fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

कोरोनाला हरवण्यासाठी बाजारात आला सॅनिटायझर पेन, तब्बल 3 तास करणार संसर्गापासून संरक्षण

जगभरात कोरोनाने थैमान घातले असल्याने आता कोरोनावर मात करणारी साधन बाजारात मोठ्या प्रमाणत येत आहेत. याआधी सॅनिटायझर, मास्क, आणि ग्लोजची मागणी वाढली असल्याने बाजारात नवनव्या पद्धतीचे मास्क आणि ग्लोज आले होते. त्यात आता सॅनिटायझरचा पेन देखील आला आहे. लिहिताना हातांना कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून हा पेन वापरला जाऊ शकतो.

कोरोनाच्या संकटात सॅनिटायझरची गरज लक्षात घेता लखनौमध्ये सॅनिटायझर पेन तयार करण्यात आला आहे. साधारण तीन तास या सॅनिटायझर पेनमुळे संरक्षण करता येईल असा दावा पेन तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे.

नेमका काय आहे सॅनिटायझर पेन ?

लिहिताना आपल्या हाताला कागदाचा स्पर्श होतो त्यामुळे या कागदावर जर कोरोनाचा विषाणू असेल तर त्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. यासाठी जर हा सॅनिटायझर पेन तुम्ही वापरत असाल तर तुमच्या हाताला कोणताही संसर्ग होणार नाही. या पेनमध्ये सॅनिटायझर असल्याने तब्बल तीन तास याचा असर राहतो.

काय म्हणतात पेनचे निर्माते ?

मेडिशिल्ड हेल्थकेअरचे डॉ. फराज हसन यांनी या पेनबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सॅनिटायझरचा फारसा वापर हा याआधी होत नव्हता. मात्र आता ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. प्रत्येकाच्या गरजाही वेगळ्या आहेत. एक व्यावसायकि म्हणून आम्हाला त्यांची काळजी आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटायझर ठेवतो. तसाच हा सॅनिटायझर पेन आहे. हा खास असलेला सॅनिटायझर पेन विद्यार्थी आणि ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयोगाचा आहे” असं हसन यांनी म्हटलं आहे.

कंपनीमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटायझरचं उत्पादन केलं जात आहेत. 50 मिलीपासून 5 लीटरपर्यंत सॅनिटायझर उपलब्ध आहे. यामुळे पैशाच्या नोटा, चावी यांच्यासारख्या अनेक वस्तू वेगळ्या सॅनिटायझरने स्वच्छ करता येऊ शकता अशी माहिती दिली आहे.

दरम्यान जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा रोज नव्याने वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या एक कोटीच्या वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे लाखो लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तर आता जगातील अनेक औषध कंपन्या कोरोनावर लस शोधत आहेत. तर सध्या काही लोकल कंपन्या बाजारत जास्त ताकदीचे सॅनिटायझर्स बाजारात आणत आहेत.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here