ब्रेन फूड्स : मानवाचा मेंदू हा निःसंशयपणे शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गाने मेंदू जबाबदार असतो. मानवी मेंदू २४ तास कार्य करतो. आपल्या मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी आपण कदाचित स्वत: ला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये गुंतवत असालं. पण मानवी मेंदूच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला त्यास पोषण देणे आवश्यक आहे. निरोगी मेंदूसाठी मेंदूला अनुकूल आहार हा सर्वोत्तम मार्ग आहे. चला तर जाणून घेऊयात मेंदूला आवश्यक असणाऱ्या पोषक पदार्थांची माहिती.
अंडी
अंड्याचे आरोग्यविषयक फायदे सर्वांना माहिती आहेत. अंडी हा प्रोटिन्स मिळवण्यासाठी एक चांगला स्त्रोत आहे. जो आपण ब्रेकफास्टमध्ये अगदी सहजपणे घेऊ शकतो. आपण अंडी विविध प्रकारे शिजवू शकतो. यामुळे आपल्या मेंदूची शक्ती वाढण्यात मदत होते. त्यामुळे आपण रोजच्या आहारात अंडी खात असाल तर आपला मेंदू नक्कीच निरोगी राहील, असे तज्ञ म्हणतात.
नट्स
तुमच्या मेंदूची चांगली वाढ होण्यासाठी तुमच्या आजीने तुम्हाला बदाम खायला नक्कीच सांगितले असेल. मेंदूच्या अधिक चांगल्या कार्यासाठी आपण इतर नट्स देखील खाऊ शकता. नट्स हे आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहेत, जे आपल्याला जास्त काळ कार्यरत राहण्यास मदत करतात. आपल्या मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी दररोज मूठभर नट्स जरूर खावेत. ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
फॅटी फिश
ब्रेन फूड्सच्या यादीमध्ये फॅटी फिश टॉपवर असतात. फॅट्सयुक्त पदार्थांचे सेवन आपल्याला तीक्ष्ण स्मरणशक्ती टिकविण्यास मदत करते. आपल्या मेंदूला निरोगी राहण्यासाठी आपण फॅट्सयुक्त फिशेस खाऊ शकता. मासे खाणे हे मेंदूसाठी सर्वोत्तम आहे. यामुळे आपल्याला आरोग्याचे इतर फायदे देखील मिळतात.
हिरव्या भाज्या
काही लोकांना हिरव्या भाज्या खायला अजिबात आवडत नाहीत. पण हिरव्या भाज्या खाणे निरोगी राहण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. आपण हिरव्या भाज्यांचे अनेक प्रकारे सेवन करू शकतो. दररोज हिरव्या भाज्या आपल्या आहारामध्ये घेणे स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. आपल्या मेंदूसाठी आणि आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खाणे उत्तम आहे.
ग्रीन टी
ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी प्रसिध्द आहे. परंतु आपणास माहित आहे का? ग्रीन टी आपल्या मेंदूची शक्ती वाढविण्यास देखील मदत करतो. निरोगी मेंदूसाठी तुम्ही दिवसातुन दोन कप ग्रीन टी घेऊ शकता. हे मेंदूसाठी अनुकूल पेय आहे. ज्याचा आपण दिवसभरात कोणत्याही वेळी आनंद घेऊ शकतो.