आपल्या बगिच्यातील कोरफडचे जाणून घ्या महत्व : आरोग्यासाठी गुणकारी तर सौंदर्यासाठी फायदेशीर

0

आपल्या प्रत्येकाच्या बगिच्यामध्ये कोरफड ही वनस्पती उपलब्ध असते. ‘शो’साठीचं का असे ना, पण कोरफड ही वनस्पती बगिच्यामध्ये, कुंड्यांमध्ये जवळ जवळ प्रत्येक घरात, प्रत्येक गॅलरीमध्ये असते. या वनस्पतीचा कुणी वापर करतात आणि कुणी फक्त ‘शो’साठी ही वनस्पती उपयोगात आणतात.

कोरफडचे आरोग्यासंबंधित, सौंदर्यासंबंधित अनेक उपयोग सगळ्यांना माहिती आहेत पण बरेचसे उपयोग असे पण आहेत. जे लोकांना अजिबातच माहित नाहीत. चला तर मग जाणून घेवूयात  ‘कोरफड’चे महत्व…

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा यामुळे आपले शरीर नेहमी स्वस्थ राहील अशी खात्री मिळते. हिच्यापासून ‘कुमारी आसव’ हे परंपरागत आयुर्वेदिक औषध तयार करतात.

लिलिएसी फॅमिलीतील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘अ‍ॅलो वेरा’ असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. दक्षिण भारतात ही वनस्पती रानटी अवस्थेतही आढळते. वेस्ट इंडीजमध्ये ती मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे. कोरफडीचे खोड आखूड असून तिची मुळे खूप खोलवर रुजलेली नसतात. पाने मांसल, गुच्छासारखी एकत्र, एकाआड एक, मुळापासून निघालेली असतात, बिनदेठाची, टोकांवर व कडांवर काटे असलेली पानंं असतात. फिकट हिरव्या पानांवर पांढरे  ठिपके असतात.

औषधी उपयोग

 • कोरफडीची पाने औषधी आहेत. त्यांचा आसव करण्यासाठी उपयोग करतात.
 • पाने भूक वाढविणारी ( दीपक ), रेचक, कृमिनाशक व शामक आहेत.
 • तसेच ही पाने कडवट, थंडावा देणारी आणि डोळे, यकृत, श्वासनलिका इत्यादींच्या विकारांवर व ज्वरामध्ये उपयुक्त आहेत.
 • पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे, असे दिसून आले आहे.
 • कोरफडीच्या गरामध्ये ए, बी 1, बी 6, बी 12 अशा अनेक व्हिटॅमिन्सचा समावेश आहे. या गरासोबत मध व हळद पूड एकत्र करून घेल्यास कफ, खोकला, सर्दी व घशाचे अन्य विकार समूळ नष्ट होतात.
 • लहान मुलांच्या कफावर कोरफड फार उत्तम गुण देते.
 • कोरफडीचा एक ते दीड चमचा रस साखर घालून नियमितपणे घेतल्यास शरीरात स्वस्थ होते.
 • मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.
 • सांधेदुखी आणि अंगदुखीने पीडित असणार्‍यांनी कोरफड रसाचे सेवन केल्यास आराम मिळतो. यामुळे शरीरात अँटीबॉडीज घटक आणि पांढर्‍या रक्तपेशी निर्मिती होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सूज कमी होण्यास मदत होते. -मुक्का मार लागलेल्यावर देखील कोरफड उपयुक्त ठरते.
 • मूत्रपिंडाशी संबंधित संसर्गात (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) कोरफड जेल गुणकारी ठरतो.एखाद्याला अशी समस्या असल्यास कोरफडीच्या ताज्या जेलमध्ये पाणी आणि साखर मिक्स करून रस तयार करावा. हा रस पिल्यास संसर्गाची समस्या दूर होते. सोबत लघवीवेळी होणारी जळजळ देखील कमी होते.
 • मायग्रेनने डोकेदुखी होत असल्यास कपाळावर कोरफड जेल लावावा. लगेच आराम मिळतो.
 • पोटदुखी होत असल्यास कोरफडीच्या गरावर थोडेसे मीठ टाकून खाल्ल्यास पोटाला आराम मिळतो.
 • रोज बारीक ताप, भूक न लागणे, वजन कमी होत जाणे, थकवा वाढत जाणे यावर मध आणि पिंपळी चूर्णातून कोरफड रसाचा खूपच चांगला उपयोगा होतो.
 • नाकातून वारंवार रक्त येणे, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणे, रक्ताच्या गाठी, खाज -खरूज- फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफडीचा उपयोग होतो.
 • डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानेही खूप उपयोग होतो.

सौंदर्यासाठीचे उपयोग

 • कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो.
 • चेहर्‍याच्या सौदर्यप्रसाधनांत, तसेच केस धुण्याच्या शँपूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात.
 • जळालेल्या किंवा चटका बसलेल्या भागावर तत्काळ कोरफडीचा ताजा गर लावल्यास फोड येत नाहीत, त्वचा पूर्वीसारखी होते.
 • कोरफड वनस्पती ई जीवनसत्वाने समृध्द आहे. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. आपल्या ओठांवर कोरफड जेल लावा. जर तुम्हाला हवं असेल तर कोरफड जेलमध्ये थोडंस ऑलिव्ह तेल मिसळून लिप बामसारखं ही वापरू शकता.
 • जर सकाळी उठल्यावर तुमचे डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असल्यास कोरफडीचा वापर केल्यावर सगळं ठीक होईल. डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला कोरफड जेल लावायला सुरुवात करा. कित्येक अंडर आय क्रीम्समध्ये कोरफडीचा वापर केला जातो.
 • जर तुम्हाला वॅक्सिंग, थ्रेडींग आणि प्लकींग केल्यानंतर लालसर चट्टे किंवा पिंपल्स येत असतील तर हे बरं करण्यासाठी तुम्ही कोरफड त्यावर नक्की वापरून पहा.
 • कोरफडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा (Hydrate) राहते तेही कोणत्याही चिकटपणाशिवाय. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड उत्तम आहे.
 • हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते. यावर रामबाण उपाय म्हणजे कोरफड होय. कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायजरसारखा करून त्वचेला मसाज करा. हे जेल तुम्ही नखांना ही लावू शकता. हे जेल नखांनासुध्दा मॉइश्चरायज करून मजबूत आणि चमकदार बनवेल.
 • कोरफडाने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते, केसांतील कोंडा जातो, स्कॅल्पच्या समस्या दूर होतात आणि केसांचे चांगले पोषण ही होते.
 • कोरफडाच्या दोन पानांचा गर काढा. त्यामध्ये लिंबाचा रस घालून हे मिश्रण चांगलं फेटून घ्या. आता हलक्या हातांनी ओल्या केसांवर लावा. मग गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने 15 ते 20 मिनिटं केस बांधा. आता थोडे गरम पाणी आणि शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा असं केल्यास केस दाट, मऊ आणि सुंदर होतात.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.