fbpx

#Corona : जगाला जमलं नाही ते रशियाला कसं जमलं ? कोरोना लसवर शास्त्रज्ञ घेतायत शंका

0

रशियाने मंगळवारी कोरोना लस बनवली असल्याचा दावा केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीला या लशीचा डोस देऊन ही जगातील पहिली कोरोन लस असल्याची घोषणा केली. मात्र रशियाच्या लसीबाबत अनेक संशोधक आणि देशांनी प्रश्न उपस्थित केले आहे. ही लस खरंंच इफेक्टिव आहे का ? तसेच ही लस बनवताना सर्व मापदंडाचा योग्य पद्धतीने वापर केला आहे का ? असे प्रश्न जगातील अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहेत.

फुफ्फुसाचा स्टेज 3 कॅॅन्सर असा आहे भयावह, उपचारानंतर जगण्याची असते आशा

रशियाने कोरोना लसीची अधिकृत नोंदणी केल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. याबाबत दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की या लसीच्या सुरक्षिततेच्या पैलूची चौकशी करणे आवश्यक आहे. आपल्याला रशियन लस किती सुरक्षित आणि प्रभावी आहे ते पहावे लागेल. सेफ म्हणजे याचा कोणतेही दुष्परिणाम होऊ नये. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लस किती प्रभावी आहे हे पाहावे लागेल, जर लस या दोन्ही निकषांची पूर्तता करत असेल तर ती लस ग्राह्य धरली जाऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका आणि जर्मनी यांनीही रशियाच्या लसीवर शंका उपस्थित केल्या आहेत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की रशिया या लसीशी संबंधित आवश्यक माहिती सामायिक करत नाही. जगभरात 100 पेक्षा जास्त लस बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न वेगवेगळ्या देशांमध्ये केले जात आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, जगात किमान चार लसांच्या अंतिम आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.

अगदी सोपं : घरच्या घरीचं माउथवॉश बनवा आणि तोंडाची दुर्गंधी घालवा

भारतातही दोन लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.एक लस भारत बायोटेकची आहे तर दुसरी लस जायडस कॅडिलाची आहे. मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही लस बनविण्याची घोषणा केली. ते म्हणाले की कोरोना लसीला नियामक मान्यता देणारा रशिया हा पहिला देश आहे. ही लस राष्ट्रपती पुतीन यांच्या मुलींना देण्यात आल्याचेही रशियाने म्हटले आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी चाचणी घेतल्यानंतर या लसीचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रशियाने असेही म्हटले आहे की यामुळे रशियाची वैज्ञानिक क्षमता दिसून येते. रशियाने या लसीला ‘स्पुतनिक 5’ असे नाव दिले आहे. पुढील महिन्यापासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

ही लस घाईघाईने आणली आहे, त्यामुळे सुरक्षिततेच्या पैलूविषयी शंका आहे. तथापि, रशियाने अशी भीती फेटाळून लावली आहे. लस तपासणीचे निकाल लवकरच जाहीर केले जातील असे त्यांनी म्हटले आहे. लसीची कार्यक्षमता आणि त्याच्या सुरक्षिततेशी संबंधित तपास सुरू राहील. लसी बनवण्याच्या सुरक्षेच्या निकषांपेक्षा रशियाने राष्ट्रीयत्वाला प्राधान्य दिल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आज्जीचा बटवा : फोडणीत तडतडणाऱ्या लसणाचे औषधी गुणधर्म एकदा वाचाचं

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.