नेहमीचं उत्साहात दिसणाऱ्या सनी लिओनीचा असा आहे फिटनेस; फॉलो करा तिचे डेली रुटीन

0

सनी लिओनीला बॉलिवूडची फिट अभिनेत्री मानले जाते. आई झाल्यानंतरही ती तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेत आहे. हेच कारण आहे की, तिचे चाहते आजही तिच्या नैसर्गिक सौंदर्य आणि परिपूर्ण व्यक्तीमत्त्वाबद्दल वेडे आहेत.

ती नेहमी फिट दिसते, त्यामागे तीची हेल्दी लाइफस्टाइल आणि डाएट प्लॅन हे मुख्य कारण आहे. यामुळेचं आजही तिच्या चेहऱ्यावरची चमक कायम आहे. जर आपणही तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे चाहते असाल आणि तिच्यासारखी फिगर हवी असेल तर सनी लिओनीचे फिटनेस सीक्रेट फॉलो करा.

सनी लिओनीला दररोज सकाळी सुमारे 20-30 मिनिटे चालणे आवडते. यामुळे तिला चांगले आणि सकारात्मक वाटते. हा बदल हवा असल्यास तुमच्या रुटीनमध्ये मॉर्निंग वॉकचा समावेश करा, कारण सकाळची ताजी हवा आरोग्यासाठी चांगली असते. सनीच्या रोजच्या रूटीनमध्ये सायकलिंगचा देखील समावेश आहे. ती रोज फिटनेससाठी सायकलिंग करते. यामुळे शरीर फिट राहते आणि ब्रेन पावर देखील वाढते. आपण देखील स्वत: ला फिट ठेवू इच्छित असल्यास आपल्या रोजच्या रूटीनमध्ये सायकलिंगचा समावेश करा.

आई झाल्यानंतरही सनी लिओनी पूर्णपणे फिट आहे, तर यामागचे रहस्य आहे स्क्वाट्स एक्सरसाईझ. आपल्या शरीराची चरबी कमी करण्यासाठी ती दररोज ही एक्सरसाईझ करते. यामुळे तिचे शरीर आकारात राहते. आपण देखील आपल्या शरीराला आकारात ठेवू इच्छित असल्यास हे व्यायाम करावे.

स्वत: ला फिट ठेवण्यासाठी सनी दररोज नारळाचे पाणी पिते. यामुळे तिच्या चेहर्‍याची चमक कायम राखण्यास मदत होते. याशिवाय, ती दमदार राहण्यासाठी दररोज दूध पिण्यास विसरत नाही. तिला दररोज दूध पिण्यास आवडते.

हे पण वाचा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.