आज्जीचा बटवा : पानफुटी ही देखील एक औषधी वनस्पती, ‘या’ आजारांचा करते नायनाट

0

पर्णफुटी/ पानफुटी या औषधी वनस्पतीचे नाव शहरी कमीत कमी लोकांना माहित असेल. ग्रामीण भागात पानफुटी ही वनस्पती सहज आढळते. स्मॉल टाऊन मधील लोकांच्या घरात आणि बगिच्यात ही वनस्पती आढळते. पानफुटी ही एक औषधी वनस्पती आहे हे देखील फार कमी लोकांना माहिती असेल. मात्र पोटाच्या आजारावर घरगुती उपचार म्हणून आजीबाईच्या बटव्यात ही वनस्पती नक्की असते. चला तर जाणून घेऊयात या सहज उपलब्ध असलेल्या पण तुम्हाला माहिती नसलेल्या औषधी वनस्पती बद्दल….

पानफुटीला इंग्रजीत कॉमन असलेले नाव आहे ‘लाईफ प्लांट’. पानफुटी ही क्रॅसुलेसी फॅमिलीमधील भरपूर वर्ष टिकणारी वनस्पती आहे. पानफुटी वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘ब्रायोफायलम पिनॅटम’ असे आहे. पानफुटी ‘कलांचो पिनॅटा’ या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. तसेच पानफुटीला ‘कॅथेड्रल बेल्स’, ‘एअर प्लांट’ अशीही नावे आहेत. पानफुटी मूळची आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील वनस्पती आहे. पानफुटीची लागवड कुठेही सोप्या व सहज प्रकारे होत असल्यामुळे तिचा प्रसार जगात सर्वत्र झाला आहे. कमी पाणी असलेल्या जागी पानफुटी शोभेकरिता लावतात. ही महाराष्ट्रातील सर्व डोंगरांत व बागांत आढळते.

पानफुटी १- १·५ मी. उंच वाढते. खोड साधारण चौधारी, लालसर व पोकळ असते. तिला खूप पाने असतात. पाने गडद हिरवी व मांसल असतात. पानांच्या कडांवर बेचक्यांत असलेल्या मुकुलांपासून नवीन पाने फुटतात, म्हणून या वनस्पतीला ‘पानफुटी’ म्हणतात. फुलोरा खोडाच्या टोकाला येत असून फुले घंटेप्रमाणे लोंबती असतात. ती लहान व फिकट गुलाबी असतात. पाने तोडून खाली टाकली असता त्यांच्या किनारीपासून नवीन रोपे उगवतात.

पानफुटीचे औषधी उपयोग:

  • पाने कडू असतात. पाने थोडी गरम करून जखमा, गळवे, सूज, कापणे, खरचटणे, विषारी कीटकदंश इत्यादींवर लावतात.
  • पानांचा रस अतिसाकर, आमांश, पटकी आणि मुतखडा ह्या विकारांवर दुप्पट लोण्याबरोबर देतात.
  •  पाने रक्तस्तंभक (रक्तस्राव थांबविणारी), जंतुनाशक, स्तंभक (आकुंचन करणारी) असतात.
  • संधिवात, उच्च रक्तदाब आणि दाह यांसारख्या व्याधींवरील अनेक पारंपरिक औषधांमध्ये पानफुटी वनस्पती वापरतात.
  • भारतात पानफुटीच्या पानांचा रस मूत्राशयाच्या व‍िकारांवर देतात.
  • अर्बुदाची वाढ रोखण्यासाठी तसेच कीटकनाशक म्हणूनही पानफुटीचा वापर होतो.
  • ही वनस्पती व्रणशोधक, व्रणरोपक व रक्तवर्धक औषधी आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.