fbpx
8.3 C
London
Sunday, February 5, 2023

Female Investor: यशस्वी महिला गुंतवणूकदार होण्यासाठीची ३ महत्वाची सूत्र

यशस्वी महिला गुंतवणूकदार (Successful Female Investor) म्हणून मिरवायला कोणत्या स्त्रीला आवडणार नाही? दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात यतो. आजची स्त्री सुशिक्षित आहे, सक्षम आहे, मग शेअर बाजार गुंतवणूक म्हटल्यावर ती मागे का राहते?

काही कारणांनी नोकरी सोडावी लागली किंवा नोकरी करता आली नाही, तर दुःखी होऊ नका. एक तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकता. कशी? तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार बनू शकता. नोकरी किंवा व्यवसाय करणं न करणं ही वैयक्तिक बाब आहे. परंतु, आर्थिक नियोजन, बचत व गुंतवणूक करणे ही कौटुंबिक गरज आहे. तुम्ही किती कमावता यापेक्षा तुम्ही किती वाचवता हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे.

शेअर बाजारासंबंधित असणाऱ्या कोणत्याही ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता स्वतःहून त्याचा अभ्यास करा. मग तुम्हालाच वाटेल, “हो, मी हे करू शकते.” महिला यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकतात. त्यासाठी आवश्यक असणारे गुण त्यांच्यामध्ये अंगभूतच असतात. पण गरज असते ती एक पाऊल पुढे टाकण्याची. आजच्या लेखात आपण यशस्वी महिला गुंतवणूकदार होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन स्टेप्सची माहिती घेऊया.

हे नक्की वाचा: गुंतवणूक: तेजीमंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी…

Successful Female Investor: ३ महत्वाची सूत्र –

१. बाजाराचा अभ्यास:

 • पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी  यशाचा झेंडा फडकावला आहे. याला गुंतवणूक क्षेत्रदेखील अपवाद नाही.
 • आज महिला आर्थिक नियोजन तज्ज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ म्हणून स्वतंत्रपणे यशस्वी व्यवसाय करत आहेत. अगदी शेअर बाजारातही अनेक महिला यशस्वी  गुंतवणूकदार म्हणून नाव कमावत आहेत. त्यामुळे शेअर बाजार हे महिलांचे क्षेत्र नाही ही भावना मनातून काढून टाका.
 • होय, तुम्हीदेखील हे करू शकता. यासाठी सर्वात आधी आपला व्यासंग वाढवणे आवश्यक आहे. वृत्तपत्र, न्यूज चॅनेल्स, वेबसाईट्स, अशा अनेक माध्यमांमधून देशांतर्गत व आतंरराष्ट्रीय घडामोडींची माहिती नियमितपणे घेत जा.
 • एका रात्रीत कोणीही यशस्वी किंवा श्रीमंत होत नाही. त्यासाठी मेहनत करावीच लागते. संयम आणि अभ्यास या गोष्टींमुळे प्रगल्भता येते म्हणूनच गुंतवणुकीस सुरवात करण्यापूर्वी बाजारातील मूलभूत संकल्पना उदा. पी.ई. रेशो, रिटेन्शन रेशो, इक्विटी रेशो, मार्केट कॅप, निव्वळ उत्पन्न, पी.बी. रेशो, उत्पन्नातील वृद्धी, लाभांश, परतावा, इत्यादी मूलभूत आणि महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.

२. गुंतवणूक धोरण

 • कोणताही प्रवास दिशाहीन नसतो. त्यामुळे गुंतवणुकदार या नात्याने आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी तुमच्याकडे योग्य गुंतवणूक धोरण असणे आवश्यक आहे.
 • दैनंदिन खर्चापासून निवृत्तीच्या नियोजनापर्यंत प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. आपण गुंतवणूक नक्की कशासाठी करतोय, या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे तयार असले पाहिजे.
 • आपली आर्थिक उद्दिष्ट्ये सामान्यतः तीन प्रकारात विभागली जातात- अल्पकालीन, मध्य किंवा दीर्घकालीन. यानुसार प्रत्येक उद्दिष्टासाठी गुंतवणूक नियोजन करणे आवश्यक आहे.
 • गुंतवणूक धोरण ठरवताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जोखीम क्षमता. आपली जोखीम क्षमता तपासून त्यानुसार शेअर्स निवडून गुंतवणूक करणे महत्वाचे आहे.
 • उत्तम गुंतवणूक पोर्टफोलियो तयार करण्यास मदत होते.पोर्टफोलिओ तयार करताना तो वैविध्यपूर्ण असावा. इथे शेअर्स, कमोडिटीज,  तसेच चलनातही गुंतवणूक करू शकता

महत्वाचा लेख: शेअर्स खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती?

३.  भावनिक होऊ नका

 • महिलांच्या यशामधील सर्वात मोठा अडथळा कोणता असेल, तर तो म्हणजे भावनाप्रधान स्वभाव. बाजार म्हटल्यावर चढ-उतार होतच असतात. अशावेळी बाजार खाली गेला म्हणून निराश होऊ नका.
 • कोणत्याही परिस्थितीत भावुकता टाळा. बाजार कोसळल्यामुळे निराश होऊन किंवा बाजार वर गेल्यावर अति उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा.
 • केवळ नवीन असताना नव्हे, तर यशाच्या प्रत्येक वळणावर सतत शिकत राहण्याची वृत्ती ठेवा. यशस्वी व्यक्ती कधीही कोणाला कमी लेखात नाहीत. ते प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतात.
 • पुस्तके शिकून ज्ञान मिळतं आणि त्याला अनुभवाची जोड दिल्यास यशाचा मार्ग सहज दिसतो. जाहिराती किंवा कंपन्यांच्या दाव्यांना बळी न पडता हुशारीने अभ्यास करून आपला पोर्टफोलिओ तयार करणे आवश्यक आहे.

यशस्वी महिला गुंतवणूकदार होण्यासाठी तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा – अभ्यास, संयम आणि अनुभव.

 • गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करणे तर सर्वात पहिली पायरी आहे.
 • बाजारात सतत चढ-उतार होत असतात. इथे तुमच्या संयमाची परीक्षा असते.
 • तर, कंपन्यांचे फसवे दावे किंवा आकर्षक जाहिरातींना भुलून चुकीचा निर्णय न घेता योग्य निर्णय घेण्यासाठी तुमच्या ज्ञानाइतकीच अनुभवाची गरज असते.

यावर्षी जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर करा सुरवात एका नव्या स्वप्नाची. 

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here