fbpx
5.1 C
London
Tuesday, December 6, 2022

आज्जीचा बटवा : हिंदीत जावित्री आणि मराठीत जायफळ असणाऱ्या मसाल्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे…

जायफळ हे मसाल्याचे पदार्थ आहे. जायफळ भारतात प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे. आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. म्हणून आजीच्या बटव्यात आम्ही तुम्हाला फक्त औषधी वनस्पतीसोबतच नाही तर मसाल्यांशी देखील ओळख करून देतो.

गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं. आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं काम जायफळ करतं. जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं. म्हणूनच डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो. सोबतच पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं. चला तर घेऊयात जाणून घेऊयात जायफळचे औषधीय गुण…

त्याआधी जायफळच्या झाडासोबत एक छोटासा परिचय…

जायफळ चे शास्त्रीय नाव Myristica fragrans मायरिस्टिका फ्रॅग्रन्स असे आहे. इंग्रजीमध्ये जायफळला nutmeg असे म्हणतात. वनस्पतिशास्त्रानुसार जायफळ हे मायरिस्टिका प्रजातीत मोडणाऱ्या अनेक जातींच्या वृक्षांसाठी योजले जाणारे नाव आहे. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची जात म्हणजे ‘मायरिस्टिका फ्रॅग्रन्स'(Myristica fragrans)होय. ही जात मूळची इंडोनेशियातील मोलुक्का द्वीपसमूहातील बांदा बेटांवरची आहे. जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात.

जायपत्रीपासून बनविलेल्या तेलास “जावंत्रिका तेल’ (बांडा साबू) म्हणतात. बाजारात याच्या साबणासारख्या वड्या मिळतात.

औषधी उपयोग

 • जायफळ कफवातशामक, शोथहर, वेदनास्थापन, उत्तेजक, कुष्ठघ्न, दुर्गंधीनाशक व वातशामक आहे.
 • झोपताना तुपात उगाळलेल्या जायफळाचा लेप मस्तकावर लावल्याने शांत झोप लागते.
 • डोकेदुखीत दुधात उगाळून जायफळाचा मस्तकावर लेप लावावा.
 • पोटदुखी, मोडशी, जुलाबात भाजलेल्या जायफळाची पूड, दूध वा पाण्यातून कैफ येईल इतक्याच प्रमाणात घ्यावी.
 • डोकेदुखी तसेच बाळंतपणातील कंबरदुखीत पाण्यात किंवा दारूत उगाळून लेप करतात.
 • तुपात उगाळलेल्या 1 ग्रॅम जायफळाच्या लेपात 2 थेंब मध व 2 चिमटी खडीसाखर पूड घालून दिवसातून तीन वेळा घेतल्याने अतिसारास आराम पडतो.
 • जायफळ भाजून तितकाच गूळ घालून 1/1 ग्रॅमच्या गोळ्या बनवून दर 10 मिनिटांनी 1/1 गोळी जुलाब थांबेपर्यंत घेत जावी. फार लवकर आराम पडतो.
 • राईच्या तेलात जायफळाचे तेल मिक्स करून मालीश करण्याने बरेच दिवसाचे जखडलेले सांधे मोकळे होतात.
 • अतिसारात जायफळ उगाळून बेंबीवर लेप लावतात.
 • चर्मरोगावर जखम लवकर सुकण्यासाठी जायफळ पाण्यात उगाळून लेप लावावा.
 • पाव जायफळाचे चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्याने चांगली झोप लागते.
 • कापसाच्या बोळ्यात पूड घालून दाताखाली धरण्याने दातातील कीड मरते व ठणका थांबतो.
Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here