fbpx
8.4 C
London
Wednesday, February 1, 2023

बहुपयोगी भिमसेनी कापूर ! रासायनिक कापूर ठरतील घातक, जाणून घ्या भिमसेनी कापराचे विविध फायदे आणि महत्व

रासायनिक कापूर आणि नैसर्गिक कापूर यातील फरक

आपण पूजेत जो कापूर वापरतो तो चक्क रासायनिक रित्या बनवलेला असतो. कॅम्फर म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार किटोन कार्बन संयुगांच्या वर्गात मोडतो. ज्याच्या ज्वलनाने हवेत शुध्दता न होता प्रदूषणच होत आसते. बाजारात स्वस्त मिळणारा कापूर हा एक प्रकारचा मेणचट, ज्वलनशील व पांढरट प्रकारचा रासायनिक प्रकार असतो . हा टरपिनॉईडचा रासायनिक फॉर्म्युला असून कॅम्फर लौरेल [ camphor laurel (Cinnamomum camphora), ] ह्या आशिया खंडाच्या जंगलात सापडणाऱ्या झाडात तसेच काही लौरेल कुटुंबीय झाडांच्या सालींमध्ये आढळतो. मात्र, जो आयुर्वेदिक कापूर असतो. त्याला भिमसेनी कापूर म्हणून ओळखले जाते.

कापराच झाड कस दिसतं ? कुठे मिळतं.

अशिया खंडातल्या पूर्वेकडच्या काही देशांमधील जंगलांमध्ये एक सदाहरीत झाड आढळते [ Dryobalanops aromatica -family Dipterocarpaceae ] . सुमात्रा, इंडोनेशिया आणि बोर्निओया देशांमध्ये आढळणाऱ्या ह्या झाडापासून कापूर निर्मिती होते. नैसर्गिक उत्पादन असलेल्या कापराची किंमत महाग असते. ज्याचा उपयोग खाण्यात, औषधांमध्ये, पूर्वापार धार्मिक विधींमध्ये केला जातो. मात्र, हल्ली जो कापूर आपण अगदी स्वस्त भावात विकत घेतो तो टर्पेन्टाईन प्रकारातलं ज्वालाग्रही रसायन असतं. हेच रासायनिक प्रमाण आपल्या विक्स वेपोरब सारख्या औषधांमध्ये वापरलेले असते. हा कापूर खाण्यास योग्य नसतो. याचे सेवन झाल्यास अनेक घातक परिणाम होऊ शकतात.

भिमसेनी कापूर हा आयुर्वेदिक उत्पादन असून त्यात कुठल्याही रसायनांचा सहभाग नसतो. सुमात्रा, बोर्निऒच्या जंगलात साधारण ८० ते १०० फ़ूट वाढणाऱ्या या झाडापासून हा भिमसेनी कापूर मिळतो. ही झाडं जसजशी मोठी होत जातात, तसतसं यांच्या उभ्या आडव्या खाचांमध्ये कापराची निर्मिती होते. हे प्रमाण कमी असल्यानेच हा कापूर महाग असतो. अनेक शतकांपासून या देशांमधून अनेक ठिकाणी कापराचा अर्क पाठवण्याचा व्यवसाय सुरु होता. कापराचे झाड अतिशय उंच वाढते नी जमिनीत लांबवर मुळं रुजवते. या झाडाचे बहुतेक सर्व भाग वापरले जातात. मोठ्यामोठ्या बांधकामांसाठी तसेच मजबूत वापरासाठी (जसे रेल्वेच्या स्लीपर्स फळ्या) या झाडाच्या लाकडाचा वापर होतो. कारण कापराचे लाकूड अतिशय मजबूत असते. या ताडमाड झाडाची फुले अगदी नाजूक एखसारखी असतात. यातूनच पुढे येणारी फळे साधारण ५ ते ६ सेंटीमीटरची पाच फाक्यांची असतात. यातूनच या झाडाचे बी बनते. या झाडाच्या पानांपासून पूर्वापार तैलार्क बनवला जातो. जो आजही अनेक देशांमधे त्वचेच्या अनेक उत्पादनांमधे वापरला जातो.

हे वाचल्यावर अनेकांना हा प्रश्न पडतो की, भारतात ही झाडं आहे का? हो, आहेत. आपल्या अनेक शासकिय व संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये ही झाडे लावून त्यावर प्रयोग केले जात आहेत. भारताखेरीज, चीन, जपानसह अनेक पाश्चिमात्य देशांमधे याच्या औषधी गुणधर्मांवर अधिकाधिक संशोधन होत आहे. आपले पूर्वज खूप हुशार होते. त्यांना या नैसर्गिक घटकांचा उपयोग व वापर माहिती होता.

भीमसेनी कापूर हा कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही. स्फटिकासारखा येतो. याचे गोल, चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही. कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेण नसते. रासायनीक कापूर पाण्यावर तरंगतो. भिमसेनी कापूर तरंगत नाही.

कापूर पवित्र का मानला जातो ?

जाणून घ्या धार्मिक कारण

शास्त्रानुसार देवी- देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.

आयुर्वेदिक भिमसेनी कापूर कसा वापरावा

१) सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत. नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
२) रूमालावर कापूर चुरडून तो हुंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा.
३) पर्यटनाच्यावेळी बर्फाळ प्रदेशात किंवा उंचावर चढताना धाप लागत असल्यास कापूर हुंगावा.
४) तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रित तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो. त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी .
५) केसातील कोंड्याकरीता : सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
६) या कापरात मेण नसल्यामुळे हा कापूर शुद्ध असल्याे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा. आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला विडा देताना कापूरमिश्रित विडा देतात तो हाच कापूर. दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात. श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.
७) दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही.
८) खोकल्याकरीता आयुर्वेदिक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात.
९) संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा. प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचित योगायोगाने आपले काम होईलही. शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध वेगवेगळे असते.

कापराचे अन्य काही उपयोग

प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येता एक छान सुगंध येतो. कपड्यांना कसर, झुरळ लागत नाही. पावसाळ्यात विशेषतः कपडे सुकत नाहीत ओलसर राहतात. असे कपडे बॅग मध्ये भरले की त्यांना येणारा कुबट वास कापूर ठेवल्यास जातो.

डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा. डास फिरकत नाहीतच शिवाय इतर कीटक, उंदीर वगैरे लांब राहतात.

कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात.

रुमालात काही कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते. चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही. डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही.

गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात गुडनाईट वडी किंवा लिक्विड ऐवजी त्यावर कापूर ठेऊन चालू करा. तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील, गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित.

कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल. शिवाय मोज्यामुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल

कापराचे वैज्ञानिक महत्त्व

वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की –
कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होउन वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.

१) सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापराचे तुकडे एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.
२) कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला वास येत असल्यास निघून जातो.
३) कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.
४) कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.
५) घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो.
६) मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास, घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
७) मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेटच्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घुशी येत नाहीत.
८) कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा बुबुळाच्या पाठील टिशूस् वर होतो.
९) गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने पाय दुखणे कमी होते व फुगलेल्या शिरा खाली बसतात. (५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी)*
कापूराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते.

संकलन : सतीश अलोणी

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here