Tax and Gold jewellery: आपण किती सोने बाळगू शकतो?

0

सरकारने सोन्याच्या वस्तूंवर (Tax on gold jewellery) काही निर्बंध घातल्याबद्दल मोठ्या प्रमाणात अफवा पसरताना दिसत आहेत. जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी दिनांक ०१ डिसेंबर २०१६ रोजी सीबीडीचे प्रेस नोटद्वारे जे स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे, त्याबाबत सविस्तर मांडणी व विश्लेषण-

Tax and Gold jewellery- सोने बाळगण्याची मर्यादा :

आयकर छाप्याच्या वेळी सोन्याचे दागिने व सोन्याचे अलंकार किंवा आभूषणे जप्त करण्यासंदर्भात आयकर अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सुचनांचे पूर्वीचे पत्रक क्र. १९१६ या सूचना परीपत्रकाचे पुनरुच्चारण केले जे ११ मे १९९४ रोजी जारी केले गेले होते.
या परिपत्रकाअंतर्गत सीबीडीटीने आपल्या आयकर अधिकाऱ्यांना विवाहित महिलेसाठी ५०० ग्रॅम पर्यंतचे सोने व सोन्याचे दागिने, कुटुंबातील अविवाहित महिला सदस्यासाठी २५० ग्रॅम आणि कुटुंबातील पुरुष सदस्यासाठी १०० ग्रॅम पर्यंतचे सोने जप्त करू नका अशा सूचना दिल्या होत्या.
याचा अर्थ असा की आयकर अधिकारी विशिष्ट मर्यादेपर्यंत सोन्याचे दागिने जप्त करू शकत नाहीत.
जर कुटुंबाचे उत्पन्न कमी असेल आणि कुटुंबाच्या मालकीतील सोन्याचे दागदागिने एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असतील म्हणजेच कुटुंबाच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त सोने असेल आणि ते मर्यादेपेक्षा कमी असेल, तर ते आयकर अधिकारी जप्त करू शकत नाही.
सीबीडीटीतर्फे ०१ डिसेंबर २०१६ रोजी देण्यात आलेल्या परिपत्रकातील स्पष्टीकरणामध्ये नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा सोने व सोन्याचे दागिने कमी असतील तरच आयकर अधिकारी जप्ती करू शकत नाहीत अथवा असे सोने व सोन्याच्या दागिन्यांवरील जप्ती टळू शकते.

Tax and Gold jewellery- सीबीडीटीच्या सूचनापत्रकातील महत्वाचे मुद्दे:

सध्या आपल्या भारत देशात सोन्याचे किंवा दागिन्यांच्या मालकीचे बंधन घालणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही.
आयकर खात्याने आयकर अधिकाऱ्यांकडून काही विशिष्ट मर्यादेपर्यंत दागिने बाळगण्याबाबत सूचना परिपत्रक काढल्यामुळे हे परिपत्रक काय आहे? हे समजून घेणे गरजेचे आहे.
या परिपत्रकात केवळ कुटुंबाचे दागिने व दागदागिने समाविष्ट आहेत.
हे परिपत्रक असे सांगते की सोन्याचे दागिने आणि आभूषणे किंवा अलंकार जप्त करण्याच्या मर्यादेपेक्षा कमी असेल, तर त्याचे स्त्रोत समजावून सांगणे बंधनकारक नाही अथवा समजावून सांगणे गरजेचे नाही.
अर्थात आपल्याला सोने व सोन्याचे दागिने कसे घेतले त्याच्या स्त्रोताचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही.
तथापि, जर आपल्याकडे सोने बाळगण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त सोने किंवा सोन्याचे दागिने असतील आणि आपण आपल्या सोन्याच्या दागिन्यांचा स्त्रोत पुराव्यानिशी समजावून सांगू शकत असाल (आपली स्वतःची सोने खरेदी  किंवा आपल्या वारसहक्कानुसार मिळालेले सोने किंवा सोन्याचे दागिने) तर अशा आयकर छाप्याच्या किंवा धाडीच्या वेळी मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात असलेले सोन्याचे दागिने जप्त करण्याचा अधिकार आयकर अधिकाऱ्यांना नाही.

