fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

एड्सवर आजपर्यंत लस का बनलेली नाही ? जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

एड्स हा त्या धोकादायक आजारांपैकी एक आहे, आजपर्यंत यावर लस बनलेली नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एंटी-रेट्रोव्हायरल थेरपी आणि ड्रग्जद्वारे एड्सचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो, परंतु संसर्ग झालेल्याच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाला मुळापासून नष्ट करणार औषध (एचआयव्ही व्हॅक्सीन) उपलब्ध नाही. शास्त्रज्ञांना प्रथम 1980 मध्ये या रोगाबद्दल माहिती मिळाली होती. परंतु 40 वर्षांनंतरही वैज्ञानिकांना या रोगाची लस सापडलेली नाही.

1984 मध्ये अमेरिकेच्या आरोग्य व मानव सेवा विभागाने दोन वर्षांत एड्स लस तयार करणार असल्याचे सांगितले. परंतु सर्व प्रयत्नांनंतरही याला अपयश आले. लस नसली तरी एड्सपासून बचाव करून मोठ्या प्रमाणात नियंत्रित केले गेले आहे. एड्स लसीतील शास्त्रज्ञांसमोर कोणती मोठी आव्हाने आहेत ते आपण जाणून घेऊयात.

एचआयव्हीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रिया – लस विकसक म्हणतात की मानवी शरीरातील रोगांपासून संरक्षण करणारी रोगप्रतिकारक यंत्रणा एचआयव्ही (ह्युमन इम्यूनोडेफिशियन्सी व्हायरस) विषाणूविरूद्ध प्रतिक्रिया देत नाही. रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकारक एंटीबॉडी तयार करते, परंतु ते केवळ रोगाची गती कमी करते, ते थांबवू शकत नाही.

इम्यूनचा कमी रिस्पॉन्स – एचआयव्हीच्या संपर्कात आल्यानंतर रूग्णांची रिकवरी होणे जवळजवळ अशक्य आहे. एचआयव्ही इम्यूनला प्रतिसाद देत नसल्यामुळे शास्त्रज्ञ शरीरात एंटीबॉडी तयार करणारी लस तयार करू शकत नाहीत.

डीएनएमध्ये लपलेला व्हायरस – शरीरात एचआयव्ही पसरण्यासाठी बराच काळ लागतो. अशावेळी विषाणू मानवी डीएनएमध्ये लपलेला असतो. डीएनएमध्ये लपलेला विषाणू शोधणे आणि त्यांचा नाश करणे शरीरासाठी अवघड आहे. लसच्या बाबतीतही असेच घडते.

नष्ट झालेले व्हायरस – बहुतेकवेळा कमकुवत किंवा नष्ट झालेल्या व्हायरसचा वापर लस तयार करण्यासाठी केला जातो, परंतु एचआयव्हीच्या बाबतीत कमकुवत विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक विषाणूला योग्य प्रतिसाद देऊ शकलेला नाही. त्यामुळे या विषाणूवर कोणत्याही सजीवांचा वापर करणे देखील खूप धोकादायक आहे.

व्हायरसचे स्वरूप – लस मानवांना अशा विषाणूंपासून संरक्षण करते जे श्वसन आणि गॅस्ट्रो-आंत्र प्रणालीत प्रवेश करतात. मात्र एचआयव्ही संसर्ग जननेंद्रिय किंवा रक्ताद्वारे शरीरात पसरतो. त्यामुळे याचे स्वरूप वेगळे आहे.

प्राण्यांचे मॉडेल – जनावरांवर तपासणी केल्यानंतरच मानवांसाठी लस तयार केली जाते. परंतु दुर्दैवाने एचआयव्हीसाठी एकही पशू मॉडेल नाही ज्यामुळे मानवांसाठी एड्सची लस तयार करणे कठीण आहे.

रूप बदलणारा एचआयव्ही – एचआयव्ही विषाणू वेगाने बदलतो. लस व्हायरसच्या केवळ एका विशिष्ट प्रकारास लक्ष्य ठेवू शकते. विषाणूचे स्वरुप बदलत असताना लसीचा परिणाम कार्य करणे थांबवते त्यामुळे लास बनवणे अवघड आहे. ही सर्व कारणे आहेत ज्यामुळे आजपर्यंत एचआयव्हीवर लस तयार होऊ शकलेली नाही.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here