Investment: महिन्याला केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक करून करोडपती व्हा

गुंतवणूक (Investment)

0

आज कालच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला कमी वेळेत श्रीमंत होण्याची इच्छा असते. प्रत्येक वेळी पैसा पैशाला ओढतो असं नाही, तर मंडळी महिन्याला केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक (Investment) करून तुम्हीदेखील करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. चला, तर मग जाणून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे?

आपल्यापैकी प्रत्येकाला गुंतवणूक करण्याची इच्छा असते.  पण अनेकांना असं वाटत असतं की गुंतवणूक करण्यासाठी एका मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. असं काहीही नाही! तुम्ही अगदी लहान रक्कम नियमितपणे गुंतवून देखील भरपूर फायदा कमावू शकता. जर तुम्ही महिन्याला नियमितपणे रु. 5000 गुंतवू शकत असाल, तर येत्या वीस वर्षात तुम्ही करोडपती झालेले असाल.

हे नक्की वाचा: नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का ? 

Investment: एसआयपी मध्ये गुंतवणूक करा

 • आपल्याकडे असा गैरसमज आहे की लहान रक्कम नियमितपणे गुंतवल्यामुळे तुम्ही इच्छित परतावा मिळवू शकणार नाही आणि याचमुळे अनेक व्यक्ती मोठी रक्कम एकत्र होण्याची वाट पाहतात आणि गुंतवणूक करू शकत नाहीत.
 • मोठी रक्कम एकदाच गुंतवल्यामुळे जो फायदा तुम्ही कमावणार आहात तेवढाच फायदा जर तुम्ही नियमितपणे लहान रक्कम गुंतवल्यामुळे होणार असेल, तर काय हरकत आहे? 
 • याउलट तज्ज्ञ तर असे म्हणतात की लहान रक्कम गुंतवल्यामुळे बाजारात होणाऱ्या लहान मोठ्या बदलांचा धोका देखील कमी होतो. परंतु या सर्व फायद्यांसाठी तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी मध्ये गुंतवणूक करावी लागेल.

थोडासा धोका आणि जास्त फायदा

 • इतर कुठल्याही पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये जास्त प्रमाणात फायदा होतो. याचे कारण म्हणजे इथे तुम्हाला येणाऱ्या परतावा जास्त व्याजदराने मिळतो.
 • तुम्ही जर योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर वर्षाला किमान अकरा ते बारा टक्के व्याजदराचा परतावा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो.
 • इक्विटी फंड मधून होणारा फायदा इतर गुंतवणुकीपेक्षा नक्कीच जास्त आहे. अर्थात यामध्ये बाजारातील जोखीम असली तरी जर तुम्ही दहा ते वीस वर्ष नियमितपणे या बाजारामध्ये पैसे गुंतवत राहिलात, तर तुमची जोखीम देखील कमी होईल. 
 • यातील काही गुंतवणूक योजना तर तुम्हाला कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त फायदा मिळवून देतील. जर योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर इच्छित परतावा तुम्हाला नक्कीच मिळेल.

एसआयपी मध्ये गुंतवणूक कशी करायची?

 • एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला अनेक प्रकारच्या योजनांची तुलना करून आवश्‍यकतेनुसार एक पोर्टफोलिओ तयार करावा लागेल. 
 • पोर्टफोलिओ तयार करताना तुम्ही किती रक्कम गुंतवणार आहात, किती प्रमाणात जोखीम घ्यायची तुमची तयारी आहे आणि तुम्हाला किती वर्षात परतावा हवा आहे अशा सर्व गोष्टींचा विचार करून तो पोर्टफोलिओ तयार करा. यासाठी तुम्ही गुंतवणूक तज्ज्ञांची देखील मदत घेऊ शकता.
 • आधी सांगितल्याप्रमाणे म्युचअल फंड्स तुम्हाला किमान 12% तरी परतावा नक्कीच देईल त्यामुळे 25 वर्षात तुम्ही करोडपती नक्कीच व्हाल.

