fbpx
2 C
London
Thursday, February 9, 2023

पोटाचे स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी उपयोगी आहेत ‘हे’ मसाले, प्रत्येक सिझनमध्ये करा सेवन

आपले पोट बरोबर असले की, जवळजवळ संपूर्ण शरीर बरोबर असते आणि यामुळे कोणत्याही रोगाचा आपल्याला त्रास होत नाही. मग ते शरीराच्या कोणत्याही भागाशी जोडलेले असो. चला प्रत्येक मौसमात या पोटाचे आरोग्य कसे टिकवायचे ते जाणून घेऊयात. तसेच त्या मसाल्यांबद्दल जाणून घ्या, जे प्रत्येक हंगामात आपल्या आहारात वापरुन आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतात.

  • तमालपत्र

तमालपत्र  एक मसाला आहे ज्याचा वापर आपण हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्याच्या तीनही हंगामात करू शकता. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. रक्त शुध्दीकरणात मदत होते. अन्नाची चव आणि सुगंध देखील याने वाढते.

  • केशर

आपल्या देशात केशर मुख्यतः खीर व इतर मिठाई बनवण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर, केशर असलेले दूध पिण्याचीही परंपरा आहे. आपल्या देशातील केशर प्रामुख्याने काश्मीरमध्ये वापरला जातो. केशर हा एक अत्यंत महागडा मसाला आहे, म्हणूनच याचा वापर खूप मर्यादित प्रमाणात केला जातो. परंतु केशर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केशरमध्ये कर्करोग प्रतिरोधक घटक असतात. केशर आपल्या स्मरणशक्ती आणि आपल्या त्वचेचा ग्लो वाढविण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

  • लवंग

लवंगमध्ये अँटीव्हायरस, अँटीफंगल आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. भाज्या, कडधान्ये इ.मध्ये कमी मात्रेने लवंगचे नियमित सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे.

  • जायफळ

जायफळ पोटात गॅस तयार होण्याच्या समस्येपासून मुक्त करते. पाचक प्रणाली ठीक ठेवते. मर्यादित प्रमाणात जायफळाचे नियमित सेवन केल्यास आतड्यांशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

हे पण वाचा

आज्जीचा बटवा ! केसां व्यतिरिक्त ‘या’ समस्याही दूर करते शिकेकाई, तुम्हीही घ्या जाणून

…म्हणून कोरोना करतोय डायबेटीसच्या रुग्णांची शिकार, ‘हे’ आहे कारण

तुम्हाला माहिती आहे का ? ‘हे’ पदार्थ खाल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here