आज्जीचा बटवा: केसांसाठी लाभदायी असणाऱ्या रिठाचे असे आहेत इतरही फायदे…

0

रिठा या औषधी वनस्पतीबद्दल शहरातील लोकांना माहिती असणे कठीण आहे. कारण ही वनस्पती ग्रामीण भागाकडे जास्त उपयोगात येते. आजच्या काळात ग्रामीण भागात देखील सर्व जीवन वेगाने असल्यामुळे, तिथे पण ही वनस्पती उपयोगात येत असेल याबद्दल शंका आहे. पण रिठ्याची पावडर आता बाजारात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध असते. खास केसांसाठी या पावडरचा वापर केला जातो. आज्जीच्या बटव्यामध्ये आज आपण या रिठा औषधी वनस्पती बद्दलच जाणून घेणार आहोत. चला तर करूयात छोटासा परिचय रिठा औषधी वनस्पतीसोबत….

रिठा हा पानझडी वृक्ष सॅपिंडेसी फॅमिलीतील असून त्याचे शास्त्रीय नाव सॅपिंडस ट्रायफोलिएटस आहे. लिची व बकुळ या वनस्पतीही सॅपिंडेसी फॅमिलीतील आहेत. रिठा वनस्पती मूळची भारतातील असून तीची  लागवड पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांत केली जाते. याखेरीज शोभेकरिताही तिची लागवड करतात. सह्याद्री परिसरात तीची सॅ. लॉरिफोलियस ही जात आढळते. मात्र सॅ. ट्रायफोलिएटस आणि सॅ. लॉरिफोलियस ही एकाच वनस्पतीची नावे आहेत, असे वैज्ञानिकांचे मत आहे. भारतात रिठ्याची सॅ. मकेरोसी ही आणखी एक जाती आढळते. ती मूळची चीनमधील असून उत्तर भारतात लागवडीखाली आहे.

इतर उपयोग

 • रिठ्याचे लाकूड कठीण, जड आणि पिवळसर रंगाचे असते. ते बांधकामासाठी आणि बैलगाड्या तयार करण्यासाठी वापरतात.
 • बियांपासून रोपे तयार करता येतात. रस्त्याच्या कडेला सावलीसाठी, उद्यानात लावतात.
 • -शोभेसाठी आणि वनशेतीसाठी रिठा हा एक उपयोगी वृक्ष आहे.
 • रिठ्याच्या फळांचा उपयोग मुख्यत: मळ काढण्यासाठी होतो. त्यात सॅपोनीन वर्गातील संयुगे असतात. ही संयुगे पाण्यात विरघळणारी ग्लायकोसाइडे आहेत.
 • रिठ्याची फळे पाण्यात घुसळल्यास त्यांतील सॅपोनिने फेस तयार करतात. म्हणून त्यांचा उपयोग साबणासारखा केला जातो.
 • लोकरी, रेशमी आणि नाजूक व तलम सुती कपडे धुण्यासाठी रिठे वापरतात. हल्ली त्यांचा उपयोग वॉशिंग पावडरमध्ये सुद्धा करतात.
 • सोन्याचे दागिने स्वच्छ व चकचकीत करण्यासाठी आणि साबण, शाम्पू व टूथपेस्ट बनविण्यासाठी

कीटकनाशकांमध्ये रिठ्याची फळे वापरली जातात. मूळ व फळे आयुर्वेदिक आणि युनानी उपचार पद्धतींत औषधे म्हणून उपयोगात आणली जातात.

औषधी वनस्पती

 • दमा, अर्धशिशी, सांधेसूज, विंचुदंश इ. विकारांवर फळे गुणकारी मानतात.
 • पोटात कृमी झाल्याने लहान मुलांचे पोट सतत दुखत राहते. अशा वेळी पाव ग्रॅम रिठ्याचे टरफल गुळातून घाटवल्यास कृमी पडून जातात.
 • कफ चिकटून राहत असल्यास तोंडात रिठा धरून थोडा थोडासा गिळत राहिल्यास कफ पातळ होतो आणि पडून जातो.
 • मनुष्य फेफरे येऊन पडल्यास रिठे उकळवलेले पाणी नाकात सोडणे हा उत्तम उपाय आहे.
 • कोणत्याही प्रकाराचे विष पोटात गेले तर रिठ्याचे पाणी प्यायला द्यावे. यामुळे उलटी होते आणि विष उतरते.
 • मसालायुक्त शिकेकाई करताना रिठे वापरले जातात. त्यामुळे नैसर्गिक कंडिशनरचे काम होते.
 • रिठे पाण्यात भिजवून ते चांगले कुस्करून पाणी अंगाला चोळल्यास अंगावर पित्त उठण्याचा त्रास कमी होतो.
 • अकस्मात मूत्र कोडले असता खारकेची बी आणि रिठ्याची बी पाण्यात उगाळून ओटीपोटाच्या सभोवती लेप लावावा आणि शेक द्यावा. यामुळे लघवी साफ होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.