आज्जीचा बटवा : मुखशुद्धीसाठी असलेली विलायची आहे अधिक गुणकारी, जाणून घ्या फायदे….

0

मुखशुद्धी साठी बडीशेप खण्यासोबतच विलायची खाणे देखील लोक पसंत करतात. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. बडीशेप,ओवा, सुपारी यासोबत विलायची देखील पानपुड्याची चांगली शोभा वाढवते. इतकेच नव्हे, तर विलायची अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठीही कामाला येते. चहामध्ये छान सुगंध येण्यासाठी वेलचीचे टरफले टाकतात. वेलचीचा वापर एक मसाल्याचा पदार्थ म्हणून देखील केला जातो.

वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत. या वेलचीचे फक्त एवढेच उपयोग नाहीत तर आरोग्य आणि सौंदर्यासाठी अनेक उपयोग आहेत. चला तर जाणून घेऊयात विलायचीचे आरोग्यदायी उपयोग….

  • वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी वेलची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून तुमची सुटका करते.
  • तीन वेलची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते.
  • वेलचीमध्ये एक अँटीबॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एक वेलची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या.
  • एसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.
  • वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर एसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते.
  • खोकला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात वेलची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.

(टीप: मात्र वरील उपचारांमध्ये विलायचीची मात्रा किती असावी यावर तज्ज्ञांच्या सल्ला घ्या.)

हे पण वाचा

केव्हा आणि कशी द्यावी बाळाला हळद ? घ्या जाणून…

आज्जीचा बटवा : मधाळ ‘मधा’मध्ये सुद्धा आहेत अनेक औषधीय गुण, जाणून घ्या कोणते….

आज्जीचा बटवा : जाणून घ्या नॅचरल बॅक्टेरियाचे आरोग्य आणि सौंदर्यासाठीचे फायदे…

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.