दागिने म्हणजे स्त्रियांच्या विक पॉइंट असतो. दागिने खरेदी करणे त्यांच्या आवडीचा विषय आहे. त्यांची निगा राखण्यासाठी स्त्रिया वेगवेगळे पाऊचेस, बॅग्स आणि बॉक्सेस खरेदी करतात. मात्र त्यांचा एक वेगळा खर्च पडतो. दागदागिने खरेदी केल्यानंतर ते व्यवस्थित राखणे सर्वात महत्वाचे आहे. आज आम्ही सांगणार आहोत की, आपण आपल्या दागिन्यांची काळजी कशी घेऊ शकता.
बघा या खास टिप्स..
- थेट दागिन्यांवर परफ्युम कधीही शिंपडू नका.
- कुंदनचे दागिने प्लास्टिकच्या बॉक्समध्ये स्पंज किंवा कापसासह ठेवणे आवश्यक आहे, कारण इतर रसायनांच्या संपर्कात आल्यास ते काळे पडू शकतात.
- पन्ना एक अतिशय मऊ आणि नाजूक दगड आहे. पन्नाचे दागिने बसून घाला म्हणजे ते पडून तुटण्याची शक्यता राहणार नाही.
- बसरा मोत्यांचे दागिने मलमल कापडात गुंडाळून ठेवा. उन्हाळ्यात त्यांना घालणे टाळा. घामामुळे त्यांची चमक जाण्याची शक्यता असते.
- दागिन्यांना जास्त रकाने असलेल्या बॉक्समध्ये ठेवा. किंवा वेगवेगळे ठेवा. सोबत ठेवल्यास दागिन्यांवर स्क्रॅच पाडण्याची शक्यता असते किंवा एकेमेकांमध्ये गुंतून ते तुटू शकतात.
- हिऱ्याशिवाय अन्य कुठल्याही दागिन्याला साबणाच्या पाण्याने धुवू नका.
- दागिन्यांवरून डाग धब्बे मिटवण्यासाठी इरेजरचा वापर करा.
- विशिष्ट कालावधीनंतर दागिने स्वच्छ करत रहा. असे केल्याने दागिने नेहमी स्वच्छ, चमकदार आणि नवे राहतील. प्रत्येक दागिना किंवा स्टोनला एकाच पद्धतीने स्वच्छ करू नका.
- सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांची निगा राहण्यासाठी आपल्या सोनाराकडून सल्ले घेत राहणे आवश्यक आहे.
- स्वयंपाक करणे, व्यायाम करणे, घरचे इतर काम करणे इ. मध्ये शक्यतो दागिने काढून ठेवा. त्याबरोबरच गर्मीमध्ये रत्न घालू नका कारण रत्नांचा रंग उडून तो रंगहीन होऊ शकतो.
- दागिन्यांना काही नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून लोशन, मेकअप आणि परफ्युम लावल्यानंतरच दागिने घाला.
हे पण वाचा