fbpx
6.3 C
London
Sunday, December 4, 2022

‘या’ विशेष गुणधर्मामुळे भारतीय मानवी जीवनात हळदीला आहे विशेष स्थान

‘हळद’ ही औषधी गुणधर्मांनी भरपूर असलेली एक वनस्पती आहे. आजीबाईच्या बटव्यामध्ये ही औषधी वनस्पती म्हणजे महत्त्वाचा घटक होय. इतकेच नाही तर हळदीच्या गुणधर्मामुळे तिला इंग्रजी ‘फर्स्ट एड बॉक्स’ मध्ये देखील स्थान मिळालेले आहे. जखमेवर प्रथमोपचार हळदीने करावे, असे लोक आवर्जून म्हणतात. आजी नेहमी हळदीचा दूध प्यायला लावते. इतकेच नाही तर भारतातील काही प्रांतात स्त्रिया हळदीने स्नान देखील करतात. जसे हळदीचे औषधी गुणधर्म आहेत, तसेच सौंदर्यासाठी साठी देखील हळदीचा वापर केला जातो. हळदीचे असे फायदे वरवर सगळ्यांनाच माहिती आहेत. पण या लेखामुळे हळदीच्या अनेक गुणांसह तुम्ही परिचित होणार आहात.  चला तर मग करूयात गुणकारी असलेल्या ‘हळदी’ सोबत ओळख….

‘हळद’ या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून केला जात आहे. ही जंतुनाशक वनस्पती असून बारमाही आहे.

ही वनस्पती आल्याच्या प्रजातीची आहे. याच्या मूळ्यांच्या गाठीत हळद मिळते. आयुर्वेदात प्राचीन काळापासून हळदीला एका चमत्कारिक द्रव्याच्या रूपात मान्यता मिळाली आहे. औषधी ग्रंथांमध्ये हळदीला हरिद्रा, कुरकुमा लौंगा, वरवर्णिनी, गौरी, क्रिमिघ्ना योशितप्रीया, हट्टविलासनी, हरदल, कुमकुम, टरमरीक असे नाव दिले गेले आहेत.

हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतीय स्वयंपाकघरात हळदीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. तसेच भारतात धार्मिक रूपात देखील हळदीला शुभ मानले जाते. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. लग्नामध्ये हळदीचा एक वेगळा कार्यक्रमच ठेवतात.

बाजारात मिळणारी ‘हळद पूड’ किंवा ‘हळकुंड’ ज्यापासून काढतात ती औषधी मूळची ‘इंडोमलाया व चीनमधील’ असून उष्ण प्रदेशांत सर्वत्र लागवडीत आहे. भारतामध्ये हळदीची लागवड मुख्यत्वेकरून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू , ओडिशा, बिहार, महाराष्ट्र, आसाम व केरळ या राज्यांत होते. तसेच पश्चिम बंगाल, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांतही थोड्याफार प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते.

भारतामध्ये हळदीच्या मुख्यतः दोन जातींची लागवड करतात. त्यांपैकी एका जातीची हळकुंडे कठीण व भडक पिवळ्या रंगाची असतात . ती ‘लोखंडी हळद’ म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. दुसऱ्या जातीची हळकुंडे जरा मोठी, कमी कठीण व सौम्य पिवळ्या रंगाची असतात. त्यांचा उपयोग मुख्यतः मसाल्याचा पदार्थ म्हणून होतो. तिसरी जात रानहळद असून भारतात ती जंगली अवस्थेत वाढताना आढळते. तिची पश्चिम बंगाल व दक्षिण–मध्य केरळमध्ये लागवड करतात. या हळकुंडांना कापरासारखा वास असून त्यांचा औषधी म्हणून उपयोग करतात. मार लागलेल्या आणि लचकलेल्या अवयवांना तिचा लेप लावतात. चौथी जाती आंबेहळद असून तिच्या हळकुंडांना आंब्याच्या कैरीसारखा वास असतो. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व कोकण या ठिकाणी जंगली अवस्थेत ती आढळते.

औषधी गुणधर्म

हळदीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

 • हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.
 • दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते.
 • जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो.
 • हळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, कफ झाले असेल तर “हळदीचे दूध” त्यावर रामबाण उपाय आहे. निद्रानाशाची समस्यादेखील कमी होते.

हळदीच्या दुधाचे फायदे :

 • अनेक आजारांपासून रक्षण
  हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा एक घटक आढळतो. यामुळेच हळदीला तिचे औषधी गुणधर्म प्राप्त होतात. करक्यूमिन मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. संशोधनानुसार आपल्या आहारात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर आजार होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर या दुधामध्ये दालचिनी आणि आल्याचा वापर करावा. या पदार्थांकडे देखील मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत.
 • मूड सुधारण्यासाठी फायदेशीर
  हळदीच्या दुधात करक्यूमिन या घटकाचे प्रमाण जास्त असते हे आपण अगोदरच पाहिले आहे. काही संशोधनानुसार या घटकामुळे ताण तणावाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
 • हळदीचा आपल्या आहारात पर्याप्त वापर केल्यास त्यामुळे पोटातील वायूचे त्रास कमी होतात आणि अल्सरच्या तक्रारीही मर्यादित राहतात.
 • शरीरातल्या रक्ताच्या गुठळ्या होण्यावर हळद हे गुणकारी औषध आहे. रक्तवाहिन्या ताठ होणे किंवा निबर होणे यावर हळद उपयुक्त असते. म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या आणि रक्तवाहिन्या सक्त होणे यामुळे होऊ शकणार्‍या विकारांवर हळद गुणकारी ठरते.
 • हळदीच्या प्राशनाने प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग तसेच काही प्रकारचे संधिवात टाळता येतात.
 • शरीरातील इन्सुलीनची पातळी राखता यावी यासाठी हळद उपयुक्त ठरते. म्हणजेच मधुमेही रुग्णांनाही हळदीचा फायदा होतो.
 • हळद हे नैसर्गिक ऍन्टिसेप्टिक आहे. त्यामुळे जखम भरून येण्यास तिचा उपयोग होतो आणि पचन संस्थेला सुद्धा हळद उपयुक्त ठरते.

हळदीचे सौंदर्यासाठीचे फायदे

 • हळद, ताजी साय, गुलाबजल यांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि काही  मिनीटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. ज्यामुळे चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो.
 • बेसण, दही, हळद पावडर आणि पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर चेहरा धुवून टाका असे नियमित केल्यास तुमचा चेहरा नितळ आणि फ्रेश दिसेल.
 • चेहऱ्यावरील केस दिसू नयेत यासाठी तुम्ही ब्लिचिंग करता. मात्र सतत ब्लिचिंग केल्यामुळे त्यातील केमिकल्समुळे तुमच्या  चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते. शिवाय चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठीदेखील हळद तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. यासाठी हळदीत कोमट नारळाचं तेल टाकून एक फेस पॅक तयार करा. चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा आणि काही मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. नियमित असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी होण्यास मदत होईल.
 • हळद, दूध आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागेल. दहा ते पंधरा मिनीटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर हाताच्या बोटांनी हलका मसाज करून कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
 • जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदन पावडर, हळद आणि संत्र्याचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि तुमची त्वचा नितळ आणि मऊ दिसेल.
 • पायांच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर कधी कधी त्यातून रक्त येऊ लागतं. अशा वेळी पायांच्या टाचांना हळद आणि नारळाचं तेल एकत्र करून लावा. ज्यामुळे तुमच्या टाचांना आराम मिळेल.
Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here