आरोग्य : जगभरात कोरोनाचा प्रसार वाढताच प्रत्यके देशाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले. प्रत्यके देशाने जन जागृती करत मास्क हाच कोरोनावरचा अंतिम आणि सोपा इलाज असल्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी वावरताना, दोन व्यक्तींशी संवाद साधताना मास्क हा असलाच पाहिजे असा नियम अनेक देशांच्या प्रशासनाने केला आहे. मात्र हाच मास्क जीवघेणा देखील आहे, अशा अफवा आता पसरत आहेत.
मास्कच्या वापराने शरीरात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे फुफ्फुस, हृद्य, आणि मेंदूवर कमी ऑक्सिजन असल्याने ताण येतो अशी अफवा अनेकांमध्ये पसरली आहे. अनेकांनी मास्क घातल्यानंतर चालताना किंवा पळताना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचीही तक्रार केली आहे. याच संदर्भात अमेरिकेच्या एका संस्थेने अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला आहे.
शरीरात कार्बन डाय ऑक्साईडची जास्त प्रमाणात असणे ही एक वाईट गोष्ट आहे ही एक सामान्यत: स्वीकारलेली वस्तुस्थिती आहे. जेव्हा शरीरात कार्बन डाय ऑक्साईडची पातळी वाढते तेव्हा अॅॅसिडोसिस होतो जेथे रक्ताचे पीएच 7.35 पेक्षा कमी होते आणि म्हणून ते अम्लीय होते.
अॅॅसिडोसिस (पेशीमधील विषार आम्ल) शरीराच्या मुख्य अवयवांना ऑक्सिजनपासून वंचित करते, यामुळे अवयवांचे नुकसान होते. मेंदू, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि हृदय यावर याचा अफाट परिणाम दिसून येतो. कदाचित यामुळे अगदी मृत्यू देखील ओढवतो.
याच संदर्भात अमेरिकन थोरॅसिक सोसायटीने केलेल्या एका अभ्यासानुसार दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असताना मास्क परिधान केल्याने शरीरात कार्बनडाय ऑक्साईड वाढत नाही, असा निष्कर्ष आला आहे. अगदी फुफ्फुसाच्या आजार असलेल्या रूग्णांमध्येही असा कोणताचं धोका संभवत नाही.
यासाठी अभ्यासकांनी काही चाचण्या घेतल्या. यासाठी स्वस्थ नागरिक घेतले. तर काही फुफ्फुसाचे आजार असलेले रुग्ण घेतले. या दोघानांही मास्क घालून चालण्यास सांगितले. तब्बल एक तास चालून देखील या दोघांच्या शरीरात कार्बन डाय ऑक्साईड प्रमाण वाढले नव्हते. तर ऑक्सिजनची पातळी देखील योग्य होती.
यावेळी अभ्यासकांनी काहीजणांना जोरात चालण्यास सांगितले. तर काहीजणांना हळूहळू चालण्यास सांगितले.या अभ्यासात काही सौम्य बदल जाणवले. मात्र त्यामुळे जीविताला कोणता धोका निर्माण होईल याची शक्यता फार कमी असल्याचं, अभ्यासकांनी म्हटले आहे. काहीवेळा मानसिकरित्या देखील शरीरात असे बदल जाणवत असतात.
कोरोना काळात मास्कचा वापर करणे गरजेचा आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता मास्क घालणे बंद करू नका. करण कोरोनापासून सहजरित्या स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क हा सोपा आणि जालीम इलाज आहे.
हे पण वाचा