला त्याच वनस्पती किंवा पदार्थांबद्दल सांगतो जे तुमच्या घरात सहजरित्या उपलब्ध असतात. हो…हो ठीक आहे. आम्ही तुम्हाला जास्त कोड्यात ठेवणार नाही. तुम्ही हा बॅक्टरीया घरी स्वतःच्या हाताने बनवू शकता. हा नॅचरल बॅक्टेरिया म्हणजे ‘दही’ होय. हो, आज आम्ही तुम्हाला दह्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत. दही भारतीय प्रत्येक घरात उपलब्ध असतो आणि दह्याला भारतीयांच्या जीवनात भरपूर महत्त्व देखील आहे. पूजेचे प्रसाद बनवण्यासाठी पण दह्याचा वापर केला जातो.

बर का मैत्रिणींनो, अस म्हणतात जिला दही बनवता येत नाही ती उत्तम गृहिणी नसते. तर करा थोडा परिचय आवडत्या दह्यासोबत…..

आंबवून घट्ट केलेल्या दुधाला दही असे म्हणतात.  दुधाचे दही तयार करण्यासाठी दुधात एखाद्या आंबट पदार्थाचे काही थेंब (विरजण) घालतात. घरगुती दही तयार करणे खूप सोपे आहे. त्यासाठी ज्या भांड्यात दही जमवायचे असेल त्या भांड्याला आतून घरात असलेल्या किंवा बाहेरून आणलेल्या आंबट दह्याचा पातळ लेप लावतात. त्यावर कोमट दूध ओततात व ते मिश्रण वरखाली करून चांगल्या प्रकारे एकजीव करतात. उबदार जागेत ठेवल्यावर भांड्यात ओतलेल्या दुधाचे दही बनते. दही बनवायच्या दुधातून तुरटीचा खडा फिरवलेला असल्यास दही निश्चितपणे घट्ट बनते. धातूच्या भांड्यापेक्षा सच्छिद्र मातीच्या भांड्यात दही अधिक चांगले बनते.

भारतीयांच्या उन्हाळ्यातल्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे. रायते, ताक, कढी किंवा कोशिंबीर इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी दही वापरतात. दह्याचे आरोग्यास बरेच फायदे आहेत. दही पचायला खूप सुलभ असते. ज्यांना दूध पचत नाही त्यांना दही पचते. दही हे प्रोबायोटिक म्हणून कार्य करते. दही खाल्ल्याने प्रतिकारशक्ती सुधारते. तसेच मजबूत हाडे आणि दातांसाठी, निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी ते फायदेशीर आहे .

आरोग्यदायी उपयोग :

पोट ‘भरल्याचे’ समाधान टिकून राहते

दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

भरपूर प्रथिनांनी युक्त आहार

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते.

ऊर्जेने युक्त आहार

दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकीनंतरचा थकवा त्वरित निघून जातो. दही आणि साखर खाल्ल्याने काम शक्ती वाढते. नपुंसकत्व कमी होण्यास मदत होते.पुरुष बीजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते.

प्रतिकारशक्ती वाढते

दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.

मधुमेह नियंत्रित राहतो

दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तागांची खाज कमी होते.

पचन क्रिया सुधारते​

दही पचायला हलके आहेच. तसेच दह्यामुळे जठरातील आणि आंतड्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते, जेणेकरून जड अन्न देखील सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही.

हृदय विकाराची शक्यता कमी होते​.

दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यता कमी होते. रक्त दाब नियंत्रित राहतो.

जीवनसत्वानी परिपूर्ण

विटॅमिन बी ५, बी १२ सारख्या जीवन सत्वानी परिपूर्ण असलेने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जा संस्था निरोगी राहते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ‘ड‘ मुळे दात आणि हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते.

आतड्यांचे आरोग्य सुधारते

लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोट नियमित साफ होते.

चेहरा,त्वचा उजळते

चेहऱ्यावर,त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

केसांसाठी उपयुक्त

तीस मिनिटांपर्यंत केसांना दही लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुतल्यास केस मऊ आणि रेशमी बनतात. मेंदी सोबत लावल्यास परिणाम आणखी वाढतो. दह्यातून काळी मिरी पावडर आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो. केसांच्या मुळांना दही आणि बेसन लावल्याने केस गळती कमी होते.

हे पण वाचा

आज्जीचा बटवा : स्मरणशक्ती वाढवणाऱ्या बदामाचे ‘हे’ सुद्धा आहेत फायदे, जाणून तुम्हीही व्हाल थक्क

आज्जीचा बटवा : पानपुड्याची शोभा वाढवणारा ‘ओवा’ आहे आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे…

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.