‘ही’ ११ पुस्तकं वाचाल्यानंतर कदाचित तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल
असं म्हणतात की पुस्तक हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे. प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये माणसाला पुस्तकांची साथ मिळते. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आपण प्रत्येक जण काहीना काहीतरी रोज वाचत असतो. आज आम्ही तुम्हाला अशीच ११ पुस्तकं सांगणार आहोत की, ही पुस्तकं वाचल्यानंतर तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल.
१). अग्निपंख
वर्तमानपत्रे वाटून शिक्षण पूर्ण करणारे आणि संपूर्ण भारतीय जनतेचे लाडके असणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अग्निपंख पुस्तक वाचून मन खरंच उत्साहित होते.
२). मुसाफिर
अच्युत गोडबोले यांच्या बद्दल जितके बोलावे तेवढे कमीच आहे. एक Chemical Engineer ते एक यशस्वी लेखक हा त्यांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. या पुस्तकात अच्युत गोडबोले यांनी त्यांचा जीवन प्रवास मांडला आहे. या त्यांच्या जीवन प्रवासात येणारी आव्हाने कशी पेलली किंवा वैयक्तिक जीवनात येणारी आव्हाने खूप सुंदर अशा शब्दात मांडलेली आहेत.
३). एक होता कार्व्हर
हे पुस्तक वीणा गवाणकर यांनी मराठीत भाषांतरित केले आहे. एक निग्रो मुलगा ज्याला त्याचे आई-वडील माहित नाहीये. त्याला असेच कोणीतरी सांभाळले, हाती येईल ती कामे म्हणजे कपड्यांना इस्त्री ते रंगकाम अशी सगळी कामे करून तो शिकत राहिला.
पुढे हाच मुलगा – अमेरिकेचा एक थोर शास्त्रज्ञ झाला…! हा थोर शास्त्रज्ञ म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर.
४).इडली, ऑर्किड आणि मी
या पुस्तकाचे लेखक आहेत श्री विठ्ठल कामत. आज विठ्ठल कामत यांचे नाव माहित नसणारा खाद्यप्रेमी सापडणार नाही. या पुस्तकात श्री कामत यांनी आपल्या जगातील पहिल्या अशा इको फ्रेंडली हॉटेलची सुरुवात करताना ज्या अनंत अडचणींना तोंड दिले ते या पुस्तकात मांडले आहे. असे म्हणतात की, माणसाला सर्व सोंगे करता येतात परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. या माणसाच्या आयुष्यात सुद्धा अशी आर्थिक अडचण आली. परंतु या माणसाने त्याच्या संकटांवर मात करून एक आलिशान हॉटेल उभे केले.
५). Rich Dad & poor Dad
हे पुस्तक लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या चरित्रावर आधारित कथा आहे.
ज्यात त्याचे दोन पिता आहेत – प्रथम त्याचा खरा पिता जो शिक्षक आहे आणि दुसरे म्हणजे त्याच्या मित्राचे वडील जे खूप श्रीमंत होते. दोघांकडे पैशाबद्दल खूप वेगळी वृत्ती होती, जे त्यांच्या सध्याच्या परिस्थितीचे देखील एक कारण होते.
६).inner engineering
हे एक अतिशय आकर्षक पुस्तक आहे, जे सद्गुरूंच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे. या पुस्तकाच्या मते, जर आपण तयार असाल तर ते आपल्या अंतर्गत बुद्धी, मन आणि सर्वोच्च प्रतिभेला एक साधन म्हणून जागृत करण्यास आणि विश्वाचे ज्ञान प्रदर्शित करण्यास मदत करते.
७). अल्केमिस्ट – पाओलो कोएलो
हे एक प्रवासवर्णन आहे .प्रवासी आपल्या प्रवासाकडे कसे वळतात याची कथा या पुस्तकांमध्ये सांगितली आहे.
८). Zero to One – पीटर थील
पीटर थायल एक उद्योजक, व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा पेपलचे सह-संस्थापक आहे, जे आज जगातील सर्वोत्तम ऑनलाइन मनी ट्रान्सफर सिस्टम आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला काहीतरी खूप मोठे करायचे असेल तर ते तितकेच वेगळे असले पाहिजे, त्याच गोष्टी करुन तुम्ही अधिक यशस्वी होऊ शकत नाही.
९). इंटेलिजेंट इन्व्हेस्टर – बेंजामिन ग्राहम
इंटेलिजेंट इन्व्हेस्टर हे एक पुस्तक आहे ज्यातून आपण गुंतवणूकीचा खरा अर्थ काय आहे आणि आपण आपले गुंतवणूक लक्ष्य कसे प्राप्त करू शकता हे शिकू शकता.
१०). जीत आपकी – शिव खेडा
हे पुस्तक आपल्याला आयुष्यात कोणत्या सामान्य चुका होतात ज्यामुळे आपल्याला पश्चात्ताप करावा लागतो याची थोडक्यात माहिती देते.
११). संन्यासी ज्याने आपली मालमत्ता विकली – रॉबिन शर्मा
या पुस्तकात एका व्यक्तीची एक कथा आहे जी आपल्या कामामुळे आणि शरीराच्या आजाराने कंटाळल्यानंतर आपली सर्व संपत्ती विकून सत्याच्या शोधात बाहेर पडला आहे. मग कधीतरी त्याला काही संन्यासी मिळतात, त्यानंतर त्याचे आयुष्य जादूने बदलत जाते. हे अत्यंत प्रेरणादायी पुस्तक आहे.