fbpx

अबब ! 39 बायक्या 94 मुले ‘या’ व्यक्तीचे आहे एवढे मोठे कुटुंब, विशेष म्हणजे अजूनही राहतात एकत्र

आजकाल आपण मुलीचे लग्न करायचे असेल तर छोट्या कुटुंबाला प्राधान्य देतो. चार माणसांचे कुटुंब असेल तर अतिउत्तम. त्यापेक्षा जास्त माणसे कुटुंबात असतील तर मात्र घरात गर्दी होते. त्यामुळे चिडचिड होते. मात्र जगातील सर्वात मोट्या कुटुंबात तब्बल १६७ लोकं राहतात आणि ते एकाच घरात राहतात. भारतातील मिझोरमची राजधानी असलेल्या आईसोलल जवळ बखतवांग गावात राहणाऱ्या सर्वात मोठ्या कुटुंबाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

या घराचे प्रमुख हे जियोना चाना आहेत. ज्यांना 39 बायका, 94 मुले आणि 33 नातवंडे आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबातील सर्व लोक एकाच स्वयंपाकघरात जेवण बनवतात. आणि सर्व लोक एकाच डायनिंग हॉलमध्ये भोजन करतात. त्यांना मोठ्या डायनिंग हॉलमध्ये तब्बल 50 टेबल्सवर जेवण वाढले जाते.

chana 2

या घरातील लहान मुलं जमिनीवर बसून जेवण करतात. रात्रीच्या जेवणाची सुरुवात ही संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास होते. चानाच्या बायका या सर्व लोकांसाठी स्वयंपाक बनवतात. तसेच या सर्व बायका खूप आज्ञाधारक आहेत. सर्व एकाच घरात एकत्र राहतात आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात.

चानाच्या मुली या घरातील इतर काम पाहतात. तर सुना या घर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात. तसेच कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन कपडे धुण्याचे काम करतात. तर मुले ही बहराचे इतर काम बघतात. आणि हे सर्वजण गुण्या गोविंदाने राहतात.

जिओनाच्या 167 सदस्यांच्या या कुटुंबात, दररोज 130 किलोपेक्षा जास्त धान्य आणि भाज्या शिजवल्या जातात. एका दिवसाच्या रेशनमध्ये 45 किलो तांदूळ, 25 किलो डाळी, 20 किलो फळ, 30 ते 40 कोंबडी आणि 50 अंडी आवश्यक आहेत. इतके रेशन हे आपल्या छोट्या कुटुंबांना अनेक महिने पुरेल.

chana 3

जियोना हे अशा पंथातील आहे ज्यात अमर्यादित विवाह करण्यास परवानगी आहे.जियोना यांना बर्याच बायका असण्याचे हेच कारण आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या कौटुंबिक नावाचा समावेश आहे. 39 बायकांचा पती असलेला जियोना याला देवाकडून मिळालेले आशीर्वाद आणि नशिबाची श्रीमंती मानतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here