आज्जीचा बटवा ! केसां व्यतिरिक्त ‘या’ समस्याही दूर करते शिकेकाई, तुम्हीही घ्या जाणून

0

सध्याच्या काळात बाजारात सर्व सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. त्यामुळे घरगुती वस्तू वापरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. पण आम्हाला खात्री आहे की, लहानपणी तुम्ही केसांसाठी ‘शिकेकाई’ या औषधी वनस्पतीचे नाव नक्की ऐकले असणार. जर वनस्पती बद्दल ऐकले नसणार तर आधी केस धुण्यासाठी शिकेकाई साबण येत होती, याबद्दल तर तुम्हाला नक्की माहिती असेल. चला तर मग जाणून घेऊयात शिकेकाई औषधी वनस्पतीबाबत

शिकेकाई ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या शेंगा कुटुन डोक्यास लावतात. बाभूळ, खैर व हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणांत सारखेपणा आढळतो. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया रुगेटा हे आहे. ह्या वनस्पतींच्या अ‍ॅकेशिया ह्या प्रजातीतील एकूण 700 जातींपैकी भारतात फक्त 25 आढळतात.

औषधी वनस्पती :

शिकेकाई ही एक औषधी वनस्पती आहे. त्यामुळे त्याचे अनेक फायदे आहेत.

  • कोवळ्या पानांची चटणी (मीठ, चिंच व तिखट घालून केलेली) अथवा पाने काळ्या मिरीबरोबर खाण्यास काविळीवर चांगली असतात.
  • पानांचा रस आंबट व सौम्य रेचक असून हा हिवतापावर गुणकारी आहे. शिकेकाईच्या शेंगांचा काढा पित्तनाशक, कफोत्सारक, वांतिकारकवर उपयोगी असतो.

आयुर्वेदामध्ये शिकेकाईला भरपूर महत्त्व आहे. केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी शिकेकाईचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये योग्य पद्धतीनं याचा समावेश केल्यास तुमचे केस लांबसडक, घनदाट आणि मऊ होतील. शिकेकाईमध्ये ल्युपॉल, स्पिनॅस्टरॉल, लॅक्टॉन यासारखे घटक आहेत.

हे घटक केसांच्या वाढीसाठी पोषक आहेत. यामुळे केसांचे दुभंगणेही कमी होते. शिवाय केस चमकदार होतात. पण तुम्हाला माहिती आहे का ? केसांप्रमाणेच त्वचेसाठीही शिकेकाई लाभदायक आहे. खाज सुटणे, त्वचा लाल होणे, कोरडी होणे इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त आहे.

शिकेकाईचे त्वचेसाठी फायदे :

  • शिकेकाईची पूड पाण्यात उकळून स्नानाकरिता वापरतात.
  • त्वचा कोरडी पडत नाही. रेशमी व गरम कपडे आणि डाग पडलेली चांदीची भांडी व उपकरणे धुण्यास ती पूड चांगली असते.
  • शिकेकाईची पूड घालून केलेले मलम त्वचारोगांवर लावतात.
  • चीनमध्ये व जपानात मूत्रपिंडाच्या व मूत्राशयाच्या विकारांवर शेंगा वापरतात.
  • खरुज सारख्या त्वचा विकारांवर शिकेकाई रामबाण उपाय आहे. गरम पाणी आणि हळद एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा. यानंतर शिकेकाईची पावडरही त्यात मिक्स करा. हळद, शिकेकाई नीट एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये दूध मिक्स करा. आता या मिश्रणाचा अँटी सेप्टिक बॉडी वॉशच्या स्वरुपात उपयोग करा. यामुळे खरुजची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
  • भरपूर उपाय केल्यानंतरही बऱ्याचदा मुरुमांचे डाग कमी होत नाही. पण यासाठी तुम्ही एकदा शिकेकाईचा वापर करून पाहा.
    दोन चमचे शिकेकाई पावडर, एक चमचा दूध, बदाम पावडर, हळद आणि दोन चमचे मध मिक्स करा. आता हे मिश्रण बॉडी स्क्रब प्रमाणे वापरा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते. त्वचेवरील मृत पेशींची समस्या कमी होईल. ज्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येईल.
  • शिकेकाईमध्ये अँटी बॅक्टेरिअलचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.
    एका वाटीमध्ये एक चमचा शिकेकाई पावडर, एक चमचा हळद, मध एकत्र घ्या आणि याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. नियमित या पेस्टनं आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करा. या स्क्रबचा वापर केल्यास तुम्हाला महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरण्याची आवश्यकता भासणार नाही.

शिकेकाईचे केसांसाठी फायदे:

  • केसातील दारुणा व उवा यांचा त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते.
  • केसांना नैसर्गिक काळा रंग हवा असल्यास आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर एकत्र घ्या आणि त्याचा लेप केसांवर लावा.
    हे मिश्रण एक तास केसांमध्ये राहू द्यावे. यानंतर कोमट पाणी आणि शॅम्पूच्या मदतीनं केस स्वच्छ धुन घ्या. महिनाभर हा उपाय करा. तुमचे केस लांब आणि जाड होतील. शिवाय केसांचे तुटणे, केस गळतीचीही समस्या कमी होईल.
  • एक चमचा शिकेकाई पावडर आणि दोन चमचे दही एकत्र घ्या. हा लेप मुळांसह केसांना लावा. एक तास लेप केसांना लावून ठेवा.
    यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. सकारात्मक परिणामांसाठी एक महिनाभर हा उपाय करावा. दह्यामुळे कोरड्या केसांची समस्या कमी होती.
  • शिकेकाईमध्ये सॅपोसिएअन हे नैसर्गिक द्रव्यं असतं, ज्यामुळे फेस तयार होतो आणि केस स्वच्छ होतात. -शिकेकाई हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे. शिकेकाईच्या वापरानं केसांचा तेलकटपणा जातो, तसंच केस कोरडेही होत नाहीत. शिकेकाईचा वापर उन्हाळ्यात खूपच प्रभावी ठरतो. त्यामुळे डोक्याला थंडावा मिळतो.

इतर उपयोग:

  • खोडाची साल ही मासे पकडण्याची जाळी व दोर रंगविण्यास आणि त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यास वापरतात.
  • हळद व शिकेकाईची पाने यांपासून हिरवा रंग मिळतो.
  • गुरांना विषबाधा झाल्यास शिकेकाई बियांसह ताकात वाटून पाजावी.

हे पण वाचा

…म्हणून कोरोना करतोय डायबेटीसच्या रुग्णांची शिकार, ‘हे’ आहे कारण

तुम्हाला माहिती आहे का ? ‘हे’ पदार्थ खाल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात

एकदा करून बघा! असाही होतो केस आणि त्वचेसाठी भेंडीचा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.