fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

आज्जीचा बटवा : जाणून घ्या ! का म्हणतात आवळ्याला ‘दिव्य औषधी वनस्पती’

‘आवळा’ म्हटले की, आंबट आणि तुरट प्रेमींच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल. आंबट-तुरट प्रेमींचे आवळा हे फळ अत्यंत आणि खास आवडीचे फळ आहे. आम्हाला खात्री आहे, हे वाचता वाचता देखील तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटत असणार. आजीने केलेले आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा मुरंंब्बा, आवळा सुपारी हे सगळ्यांच्याचं आवडीचे असते, असे म्हणायला काही हरकत नाही. पण या सर्व गुणांबरोबर आवळ्यामध्ये औषधी गुण सुद्धा आहेत, हे सर्वांना माहिती आहे. हो हो ! कळलं आम्हाला “आवळ्यामध्ये सौंदर्यासाठीचे देखील गुण असतात”, असेच तुमच्या मनात आले आहे ना. चला तर मग करूयात थोडा जवळून परिचय आवळा औषधी वनस्पतीचा

आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ते एक उत्तम रसायन आहे. आवळ्याचा वुक्षाला आध्यात्मिक देखील महत्व आहे, असे म्हणतात. भगवान विष्णुला आवळ्याचा वृक्ष अत्यंत प्रिय आहे. आवळ्यांपासून तयार होत असलेले ‘च्यवनप्राश’ हे शक्तिवर्धक आहे. प्राचीन काळी देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांनी त्याचे औषध तयार करून च्यवन ऋषिना तारुण्य प्राप्त करून दिले.च्यवन ऋषींवरुन हे नाव पडले.

आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे फळ आहे आवळा औषधी उपयोगाकरिता प्रसिद्ध आहे. आवळ्यामध्ये जीवनसत्व “क” (Vitamin C) चे हे भांडार आहे. भारतात सर्वत्र याची लागवड केली जाते. एप्रिल मे मध्ये या वृक्षाला फुलांचा बहर येतो तर फळे हिवाळ्यात येतात.

आवळ्याचे वैज्ञानिक नाव इमब्लीका ऑफिसिजीटीस गायरटन असे असून, संस्कृतमध्ये आवळ्याला आमलकी, धात्री, शिवा इ.नावे आहेत. इंग्रजीत ‘इंडियन गुजबेरी’ तर हिंदीत आमला,आंवला असे म्हणतात. अतिशय उपयुक्‍त भारतीय वनस्पती म्हणून आवळ्याची ओळख आहे. आवळा हे औषधी गुणांनी भरपूर तर आहेच, पण त्याच्या रुचकर गुणामुळे आवळा स्वयंपाकघरातही वापरला जातो.

एशिया आणि यूरोप मध्ये मोठ्या प्रमाणावर आवळ्याची शेती होते. आवळ्याचे फळं औषधीय गुणांनी युक्त असतात. म्हणून याची व्यवसायिक शेती शेतकऱ्यांना लाभदायक असते. शेतकर्‍यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणार पीक म्हणजे आवळा. आवळा हे शेतकर्‍यांना नगदी उत्पन मिळवून देणार पीक आहे.

लागवडीसाठी आवळ्याच्या कृष्णा, कांचन, चकैया, एनए-6, एनए-7 या जातींची निवड करावी. आवळा लागवडीसाठी हलकी ते भारी, पाण्याचा योग्यप्रमाणात निचरा होणारी, कॅल्शियम युक्त जमिन या पिकासाठी योग्य आहे. चुनखडीयुक्त किंवा रेताड जमिनीचा वापर करु नये. आवळा हे फळझाड उष्ण व समशीतोष्ण हवामानात सर्व ठिकाणी येते.

औषधी उपयोग

 • पित्तशामक : उष्णता कमी करण्यासाठी आवळा उत्तम असतो.
 • पित्तामुळे उलट्या होत असल्यास आवळ्याचे पाव चमचा चूर्ण चंदन उगाळून बनविलेल्या गंधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने बरे वाटते.
 • डोळ्यांची आग होत असल्यास पाच – सहा तास पाण्यात भिजवलेली आवळकाठी आणि तीळ बारीक वाटून त्याचा लेप बंद डोळ्यांवर लावल्यावर फायदा होतो.
 • पोटात, छातीत, घशात पित्तामुळे जळजळत असेल तर पाव चमचा आवळ्याचे चूर्ण, त्यात अर्धा चमचा साखर व एक चमचा घरी बनविलेले साजूक तूप यांचे मिश्रण थोडे थोडे घेता येते.
 • नाकातून रक्‍त येत असल्यास आवळ्याच्या चूर्णाचा पाण्यात केलेला लेप टाळूवर लावल्याने रक्‍त येणे थांबते.
 • चार संत्र्याएवढे क जीवनसत्व २ आवळ्यामध्ये असते. त्यामुळे रोज २ ताजे आवळे खाल्ल्यास शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत राहतात व प्रकृती उत्तम राहते.
 • आवळ्यांपासून तयार होत असलेले ‘च्यवनप्राश’ हे शक्तिवर्धक आहे. असे म्हणतात, प्राचीन काळी देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांनी त्याचे औषध तयार करून च्यवन ऋषिना तारुण्य प्राप्त करून दिले.च्यवन ऋषींवरुन हे नाव पडले.
 • आवळकंठी (पावडर) पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यामध्ये तुरट, गोड, आंबट, खारट, कडू हे पाच रस असल्याने तो खाल्ल्याने कांती सतेज व निरोगी राहते.
 • मोठ्या आवळ्यांपासून तयार केलेला मोरावळा रोज सकाळी १ चमचा सेवन केल्याने पित्ताचा त्रास होत नाही.

सौंदर्यासाठीचे उपयोग

 • आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात.
 • नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा किंवा नेत्रबस्तीसाठी वापरण्याचा उपयोग होतो.
 • आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्ररोग बरा होतो.
 • केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा उपयोग होतो.
 • कोरडी खरूज, कोरड्या त्वचारोगावर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाज थांबते.
 • ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप लावल्याने डोके शांत राहते.

केसांसाठी उपयुक्त

 • आवळा केसांसाठी पण अत्यंत उपयुक्त आहे. केस गळत असल्यास आवळ्याचा रस, जेष्ठमध, चंदन, पिंपळी, व निळे कमळ यांचा कल्प तिळाच्या तेलात घालून तयार केलेले तेल रोज वापरल्यास फायदा होतो.
 • ब्राम्ही व आवळा मिळून तयार केलेले ब्राम्ही–आवळा तेल पण फार गुणकारी असते. ते बाजारात ब्राम्ही आवळा केशतेल या नावाने मिळते. आवळा, रिठा, शिकेकाई व इतर वनौषधी घालून तयार केलेली शिकेकाई पावडर वर्षभरासाठी तयार करा. गरजेप्रमाणे १-२ चमचे ती पावडर पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना एक प्रकारची चकाकी येते. केस गळायचे थांबतात.
Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here