सोन्याचे दागिने आपल्याकडे वारसानुसार मिळालेले आहेत आणि आपण ज्यात दागिन्यांचा वारसा मिळाला आहे अशा व्यक्तीच्या संपत्ती कर रिटर्नद्वारे विल सारख्या दस्तऐवज या पुराव्यांद्वारे आपण अशी वारसा नुसार मिळालेले सोने सिद्ध करू शकता, अशा दागिन्यांना आयकर छाप्याच्या किंवा धाडीच्या वेळी जप्त केले जाऊ शकत नाही.
सोने बाळगण्याच्या मर्यादे पर्यंत आयकर विभाग सोन्याचे दागिने हस्तगत किंवा जप्त करणार नाही.
माझ्या मते आपल्याला अशा दागिन्यांच्या खरेदीचा स्त्रोत समजावून सांगावा लागेल म्हणजेच तुम्ही तुमच्या जवळ सोने घेण्यासाठी पैसे कुठून आले? त्यासाठी कोणाकडून उसने पैसे घेतले का? पैसे कोणत्या उत्त्पन्न प्रकारातून मिळवले अथवा कमावले? त्या उत्पन्नावर आयकर भरला का? आयकर भरला असेल तर त्याची आयकर रिटर्न ची प्रत व टॅक्स भरल्याची चलन पावती इ. गोष्टींच्या पुराव्यांद्वारे बाळगत असलेल्या सोने किंवा सोन्याच्या दागिने याबाबत स्पष्टीकरण देता आले नाही, तर आपले सोने जप्त करण्याचे अधिकार आयकर छाप्याच्या वेळी किंवा धाडीच्या वेळी आयकर अधिकारी जप्त करू शकतात.
जर तुम्ही तुमच्या करपात्र उत्पन्नातून सोन्याचे दागिने विकत घेत असाल तर तुम्हाला तुमच्या सोन्याच्या होल्डिंगची चिंता करण्याची गरज नाही, पण अशा दागिन्यांच्या खरेदीच्या पावत्या सांभाळून ठेवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो.
जरी आपल्याकडे सध्या असलेल्या दागिन्यांची सोनाराला विक्री करून म्हणजेच असलेले सोने मोडून दुसरे दागिने खरेदी केले किंवा सोन्याचे दागदागिने किंवा आभूषणे सोनाराकडून तयार करून घेतले असतील, तर अशा वेळी कृपया मूळ सोने किंवा दागदागिने खरेदी केलेल्या पावत्या व दागिने सोनाराला विकून अथवा मोडून तयार केलेल्या दुसऱ्या दागिन्यासाठी किंवा दुसरा नवीन दागिना खरेदी केला असेल त्यासाठी अधिकचा जो खर्च केला असेल किंवा त्यासाठी जे शुल्क लागले असेल त्याचे चलन किंवा बिल सोनाराकडून घेऊन जपून ठेवणे गरजेचे आहे.
कृपया लक्षात घ्या की सोन्याचे दागिने चेक किंवा क्रेडिट / डेबिट कार्डद्वारे खरेदी केले गेले असावेत, जरी ते दागिने रोख स्वरूपात खरेदी केले गेले असले आणि ते तुमच्या करपात्र उत्पन्नातून खरेदी केले गेले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. म्हणून जिथे वारसा मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांचा प्रश्न आहे ते घरी असो किंवा लॉकरमध्ये असो आपल्या दागिन्यांसमवेत मृत्युपत्राची प्रत आपल्याकडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय ज्यांच्याकडून दागिन्यांचा वारसा मिळाला आहे ती व्यक्ती संपत्ती कर भरणारा होता किंवा नाही हे पाहणे समजून घेणे महत्वाचे आहे.
जर आपण दि.३१.०५.१९९४ चे सूचना पत्रक क्र.१९१६ हे परिपत्रक काटेकोरपणे वाचले तर ते केवळ सोन्याचे दागिने आणि आभूषणे जप्त करण्याबाबतीत सूट देते आणि सोन्याचे नाणी आणि सोन्याच्या पट्ट्या किंवा बार यात समाविष्ट नाहीत म्हणजेच हे परिपत्रक जप्त करण्याबाबतीत सूट देत नाही.
जर आपण अशा सोन्याचे नाणी व सोन्याच्या पट्ट्या किंवा बार समजावून सांगण्यात किंवा त्याचे स्त्रोत समजावून सांगायला किंवा पुराव्यानिशी समजावून सांगता आले नाही तर वरील परिपत्रकात उल्लेख केलेल्या मर्यादेत वजन असले तरीही आयकर अधिकारी सोन्याचे नाणी व सोन्याच्या पट्ट्या किंवा बार जप्त करू शकतात.
जरी आर्थिक वर्ष २०१५-१६ पासून संपत्ती कर रद्द केला गेला असला तरी ३१.०३.२०१५ आधी आपली निव्वळ करपात्र संपत्ती रु.३० लाख पेक्षा जास्त किंवा अधिक संपत्ती असल्यास ३१.०३.२०१५ पर्यंतचे संपत्ती कर विवरण पत्रक देण्यास आपण जबाबदार आहात.
जर वर्षाच्या समाप्तीनंतर रु. ३० लाख पेक्षा जास्त संपत्ती असेल आणि तुम्ही संपत्ती कर विवरणपत्र दाखल केले गेले असेल आणि त्यात सोने किंवा सोन्याचे दागिने, नाणी समाविष्ट केले गेले असतील तर त्याच प्राथमिक वस्तूंचे स्पष्टीकरण संपत्ती कर विवरणपत्र किंवा रिटर्न मध्ये मिळेल.

मला खात्री आहे की वरील चर्चेमुळे आयकरांच्या छाप्याच्या वेळी सोन्याच्या जप्तीवरील सीबीडीटीच्या परिपत्रकाचे परिणाम समजून घेण्यात मदत होईल व आपण किती सोने बाळगू शकतो? या बाबत वाचकांचे या लेखातून शंकानिरसन होण्यास मदत होईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.