#BeAware : ‘या’ पदार्थांचे सेवन करत असाल तर थांबा, नाहीतर तुमचा लिव्हर होईल खराब

0

तुमची जीवनशैली तुमच्या आरोग्यावर परिणाम करते याबद्दल काहीच शंका नाही. तरीही आपण बर्‍याचदा अशा सवयींकडे दुर्लक्ष करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर आणि शरीराच्या अवयवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यकृत (लीव्हर) हा शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. जर पोटात अनेकदा अस्वस्थता येत असेल तर पोटदुखी, अन्नाचे पचन कमी होणे, पिवळी लघवी होणे इत्यादी वाईट यकृताची (लिव्हरची) लक्षणे आहेत.

यकृत निरोगी राहण्यासाठी आपण स्वतःला काही विशिष्ट पदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे. तसेच निरोगी आहारासह व्यायामाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनविला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला त्या अन्नाबद्दल सांगू जे खाण्याने तुमच्या यकृतला नुकसान होऊ शकते.

मद्यपान

अल्कोहोल घेण्याच्या सवयीमुळ यकृत शरीरातून हानिकारक पदार्थ नष्ट करण्याची क्षमता गमावते. कारण यकृत अल्कोहोलमध्ये असलेल्या हानिकारक घटकांवर कार्य करण्यासाठी बहुतेक क्षमता वापरतो त्यामुळे इतर पदार्थ शरीरात साठून राहतात त्याचा तोटा शरीराला होतो.

फ्रेच फ्राईज

आजकाल मुले आणि तरुणांमध्ये फ्रेच फ्राईज खाण्याचा ट्रेंड वाढतो आहे. जो त्यांच्या यकृत खराब करण्यासाठी कार्य करतो. यात रिफाइंड कार्बोहायड्रेट आणि सॅॅचुरेटेड फैटचे प्रमाण जास्त असते जे यकृत वाढवते व तुम्हाला याचा त्रास होतो.

चीज बर्गर

यकृतासाठी हे अजिबात स्वस्थ नाही. रेस्टॉरंट्समधून तयार केलेले चीज बर्गरमध्ये सैचुरेटेड फैटची मात्रा जास्त असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, चीजमध्ये असलेल्या प्राण्यांच्या चरबीमुळे यकृताची हानी होते आणि हृदयरोगांनाही प्रोत्साहन मिळते.

औषधांचे सेवन

जास्त प्रमाणात औषधांचा सेवन केल्याने तुमच्या यकृताची हानी होते आणि यकृत निकामी होण्यासही ते जबाबदार असतात. याव्यतिरिक्त, आरोग्य पूरक पदार्थांचे जास्त सेवन केल्याने यकृत खराब होऊ शकते.

पास्ता आणि पांढरा ब्रेड

परिष्कृत धान्यासह बनवलेल्या पदार्थांमध्ये साखर जास्त प्रमाणात असते. पांढरी ब्रेड, पास्ता, पिझ्झा आणि बिस्किटे परिष्कृत धान्यांपासून बनवतात आणि त्या खाल्ल्याने यकृतातील चरबीचे प्रमाण वाढते आणि फॅटी यकृत रोग होण्याची शक्यता वाढते.

मनुका

अल्प प्रमाणात मनुका खाणे चांगले आहे, परंतु जर आपण ते अधिक खाल्ले तर हे आपल्या यकृताचे नुकसान करते. त्यात साखर आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते आणि जर आपण ते उकळवून खाल्ले तर ते अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.