अनेकांना बिकिनी मधल्या नट्यांचे किंवा महिलांचे फोटोज पाहिला आवडतात. पण येत्या काळात जर चुकून तुमच्या नजरेत बिकिनी घातलेले मुलं दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आता काही फॅॅशन प्रेमी पुरुषांनीही महिलांच्या बिकीनीला टफ देण्यासाठी ब्रोकिनी आणली आहे.
ही ब्रोकिनी टोरंटो येथील दोन तरुणांनी घालून स्वतःचे फोटो शूट केले आहे. सध्या या दोन तरुणांचे फोटो सोशलमिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत. टोरंटो येथील चॅड सास्को आणि टेलर फिल्ड या दोन तरुणांनी बिचवेअरसाठी वन शोल्डर बिकनीची निर्मिती केली आहे, ज्याचं नाव आहे ब्रोकिनी आहे.
‘ब्रोकिनी’ हे पुरुषांसाठी खास बिकनी आहे.
जे दिसायला एकदम स्टायलिश असून सिंगल लाँग स्ट्रॅपमध्ये या बिकनी बनवण्यात आल्या आहेत. तसेच खालच्या बाजूने पुरुषांच्या अंडरवेअरप्रमाणे याचा आकार आहे. सध्या दोन प्रिंटमध्ये या बिकनी बाजारात विक्रीसाठी आल्या असून पहिली आहे ब्रोमिंगो (पिंक फ्लेमिंगो पॅटर्न) आणि दुसरी आहे फाइनअॅप्पलमध्ये (ब्ल्युसोबत येलो पाइनअॅप्पल).
पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या 250 बिकनीच्या निर्मितीसाठी 5 हजार डॉलरचा खर्च आला असून याची पहिल्यांदा विक्री 19 जुलै रोजी झाली असल्याची माहिती सास्को यांनी दिली आहे. वेबसाईटवर याचे काही फोटोज व्हायरल झाल्या असून त्याची किंमत ही 45 डॉलर इतकी असल्याची नोंद आहे.
(असेच युनिक आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या अमरवाणी पेजला फेसबुकवर लाईक करा)