#Unique : प्राण्यांच्या रक्तापासून कोरोना बरा होणार का ?

0

आरोग्य :  कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना लस विकसित करण्याच्या प्रयत्नात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) हैदराबादमधील एका कंपनीने कोरोनावर उपचार करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.

हैदराबादस्थित फार्मास्युटिकल कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयसीएमआरने कोरोनावरील उपचारांसाठी शुद्ध अँटीसेरा विकसित केला आहे. त्यात प्राण्यांकडून घेतलेले रक्त हे सीरम आहे. त्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचा इलाज केला जातो.

उपचाराच्या या तंत्रामध्ये शरीरात विशिष्ट जीवाचा प्रतिकार करण्यासाठी आधीच एंटीबॉडी अस्तित्वात असतात. इथून मागे  रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी हे तंत्र एखाद्या विशिष्ट आजाराच्या उपचारात वापरले जात होते. या माध्यमातून आता कोरोना संक्रमित रूग्णांवरही उपचार केले जाणार आहेत.

आयसीएमआरने ट्वीटद्वारे म्हटले आहे की, कोरोनातुन बरे झालेल्या रूग्णांकडून प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो, परंतु एंटीबॉडी, त्यांची कार्यक्षमता आणि एकाग्रता ही वेगवेगळ्या रूग्णांपर्यंत बदलू शकते आणि म्हणूनच हा मार्ग एखाद्या रुग्णावर उपचार करण्याचा अविश्वसनीय मार्ग बनतो.

हे पण वाचा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.