fbpx
1.1 C
London
Thursday, February 9, 2023

मुंबई मेड मास्कला अमेरिकेने दिली मान्यता, 99.99% व्हायरस मास्कवरचं होणार नष्ट

कोरोनाच्या संक्रमणात मास्क घालणे हे अनिवार्य असल्याने आता बाजारात अनेक प्रकारचे मास्क येण्यास सुरवात झाली आहे. त्यात आता मुंबईमध्ये एका स्टार्ट अप कंपनीने बनवलेले मास्क हे केवळ कोरोना पासून बचावचं करत नाही तर कोरोनाचा देखील खात्मा करत असल्याची बातमी समोर आली आहे तर या मास्कला अमेरिकेच्या प्रयोगशाळेने देखील सुरक्षित असल्याची पावती दिली आहे. दै. लोकमतने याबाबतची माहिती प्रसिध्द केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील स्टार्टअप थरमॅसेंसने हा मास्क तयार केला आहे. कंपनीला नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर करून कोरोना किलर मास्क बनविण्यात यश आले आहे. या मास्कची खास बाब ही आहे की, या मास्कचा वापर केल्यावर मास्कवर लागलेल्या कोरोना व्हायरस ड्रापलेट्सने संक्रमण पसरण्याचा धोकाही पूर्णपणे दूर होतो. तसेच इतर विषाणूंपासूनही हा मास्क तुमचे संरक्षण करू शकतो.

या मास्कबाबत दावा केला जातोय की, हा मास्क ना केवळ कोरोना व्हायरसला शरीरात जाण्यापासून रोखतो तर मास्कच्या वरील भागावर चिकटलेल्या व्हायरसला नष्ट करण्याचं कामही करतो. या मास्कबाबत विश्वास वाढलाय कारण या मास्कला भारतीय लॅबसहीत अमेरिकेतील लॅबनेही मंजूरी दिली आहे.

हा मास्क तयार करणाऱ्या एक्सपर्ट्सनी सांगितले की, हा मास्क ज्या कापडापासून तयार केलाय, त्यात नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. हा मास्क वापरल्याने केवळ कोरोनापासूनच नाही तर इतरही प्रकारच्या व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट होतील. अमेरिकन लॅबनुसार मुंबईत तयार केलेला मास्क 5 मिनिटात साधारण 93 टक्के कोरोना व्हायरस नष्ट करतो. तर एक तासात याने 99.99 टक्के व्हायरस नष्ट होतात.

हे मास्क धुवून पुन्हा वापरता येऊ शकतो. जर तुम्ही हाताने हा मास्क धुवूत असालं तर किमान 150 वेळा या मास्काचा पुनर्वापर करता येऊ शकतो. तर मशीनमध्ये धुत असाल तर मास्क 100वेळा वापरू शकता. हा मास्क बाजारात 300 ते 500 रूपयाला असेल.

या स्टार्टअप कंपनीने दावा केला आहे की, त्यांच्याकडून तयार केलेल्या मास्कला International Organization for Standardization (आयएसओ) प्रमाणित अमेरिकन प्रयोगशाळा आणि भारतात National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories(NABL) कडून उत्पादनासाठी तसेच वापरासाठी मान्यता मिळाली आहे.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here