नक्की वाचा ! चांदीचे दागिने परिधान करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे….

0

सुंदर, अतिसुंदर होते सौंदर्य जेव्हा तुम्ही चांदीचे दागिने परिधान करता. हे तर सर्वांना माहिती आहे की, चांदीने बनवलेले दागिने घालणे सर्वांना आवडतात. चांदीचे पैंजण पायात घालून छुन- छुन करत चालणे, हा तर काही मुलींचा आवडता छंद असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, चांदीचे दागिने अंगावर परिधान करण्याचे अधिकाधिक फायदे आहेत. आरोग्यासाठी चांदीचे दागिने घालणे खूप फायदेशीर आहे. बाळाला चांदीच्या भांड्यांमध्ये अन्न देतात, हे तर तुम्ही ऐकलेच असणार. चला तर जाणून घेऊयात चांदी परिधान करण्याचे आरोग्यदायी फायदे….

आपल्या हिंदू धर्मात चांदीला अतिशय शुभ आणि पवित्र मानले आहे. आधीच्या काळात लोक चांदीच्या ताटात किंवा केळीच्या पानावर जेवण करत असत. त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम असायचे. चांदीच्या पात्रात जेवण केल्याने शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर होतात. स्त्रियांच्या अनेक व्याधी दूर करण्याचे कार्य चांदी करते. चांदी मुळात थंड प्रकृतीची असते. म्हणूनच चांदीचे दागिने भारतीय स्त्रिया घालतात. पूजेत देखील चांदीच्या पात्रांना महत्त्व आहे आणि त्यांचे उपयोग केले जातात.

बाळाच्या जन्माच्या 6 महिन्यानंतर त्याला चांदीच्या ताटात जेवू घातले जाते. चांदीच्या ग्लासाने पाणी पाजलं जाते. तसं तर चांदीच्या ताटात किंवा पात्रात प्रत्येकानेच जेवायला हवे. लहान मुलांना दिल्यास त्यांचा शारीरिक, मानसिक विकास चांगला होतो. बाळाला अनेक व्याधी आणि आजारांपासून संरक्षण करता येते. बाळास चांदीत जेवू घातल्याने किंवा पाणी पाजल्याने  पोटदुखी, डायरिया, पोटाचे इतर आजारानं पासून रक्षण होते. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते, आणि अन्य संसर्गापासून रक्षण होते.

चांदीचे पैंजण जास्तीत जास्त स्त्रिया परिधान करतात. पैंजण हे महिलांच्या पायाच्या सौंदर्यात बरीच भर पाडतात. पैंजण फक्त एवढंच काम करतात असं जर तुम्ही समजत असाल तर ते मात्र चुकीचं आहे. कारण पैंजणांमुळे प्रकृतीलाही बरेच फायदे होतात. तर वास्तू शास्त्राच्या दृष्टीने पाहायला गेल्यास पैंजणाच्या आवाजाने घरातील नकारात्मक शक्तीही कमी होतात आणि सकारात्मक शक्ती वाढीस लागतात असं म्हटलं जातं.

आरोग्यदायी इतर फायदे :

  •  ज्या महिलांना पायांची सूज असेल त्यांच्यासाठी चांदीचे पैंजण हे फारच उपयुक्त ठरू शकतात. यामुळे रक्तप्रवाहही योग्य पद्धतीने होतो. त्यामुळे पायांची सूज ही नैसर्गिकरित्या कमी होते.
  • यामुळे शरीरातील उर्जा कायम राहते. चांदी हे बहुगुणी असं धातू आहे. जी शरीराती उर्जा वाया जाऊ देत नाही. शरीरातील निघणारी उर्जा पुन्हा शरीरात पाठवण्याचं कार्य चांदी करतं.
  • चांदीचे पैंजण घातल्यास शरीरची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. यामुळे शरीरातील लिम्फ ग्रंथी सक्रिय करतात.
  • पायात चांदीच पैंजण परिधान केल्याने महिलांना स्त्री रोगसंबंधी विकार, हार्मोन्स असंतुलन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
  • जर तुमचे पाय कायम दुखत असतील तर पैंजण घातल्याने तुम्हाला नैसर्गिकरित्या आराम पडू शकतो. तसेच यामुळे सकारात्मक उर्जाही मिळते.
  • चांदी शुद्ध धातू आहे. ह्यात समाविष्ट अँटी मायक्रोब्रियल शरीरास रोगांपासून रक्षण करते. यामुळे शरीरात कुठलेही संक्रमण होत नाही.
  • चांदी थंड धातू असल्याने बाळाच्या आरोग्यास चांगली असते.शरीरातील उष्णतेला कमी करते. त्यामुळे बाळ शांत राहतं, उग्र किंवा तामसी होत नाही.उन्हाळ्यात चांदीचा ताटात जेवू घालावे,आणि चांदीचा ग्लासा मधून पाणी किंवा दूध पाजावे.
  • लहान मुलं नाजूक असतात त्यामुळे त्यांची शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमकुवत असते. ते लवकर आजारी पडतात. चांदीचा वापर केल्याने या धातूचे काही अंश  जेवणातून शरीरात जातात आणि त्यामुळे मुलांची रोग प्रतिरोधक शक्ती सुदृढ होते आणि मुलं निरोगी राहतात.
  • सततच्या पित्त दोषांच्या त्रासामुळे लहान मुलांना नेहमीच सर्दी पाडसाच्या त्रास होतो. चांदी वापरल्याने मुलांना या त्रासांपासून मुक्ती मिळते.
  • जेवणातून चांदीचे कण पोटात गेल्याने मुलांच्या स्मरणशक्तीस वाढण्यास मदत होते आणि ते निरोगी व सुदृढ बनतात.

हे पण वाचा

पुरुषांमध्ये स्त्रियांचा ‘हा’ आजार का वाढत आहे? जाणून घ्या कारण

आज्जीचा बटवा:  विड्याच्या पानांचे ‘हे’ औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का ? 

आज्जीचा बटवा : मुखशुद्धीसाठी असलेली विलायची आहे अधिक गुणकारी, जाणून घ्या फायदे….

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.