आज्जीचा बटवा ! जाणून घ्या कॅॅन्सरला शह देणाऱ्या कडूलिंबाचे महत्व
आरोग्यासाठी गुणकारी कडुलिंब हा सर्वांच्या ओळखीचा वृक्ष आहे. कडुलिंबाची पाने औषधी गुणधर्मांसह समृध्द आहेत. आपल्या घराशेजारी, रस्त्यावर शोधायचे म्हटल्यास कुठेही अगदी सहजपणे तुम्ही कडुलिंबाच्या झाडांची पान काढू शकता. जसे कडुलिंब औषधीय गुणधर्मांनी समृद्ध आहे, तसेच सौंदर्यासाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. या वृक्षाला धार्मिक महत्त्व देखील आहे.
चला तर मग जाणून घेऊयात कडुलिंबाचे फायदे…
कडुलिंब पाकिस्तान , भारत , नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे. या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडुलिंब किंवा बाळंतलिंब किंवा नीम म्हटले जाते. या झाडामुळे प्रदूषण होत नाही. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Azadirachta indica असून हा वृक्ष Meliaceae फॅमिलीमधील आहे.
कडुलिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव ‘कडूलिंब’ असे आहे. या झाडाची पाने , फळे , बिया, साल, मुळे सर्चव कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे ‘जंतुघ्न’ हा याचा गुणधर्म पशु-पक्षी , पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो.
कडुलिंबाच्या झाडाची सावली थंड वाटणारी असते. त्या सावलीत असणारे घर उन्हाळ्यात थंड असते. कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. कडुलिंबाच्या लाकडाचा वापर इमारती व पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो.
धार्मिकरित्या या वृक्षाचे महत्त्व :
मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडवा या दिवशी होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा आहे. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे , मिरे, सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात. हिंदूंचे नवीन शालिवाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुलिंबाचे सेवन करण्यास सांगितले आहे.
औषधी उपयोग
कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.
- कडुलिंबाची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळ्यात प्राशन केल्याने उन्हाचा त्रास होत नाही.
- काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो, सडसडीत माणसे सडसडीतच राहतात.
- कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते.
- मुळव्याध व पोटातील कृमींवर उपयोगी आहे.
- मधुमेह या रोगामध्ये कडुलिंब अतिशय ऊपयुक्त आहे.
- यक्रुत विकारांमधे नीम त्याच्या कडू रसाने काम करत असतो. रोज अर्धा कप नीम रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.
- कडूलिंबामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकचा हानिकारक प्रभाव थांबवू शकतात, त्यामुळे शरीरामध्ये कॅन्सर होण्याचा धोका टळतो. त्याशिवाय कडूलिंब हृदयरोगासाठीही रामबाण इलाज आहे.
- मलेरियाच्या उपचारासाठी याचा फायदा होतो. डॉक्टरदेखील मलेरिया झाला असल्यास, कडूलिंब खाण्याचा सल्ला देतात.
- तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे युरिन इन्फेक्शन झाल्यास, तुम्ही कडूलिंबाचं सेवन केलंत तर तुम्हाला लवकरच आराम मिळेल. त्यासाठी रोज सकाळी उठून कडूलिंबाची 4 ते 5 पानं चावून खा.
- कडूलिंब दात आणि हिरड्यांच्या आजारांपासून तुम्हाला दूर राहण्यास मदत करतं
- कडूलिंबामध्ये असलेल्या अँटिफंगल तत्वामुळे फंगल इन्फेक्शन ठीक होते
- याचं सेवन केल्यामुळे अल्सर आणि बद्धकोष्ठ, पोटातील मुरड आणि सूज यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.
- तुमच्या कानामध्ये दुखत असेल तर कडूलिंबाच्या तेलाचा वापर केल्यास, फायदेशीर ठरेल.
सौंदर्यासाठी उपयोग
कडुलिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते.
- या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.
- साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.
- चेहऱ्यावरील तेल काढून टाकण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. कडूलिंबाची पानं वाटून त्यामध्ये दही आणि लिंबाचा रस मिसळून एक जाडी पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर 20 मिनिट्स ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा.
- यामध्ये एक औषधीय गुण हा पण आहे की, तुमच्या चेहऱ्यावर अजिबात डाग पडू देत नाही आणि चेहऱ्यावर उजळपणा वाढतो.
- काही कडूलिंबाची पानं आणि गुलाबाची पानं एकत्र गुलाबजल मध्ये वाटून घ्या. ही तयार झालेली पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर साधारण 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा आणि सुकल्यानंतर पाण्याने साफ करा. आठवड्यातून तुम्ही 2 वेळा असं केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यासहन मदत होते तर डागविरहित आणि मुलायमदेखील होते.
- वास्तविक कडूलिंबामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग जाण्यासाठी मदत होते. त्वचेचं रक्षण करण्यास याची मदत होते.
- कडूलिंबामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण आढळतात, ज्यामुळे तुम्ही याला स्काल्प क्लीनर म्हणून वापर करू शकता.
- तुमच्या केसांमध्ये उवा अथवा कोंड्याची समस्या असेल तर, कडूलिंबाची पानं उकळून घ्या आणि ते पाणी केस धुवायला वापरा.
- एकदा कडूलिंबाच्या तेलाचा वापर करून पाहा. हे तेल तुमच्या स्काल्पवर लावल्यास, इन्फेक्शन काढून टाकतं, त्यामुळे केसगळती बंद होते. कडूलिंबाच्या तेलाचा नियमित वापर केल्यास, केस लवकर वाढतात.