लैंगिक संबंध न ठेवता गर्भधारणा करण्याच्या या पद्धती तुम्हाला माहिती आहेत का?

0

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की, स्त्री लैंगिक संबंध ठेवल्याशिवाय गर्भवती होऊ शकत नाही. म्हणजेच, जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तर पुरुष आणि स्त्रीचे मिलन होणे आवश्यक आहे असा समज आहे. परंतु हे होणे बंधनकारक नाही कारण आज आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगत आहोत ज्यायोगे लैंगिक संबंध किंवा संभोग करता घेता स्त्री गर्भवती होऊ शकते.
पण त्याआधी तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की कोणालाही लैंगिक संबंध न ठेवता मूल कशासाठी पाहिजे?
याची अनेक कारणे असू शकतात

बर्‍याच स्त्रियांना संभोगाच्या वेळी असह्य वेदना होतात. ज्यामुळे ते संभोग करण्यास असमर्थ असतात किंवा इच्छित नसतात अशा महिनांसाठी हे उपाय आहेत. तसेच Vaginismus आणि Vulvodynia सारख्या परिस्थितीमुळे लैंगिक संबंध खूप कठीण होते. तामुळेही महिला वेगळा मार्ग निवडतात. तसेच काही कारणास्तव पुरुष जोडीदारास लैंगिक संबंधात रस नसल्यास किंवा संबंध ठेवण्यास असमर्थ असल्यास लैंगिक संबंध न ठेवता मूल जन्माला घालण्याची इच्छा उत्पन्न झाल्याने स्त्रिया या पद्धती वापरतात.

स्प्लॅश गर्भधारणा

यामध्ये पुरुषाने पुरुषाचे जननेंद्रिय त्या स्त्रीच्या योनीत टाकण्याऐवजी तो अगदी जवळ घेतो आणि आपला शुक्राणू त्यामध्ये टाकतो. स्प्लॅशचा शब्दशः अर्थ म्हणजे छिडकने होय. अशा प्रकारे गर्भधारणा करण्याच्या प्रक्रियेस स्प्लेश गर्भधारणा म्हणतात. अशाप्रकारे जर पुरुषाचे वीर्य स्त्रीच्या योनीत शिरले तर गर्भवती होण्याची शक्यता असते. आपण ही पद्धत अवलंबण्याचा विचार करत असल्यास, ओव्हुलेशन वेळेच्या आसपास हे करावे लागेल. शुक्राणू पडल्यानंतर महिलेने काही काळ झोपले पाहिजे अशाप्रकारे गर्भधारणा होऊ शकते.

इंट्रायूटरिन इनसेमिशन किंवा व्हिट्रो फर्टिलायझेशन

जर तुम्हाला लैंगिक संबंध न ठेवता मूल हवे असेल तर आपण या कृत्रिम पद्धती देखील वापरू शकता. यासाठी आपल्याला रुग्णालयात जावे लागेल आणि भरपूर पैसे देखील खर्च करावे लागतील. या पद्धतींमध्ये डॉक्टर पुरुषाचे वीर्य किंवा शुक्राणू कृत्रिमरित्या त्या महिलेच्या योनी, ग्रीवा किंवा गर्भाशयात टाकतात. त्यामुळे गर्भधारणा होण्यास मदत होते.
या पद्धतीमुळे अपत्य होत नसलेल्या जोडप्याला मोठा फायदा होतो. परंतु या पद्धतींचा अवलंब करण्यापूर्वी आपण नैसर्गिकरित्या गर्भवती होण्याच्या सर्व पद्धती अवलंबल्या पाहिजेत, त्यानंतर त्यांची मदत घ्यावी. दरम्यान या पद्धतीला Test Tube Baby म्हणून सुद्धा संबोधले जाते.

घरगुती बीजारोपण किंवा “टर्की बस्टर मेथड”

जेव्हा अपत्य प्राप्तीचे इतर मार्ग संपतात त्यावेळी बरेच जोडपे ही पद्धत अवलंबतात. यासाठी एक निर्जंतुकीकरण केलेला कोरडा कप ज्यामध्ये वीर्य गोळा केले जाते. आणि पुढे सुई नसलेली सिरिंज(इंजेक्शन) आवश्यक आहे.

या पद्धतीत, मेल पार्टनरकडून शुक्राणू एका कपमध्ये गोळा केले जातात आणि नंतर सिरिंजमध्ये भरले जातात. त्यानंतर शुक्राणूंना सिरिंजद्वारे स्त्री जोडीदाराच्या योनीत इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर स्त्रीने पलंगावर काही काळ झोपले पाहिजे अशा पद्धतीचा फायदाही गर्भधारणेसाठी होतो.

या पद्धतीत खालील काळजी घेणे महत्वाचे आहे

  • घरगुती गर्भाधान वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • कधीही शुक्राणूंना सरळ युट्रस किंवा गर्भाशय ग्रीवामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नका. हे अत्यंत प्राणघातक ठरू शकते.
  • वीर्य इंजेक्शन देताना सिरिंजमध्ये हवा असू नये.
  • जरी या पद्धतीत महिला आणि पुरुष लैंगिक संबंध प्रस्थापित करीत नाहीत, तरीही एसटीडी-लैंगिक संक्रमित रोगाचा धोका आहे.
  • या पद्धतीत वापरलेली प्रत्येक गोष्ट पूर्णपणे नवीन, निर्जंतुकीकरण केलेली आणि पूर्णपणे कोरडे असावी.
  • काही ऑन-इन गर्भाधान किट बाजारात तसेच ऑनलाईन स्टोअरमध्ये विकल्या जातात, परंतु ही एक धोकादायक प्रक्रिया आहे, म्हणून जर आपण एखादा किट विकत घेतला तर डॉक्टरांना दाखवा, बर्‍याच वेळा चुकीच्या वस्तू विकल्या जातात.
  • शुक्राणू डोनरकडून शुक्राणू घेऊन हे कार्य करावयाचे असेल तर तुम्हाला त्याचे कायदेशीर नियम माहित असले पाहिजेत. कारण नंतर शुक्राणू देणारा मुलावर आपला अधिकार सांगू शकतो.
Leave A Reply

Your email address will not be published.