आज्जीचा बटवा : सगळ्या शारीरिक व्याधींवर मात करतो पुदिना, जाणून घ्या फायदे

0

प्रत्येक छोट्या मोठ्या आजरांवर आज्जीबाईच्या बटव्यामध्ये अजून एक औषधी वनस्पती उपलब्ध आहे. ती म्हणजे पुदिना. पुदिना अगदी सहजतेने आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकणारी वनस्पती आहे. पुदिना बाजारात देखील विकायला आणतात. औषधी गुणांमुळे अनेक औषधांमध्ये आणि टॉनीक्समध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिना औषधी सोबतच सौंदर्याच्या अनेक प्रसाधनांमध्येही असतो.

चला तर या बहुउपयोगी वनस्पती बद्दल घेऊयात थोडी अधिक माहिती

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव Mentha viridis असे  आहे . ही वनस्पती लॅमिएसी (Lamiaceae) फॅमिलीमधील आहे. तुळस व सब्जा या वनस्पतीदेखील याच फॅमिलीमध्ये समाविष्ट आहेत. जगात सर्वत्र मेंथा प्रजातीच्या १३–१८ जाती असून भारतात मेंथा अर्व्हेन्सिस याव्यतिरिक्त आणखी ५ जाती आढळतात. पुदिना ही मूळची यूरोप, पश्‍चिम व मध्य आशिया येथील असून ती आफ्रिका, ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिका यांच्या लगतच्या प्रदेशांमध्ये आढळते. ती सुगंधित असून वेगवेगळ्या बाबतीत उपयुक्त असल्याने बागेत आणि शेतात तिची लागवड केली जाते.

पुदिन्याचे झुडूप असते. जमिनीलगत किंवा जमिनीखाली फुटलेल्या फांद्यांनी ते पसरते. पाने साधी, समोरासमोर, अंडाकृती किंवा लंबगोल असतात. पानांचा रंग गडद हिरवा असून त्यांच्या कडा दंतुर असतात. तळाची पाने काहीशी केसाळ किंवा केशहीन असतात. फळे लहान, कठीण व गुळगुळीत असतात. फळांमध्ये बिया असतात.

औषधी उपयोग

 • पुदिन्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.
 • पुदिना उत्तेजक, वायुनाशी असून पोटदुखी, अर्धशिशी, सांधेदुखी, बद्धकोष्ठ, अतिसार, पोटांतील व्रण व सर्दी अशा विकारांवर गुणकारी आहे.
 • पाने स्वयंपाकात स्वादाकरिता वापरतात.
 • चहा, सरबते, जेली, कँडी, सूप आणि आइसक्रीम यांत पानांचा सुगंध मिसळतात. काही पेयांना सुगंध देण्यासाठी मिंट तेल वापरतात.
 • गांधील माश्या, मुंग्या व झुरळे यांचा नाश करण्यासाठी पुदिन्याचे तेल कीटकनाशकांमध्ये मिसळतात.
 • पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल (चरबी ) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात, तसेच याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात.
 • जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या. यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.
 • जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.
 • सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ घाला. ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.
 • जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.
 • मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा. दिवसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.
 • जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून घेऊन लावा. यामुळे जखम लवकर नीट होईल.
 • जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजा पुदिन्याची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्या आणि हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाल असेल तिथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.
 • जर आपल्या तोंडाला वास येत असेल तर पुदिन्याची पाने घ्या त्यांना सुकवून घ्या आणि त्याचा चूर्ण बनवा. याचा तुम्ही मशेरी सारखा वापर करा. हे केल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतील आणि तोंडाची दुर्गंध बंद होईल, असे तुम्ही एक महिन्याहून अधिक काळासाठी करा आपल्याला याचा फायदा नक्की होईल.
 • पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.
 • उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे फायदे:- कधी कधी गरमीच्या दिवसात अस्वस्थ तसेच घाबरल्या सारखे होते. त्यासाठी काही पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा आणि ते पाणी गार झाल्यावर प्या, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल.
 • कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसा सोबत मिसळवून प्यायल्याने आराम मिळतो.

सौंदर्यासाठीचे फायदे

 • चेहर्‍यावरील मुरुम किंवा पुरळ बॅक्टेरियामुळे होते. पेपरमिंटमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. यासह ते मुरुमे बरे करण्यात प्रभावी आहे.
 • पेपरमिंटमध्ये व्हिटॅमिन ए असते. ते त्वचेवर तेल येण्यास प्रतिबंध करते आणि तेलकट त्वचेमुळे होणार्‍या मुरुमांना प्रतिबंध करते.
 • पेपरमिंटमध्ये जळजळ कमी करण्याची क्षमता देखील आहे.
 • पेपरमिंट त्वचा हायड्रेट करण्यास मदत करते. यामुळे आपली त्वचा गुळगुळीत आणि चमकदार बनते.
 • यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात. जे आपल्या त्वचेवर उपचार करतात आणि ते ताजे ठेवतात. केळी घ्या आणि मॅश करा. त्यात थोडासा पेपरमिंट घाला आणि पेस्ट चेहर्‍यावर लावा. ही पेस्ट सुमारे 20 मिनिटे चेहर्‍यावर राहू द्या आणि नंतर ती धुवा. तुम्हाला चमकणारी त्वचा मिळेल.
 • ग्राइंडरमध्ये पुदीनाची पाने, काकडी आणि थोडे मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट अर्ध्या तासासाठी चेहर्‍यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे टॅनिंग कमी होते.
 • पेपरमिंट डार्क सर्कल्स काढून टाकण्यास देखील मदत करते. पुदीनाची पाने काकडीच्या रसामध्ये बारीक करा आणि डार्क सर्कल्सवर लावा. ते १५ मिनिटांनंतर धुवा.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.