सिगरेटच्या धुरानंतर फिल्टरही पर्यावरणास घातक, ‘ही’ माहिती वाचून तुम्हालाही बसेल धक्का

0

सिगरेट ही केवळ फुकणाऱ्याच्या नाहीतर आजूबाजूच्यांना देखील घातक आहे, असे अनेकदा आपण ऐकले आहे. स्मोकिंग हे अॅॅक्टीव्ह स्मोकरला जेवढे घातक आहे तेवढेच ते पॅॅसिव्ह स्मोकरलाही घातक आहे. हा धोका असतानाच आता नवीन एक माहिती समोर आली आहे. विझलेली सिगरेट देखील आपल्यासह प्राण्यांच्या आरोग्यला घातक ठरत आहे.

Cigarette

सिगरेटचा फिल्टर हा सध्या चर्चेचा केंद्र स्थानी आला आहे. अनेकजण सिगरेट फुकून झाल्यानंतर त्याचा फिल्टर रस्त्यावर किंवा पाण्यात टाकून देतात. हाच फिल्टर आज आपल्या अनेकांच्या अप्रत्यक्षरित्या जीवावर बेतत आहे.

दरवर्षी 4.5 हजार अरब ( 4.5 ट्रीलीयन) सिगरेटचे फिल्टर नदी, नाले, आणि समुद्रात सापडत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, सिगरेट पिणारे केवळ स्वतःलाच नाहीतर आपल्या पर्यावरणाला देखील धोक्यात आणत आहेत.

आज पर्यावरणात कचरा निर्मितीमध्ये सिगरेटचा देखील हात आहे. 1980 नंतर जगात जो पण कचरा जमा करण्यात आला आहे. त्यामध्ये 30 ते 40 टक्के कचरा हा एकट्या सिगरेटचा आहे.

जगात दरवर्षी 6 ट्रीलीयन सिगरेटचे उत्पादन होते त्यापैकी 4.5 ट्रीलीयन सिगरेटचे फिल्टर हे आपल्याला जंगलात, नदीत, जलाशयात आणि समुद्रात सापडतात. यावरून हे लक्षात येते की एक तृतींश सिगरेटचेच फिल्टर केवळ योग्य पद्धतीने कचऱ्यात फेकले जात आहे. बाकी सर्व सिगरेटचा राहिलेला भाग हा उघड्यावरच फेकून दिला जात आहे.

Cigarette filter

रस्त्यावर फेकलेली सिगरेट नंतर पावसाच्या पाण्याने नदी नाल्यांमार्गे समुद्रात जाते आणि याचा परिणाम मास्यांवर होताना दिसतो. सिगरेट विझवून फेकली तरी त्यामध्ये निकोटीन सारखे घातक रसायन आणि अर्सेनिक सारखे भयानक धातू तत्व शिल्लक असतात. ज्यामुळे पर्यावरणास मोठी हानी होते.

सिगरेटचे फिल्टर हे एक प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवलेले असतात. ज्याला सेल्युलोज एसिटेट म्हणतात. याच सेल्युलोज एसिटेटचे जैविक पद्धतीने विघटन होण्यासाठी कमीत कमी 18 महिने तर 10 वर्षाचा कालावधी लागतो. पण तुम्ही सिगरेट कुठे फेकली आहे यावरही याचे विघटन अवलंबून आहे.

सिगरेटचा झाडांवर देखील परिणाम होत आहे. जमिनीच्या सुपीकतेवर याचा परिणाम होत असल्याने झाडांचे आयुष्य कमी होत आहे.

सिगरेटचे व्यसन सुटावे म्हणून बरेचजण ई-सिगरेटचा सल्ला देत आहेत. यामुळे सिगरेटपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यात अधिकच वाढ झाली आहे. ई – सिगरेटमध्ये तंबाखूच्या ऐवजी द्रव रुपात निकोटीन असते. या द्रव रूपातील निकोटीनचे वाफेत रुपांतर करण्यासाठी यामध्ये एक इलेक्ट्रोनिक उपकरण लावण्यात येते. यामुळेच सिगरेटची वाफ आत ओढण्यास मदत होते.

E Cigarette

ई-सिगरेटमुळे कचरा कमी होईल असे अनेकांना वाटले होते. मात्र असे न होता लिक्विड निकोटीनचे बॉक्स मोठ्या प्रमाणात रस्त्यावर किंवा समुद्रकिनारी फेकले जात आहेत.
2014 ते 2017च्या दरम्यान या ई-सिगरेटच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तेवढ्याच प्रमाणात सिगरेटच्या कचऱ्यातही वाढ झाली आहे.

सिगरेटच्या पाकिटावर आपल्याला त्याच्या घातक परिणामांची सूचना दिली जाते. तरी देखील याचा विचार न करता आपण ती आनंद घेत ओढत असतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास करत असतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.