फुफ्फुसाचा स्टेज 3 कॅॅन्सर असा आहे भयावह, उपचारानंतर जगण्याची असते आशा
सिने अभिनेता संजय दत्त याला अचानक तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅॅन्सर झाल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. तिसऱ्या स्टेजला जाई पर्यंत हा आजार कळला कसा नाही, असा प्रश्न आपणा सर्वांना पडला असेल. नेमका हा फुफ्फुसाचा कॅॅन्सर आहे तरी काय ? आणि त्याचे निदान होईला वेळ तरी कसा लागला. याबाबत थोडी जुजबी माहिती आम्ही देत आहोत.
काय आहे फुफ्फुसाचा स्टेज 3 कॅॅन्सर ?
फुफ्फुस हा आपल्या शरीराचा अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे, परंतु आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीराच्या या भागाचे आयुष्य कमी झाले आहे. तज्ञांच्या मते, जगभरातील सुमारे 40 टक्के लोक फुफ्फुसांच्या कॅॅन्सरने ग्रस्त आहेत आणि जेव्हा कॅॅन्सर प्रगत अवस्थेत पोहोचतो तेव्हा त्यांच्यामध्ये हा आजार आढळतो. यातील एक तृतीयांश फुफ्फुसाचा कॅॅन्सर स्टेज 3 पर्यंत पोहोचतो.
असे आहेत प्रकार…
80 ते 85% फुफ्फुसाच्या कॅॅन्सर हा नॉन-स्मॉल सेल आणि स्मॉल सेल या दोन प्रकारात होतो. या दोन्ही प्रकारच्या फुफ्फुसांच्या कॅॅन्सरवर वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले जातात. स्टेज 3 फुफ्फुसांचा कॅॅन्सर बरा होण्यासारखा आहे परंतु कॅॅन्सरचा टप्पा, उपचार योजना आणि व्यक्तीचे सर्वांगीण आरोग्यासह अनेक घटकांवर अवलंबून आहे.
3 स्टेजला नेमकं काय होते ?
जेव्हा फुफ्फुसांचा कॅॅन्सर 3 स्टेजला जातो तेव्हा त्या व्यक्तीच्या फुफ्फुसाभोवती असलेल्या ऊती किंवा लिम्फ नोड्सयांना तो शिकार बनवतो. स्टेज 3 फुफ्फुसांच्या कर्करोगाची विस्तृत श्रेणी दोन गटांमध्ये विभागली गेली आहे, स्टेज 3 ए आणि स्टेज 3 बी. स्टेज 3 ए आणि स्टेज 3 बी दोन्ही ट्यूमरच्या आकार, स्थान आणि लिम्फ नोडच्या आधारे विभाजित आहेत.
ही असतात लक्षणे
फुफ्फुसाच्या कॅॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्या व्यक्तीस कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तथापि, लक्षणे दिसू शकतात, जसे की अचानक सौम्य खोकला किंवा धूम्रपानानंतर खोकला बदलणे. खोकताना रक्त येणे. या गोष्टी जर घडत असतील तर त्या फुफ्फुसाच्या कॅॅन्सरच्या संंबंधित असू शकतात. तसेच श्वास घेण्यास त्रास, श्वास लागणे, छातीच्या क्षेत्रामध्ये वेदना, श्वास घेताना घरघर, आवाज बदल, अनावश्यक वजन कमी होणे, हाड दुखणे, डोकेदुखी ही देखील लक्षणे कॅॅन्सरची असू शकतात.
असा असतो उपचार…
स्टेज 3 कॅॅन्सर फुफ्फुसांच्या उपचारात, केमोथेरपी आणि रेडिएशन नंतर शक्यतो शक्य तितक्या शस्त्रक्रियेद्वारे ट्युमर काढून टाकला जातो. स्टेज 3 बी साठी सामान्यत: शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली जात नाही. जर डॉक्टरांना शस्त्रक्रिया ट्यूमर काढून टाकणे शक्य होत नसेल तर ते उपचारांचा पहिला कोर्स म्हणून रेडिएशन किंवा केमोथेरपीची शिफारस करु शकतात.
जगण्याची शक्यता
स्टेज 3 कॅॅन्सर झाल्यानंतर यातून वाचण्याची शक्यताही आहे. पण हा आजार उशिरा निदान झाला तर ती शक्यता कमी आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहिती नुसार स्टेज 3 A मधील व्यक्ती 5 वर्ष जगू शकते. तर हा दर 36 % आहे. तेच स्टेज 3 B कॅॅन्सर झालेल्या व्यक्तीचा जगण्याचा दर सुमारे 26 टक्के आहे. मात्र व्यक्ती स्टेज 3 C मध्ये असेल तर तिचा वाचण्याचा दर 1% आहे.
हे पण वाचा
अगदी सोपं : घरच्या घरीचं माउथवॉश बनवा आणि तोंडाची दुर्गंधी घालवा
आज्जीचा बटवा : फोडणीत तडतडणाऱ्या लसणाचे औषधी गुणधर्म एकदा वाचाचं