विशेष लेख: टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे

नियमित गुंतवणूक पद्धत

 • एसआयपी गुंतवणूक पद्धत ही अगदी सर्वसामान्यांना पूरक आहे कारण एसआयपी गुंतवणुकीमध्ये दर महिन्याला निश्चित रक्कम ठरलेल्या तारखेला तुमच्या बँक अकाउंट मधून कमी होते. तुम्हाला जाऊन कोणाला पैसे देण्याची आवश्यकता नाही.
 • तुम्हाला तारीख देखील लक्षात ठेवायची आवश्यकता नाही आणि त्यामुळेच एखाद्या महिन्याचा हप्ता मागेपुढे होण्याचा देखील प्रश्नच उद्भवत नाही.
 • रक्कम लहान असल्यामुळे तुमच्यावर ताण येणार नाही, अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ही रक्कम गुंतवू शकाल.
 • उदाहरणार्थ जर तुम्ही महिन्याला पाच हजार एवढी रक्कम गुंतवण्याचे ठरवले असेल आणि त्यासाठी प्रत्येक महिन्याची पाच तारीख ठरलेली असेल तर प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला तुमची गुंतवणूक करायची पाच हजार रुपये रक्कम तुमच्या बँक अकाउंट मधून डेबीट होतील आणि तुम्हाला त्याचा मेसेज देखील येईल.

गरजेनुसार गुंतवणूक करा

 • या गुंतवणूक प्रकारात तुम्हाला अवघड वाटेल अशी मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नाही.
 • अनेक पारंपरिक गुंतवणुकीमध्ये तुम्हाला किमान वीस हजार रुपये तरी नक्कीच गुंतवावे लागत असतील आणि त्याचा व्याजदर देखील भरपूर कमी असतो. 
 • त्यापेक्षा एसआयपी मध्ये गुंतवणूक करा अगदी महिन्याला पाच हजार गुंतवुन देखील तुम्ही वीस वर्षांच्या कालावधीमध्ये करोडपती होऊ शकता.
 • जर तुम्हाला यापेक्षाही कमी गुंतवणूक करायची असेल तरीदेखील तुम्ही या प्रकारांमध्ये गुंतवणूक करू शकता. फक्त ती गुंतवणूक थोडा अधिक काळ करण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार अगदी 500 रुपयांपासून देखील गुंतवणूक करू शकता.

गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी एसआयपी मध्ये गुंतवणूक करा

 • शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्षरित्या गुंतवणूक करताना अनेक वेळा तुम्हाला तोटा नक्कीच झाला असेल परंतु लक्षात घ्या एसआयपी मध्ये तुम्हाला हा तोटा सहन करावा लागणार नाही कारण तुम्ही सगळीच रक्कम एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवत नाही. 
 • तुम्ही ठरलेली रक्कम थोडी थोडी करून अनेक ठिकाणी गुंतवलेली असते त्यामुळे एका कंपनीचे शेअर खाली गेले, तर दुसरी कंपनी तुम्हाला फायदा कमावून देते आणि तुम्ही तुमच्या इच्छित परताव्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकता. 
 • यामध्ये तुमची जोखीम कमी होते आणि बाजारात होणाऱ्या हालचालींविषयी तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. तुम्ही अगदी निश्चिंतपणे तुमच्या इच्छित परताव्यापर्यंत जाणार हे नक्की.

महत्वाचा लेख: “ड्रीम कार” खरेदीसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी उपयुक्त ठरेल ?

एसआयपी मधील फायदा

 • एसआयपी मध्ये जास्त फायदा कसा मिळतो यामागील गणित समजून घ्या.
 • जर तुम्ही महिन्याला ५ हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवत असाल तर तुम्हाला प्रत्येक वर्षी किमान १०% परतावा तर नक्कीच मिळेल. 
 • पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्यात, तुम्ही गुंतवलेले ५ हजार आणि तुमचे पहिल्या वर्षीचे प्रत्येक महिन्याला येणारे व्याज ५०० रुपये असे एकूण मिळून प्रत्येक महिन्याला तुम्ही किमान ५५०० रुपये एसआयपी मध्ये गुंतवत असाल. 
 • प्रत्येक वर्षी हा आकडा वाढत जाणार आहे. तिसऱ्या वर्षी तुम्ही ६०५० रुपये प्रती महिना गुंतवत असाल. 
 • इतर गुंतवणुकीत हा फायदा तुम्हाला मिळणार नाही म्हणून एसआयपी मधील गुंतवणूक तुम्हाला जास्त परवडेल.

21 वर्षांत आपले 1 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण कसे होते, हे खालील तक्त्यामध्ये  पहा 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.