fbpx
1.1 C
London
Thursday, February 9, 2023

नक्की फरक पडेल ! वजन कमी करतायंं पण होत नाहीये ? जेवणाच्या वेळेत बदल करून बघा

वजन कमी करण्यासाठी लोक सहसा व्यायाम आणि आहार घेतात. यात काही शंका नाही की शरीराची चरबी कमी करण्यासाठी निरोगी आणि मर्यादित आहार घेणे आवश्यक आहे. परंतु यासह, आपला जेवणाची वेळ देखील लक्षात घेतली पाहिजे. कारण आपण कोणत्यावेळी जेवतो हे देखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

तज्ञांचा असा विश्वास आहे की आपण लठ्ठपणा कमी करण्यासाठी किती आणि केव्हा खातो, त्याबरोबरचं आपला खाण्याचा वेळही तितका महत्वाचा आहे. वास्तविक, बहुतेक लोक अन्न खाण्यासाठी योग्य वेळेची काळजी घेत नाहीत. यामुळे वजन कमी करण्यात त्यांना बराच वेळ लागतो.

सोपा उपाय ! रात्रीच्या वेळी पोट दुखत असेल तर करून बघा ‘हा’ उपाय, मिनिटात वेदना गायब

हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार आपण किती निरोगी आहार घेत आहात हे महत्त्वाचे नाही. आपण योग्य वेळी आहार घेता का नाही हे महत्वाचे आहे. जर योग्य वेळी आहार घेत असाल तर वजन कमी करण्यात आपल्याला मदत मिळते.

दररोज एकाच वेळी जेवण केल्याने जेवणाची वेळ आणि सर्काडियन रिद्धम यांच्यामधील संतुलन टिकून राहते. जर या दोघांमध्ये फरक असेल तर, आपल्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यत: 18 टक्के वाढू शकते.

फुफ्फुसाचा स्टेज 3 कॅॅन्सर असा आहे भयावह, उपचारानंतर जगण्याची असते आशा

न्याहारी (नाश्ता ) हा आपल्या जेवणाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. वजन कमी करण्यासाठी सकाळी 6 ते 10 दरम्यान न्याहारी घ्यावी. जास्त प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. यामुळे दिवसभर शरीरातील चरबी आणि भूक राहते. तज्ञांचा असा विश्वास आहे की सकाळी न्याहारी घेतलेले लोक इतरांपेक्षा 15 किलो जास्त वजन कमी करू शकतात.

आपल्या शरीरास अन्न पचण्यास आणि आत्मसात करण्यास कमीतकमी 4 तास लागतात. त्यानुसार आहार घ्यावा. म्हणजे शरीरात उर्जा आणि चरबी यांचा समतोल राखता येतो.

दुपारी तीनच्या आधी दुपारचे भोजन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, जे लोक दररोज दुपारचे जेवण योग्य वेळेत करतात त्यांना लठ्ठपणाची समस्या नसते. तसेच अतिरिक्त वजनही वाढत नाही.

आज्जीचा बटवा : पानफुटी ही देखील एक औषधी वनस्पती, ‘या’ आजारांचा करते नायनाट

त्यानंतर मधल्या काळात भूक लागली तर बदाम, फळे, किंवा ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. ज्यामुळे भूक भागेल पण वजन वाढणार नाही. उकडलेल्या भाज्या वजन कमी करण्यास देखील मदत करतात याचा देखील आपण वापर इथे करू शकता.

वजन कमी करण्यासाठी रात्री 7 वाजताच्या आधी रात्रीचे जेवण घ्यावे. रात्रीचे जेवण अत्यंत हलके असावे. संशोधनात असे आढळले आहे की रात्री 7 पर्यंत जेवण घेतलेले लोक 244 कॅलरी कमी घेतात. जे वजन कमी करण्यात त्यांना मदत करते. याशिवाय रात्री जेवणानंतर 1 ते 2 तासांनी झोपावे.

 

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here