fbpx
1.1 C
London
Thursday, February 9, 2023

#Unique : स्किनकेअर रुटीनमध्ये सामील करा तांदळाचं पीठ, मिळवा मुलायम आणि तेजस्वी त्वचा…

जर आपण भारतीय आहात, तर आपणास नक्कीच माहित असेल की येथे घरगुती उपचारांना किती महत्त्व दिले जाते. आपली समस्या काय आहे हे महत्त्वाचे नसते, परंतु आपल्या घरातील वृद्ध स्त्रियांकडे आपल्या प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय असतात. DIY टिप्समध्ये किचनवेअरची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि यापैकी बरेच उपाय प्रभावी ठरले आहेत. घरगुती उपचारांच्या या यादीमध्ये तांदळाच्या पिठाचा समावेशही आहे, जो आपल्या स्किनकेअरसाठी खूप फायदेशीर आहे.

तांदळाचे पीठ सनबर्न आणि टॅनसारख्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी एक चांगला घरगुती उपाय आहे. यात allantoin and ferulic acid सारख्या सर्व सूर्यापासून संरक्षण करणारे एजंट्स असतात, ज्यामुळे ते एक उत्कृष्ट नैसर्गिक सनस्क्रीन बनते. यासोबतच तांदळाच्या पीठाने हायपरपिग्मेंटेशन आणि एजिंग स्पॉट्सच्या समस्यादेखील कमी होतात. स्किन पोअर्समधून निघणारा एक्सट्रा ऑइल सुद्धा कमी होतो, हे ऑईली स्किन असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे. तांदळाचं पीठ व्हिटॅमिन बी चे एक उत्तम स्रोत आहे.

चला तर जाणून घेऊयात तांदळाच्या पिठाचे फेस पॅक कसे तयार केले जाते आणि ते आपल्या त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे….

सामग्री : 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे थंड दुध, अर्धा चमचा मलाई, अर्धा चमचा कॉफी पावडर.

कृती :

  • प्लेन पेस्ट तयार होईपर्यंत सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करा.
  • हळू हळू आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि डोळ्याखालील नाजूक भाग सोडून द्या. हा पॅक २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि एकदा कोरडे झाल्यावर, चेहरा थंड पाण्याने धुन घ्या.
  • चेहरा धुतल्यावर मॉइश्चरायझर नक्की लावून घ्या.

मलाई किंवा दुधाची क्रीम एक उत्कृष्ट पीएच नैसर्गिक क्लीन्सर आहे. जी त्वचेला मॉइश्चराइझ करण्यास मदत करते. तांदळाचे पीठ सर्व एक्सट्रा तेल काढून टाकतो. थंड दुधामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते आणि सन टॅन काढून टाकण्यास मदत होते. तांदळाच्या पीठाने सनबर्नच्या समस्या देखील कमी होतात. कॉफीमध्ये कॅफिन असतो जो रक्ताचा प्रवाह वाढविण्यात आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक परत आणण्यास मदत करतो.

तुम्ही तुमच्या स्किनकेअरमध्ये तांदळाचे पीठ वापरले आहे का? नसल्यास, प्रतीक्षा करू नका आणि आपल्या स्किनकेअर रूटीनमध्ये तांदळाचे पीठ लगेच सामील करून आपली त्वचा सुंदर बनवा.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here