fbpx

घरच्या उशा स्वच्छ करताना होतोय त्रास तर वापरा सोपी पद्धत

घरच्या उशा स्वच्छ करताना होतोय त्रास तर वापरा सोपी पद्धत

0

बेडशी संबंधित अशा अनेक गोष्टी असतात ज्याची आपल्याला स्वच्छता करावीच लागते. पण तुम्हाला सर्वात जास्त त्रासा होतो तो घरच्या उशा स्वच्छ करताना. तुम्ही जर घरातील उशी सहा ते सात महिने तशीच वापरत असाल तर तुम्ही नक्कीच आजारांना निमंत्रण देत आहात. बेडशीट्स आणि उशांचे कव्हर्स यासह उशी धुणंही गरजेचं आहे. काही जण सहा महिने उशांचा वापर करतात आणि मग फेकून देतात. तर काही जण उशांचे कव्हर्स बदलणं हेच उशीची निगा राखणं आहे असं मानतात. पण असं अजिबात नाही. तुम्हाला उशा स्वच्छ करणंही गरजेचे आहे. वेळोनवेळी उशी धुणेही गरजेचे आहे. तुम्हाला जर आता प्रश्न पडला असेल की, उशा नक्की कशा धुवायच्या. तर आम्ही तुम्हाला उशा स्वच्छ करण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत. तुम्ही याचा वापर करून आपल्या उशांची काळजी घेऊ शकता. इतकंच नाही तर तुम्ही मशीनमध्येही सोप्या पद्धतीने उशा स्वच्छ करू शकता.

पहिली पद्धत

सर्वात पहिले तुम्ही उशीचे कव्हर्स तपासून घ्या त्यावर काही डाग लागला आहे की नाही. जर असेल तर तुम्ही धुण्यापूर्वी त्यावर डिटर्जंट स्प्रे फवारा आणि 15 मिनिट्स तसंच राहू द्या. आता वॉशिंग मशिनच्या ड्रममध्ये तुम्ही उशा टाका. वॉशिंगमध्ये उशा धुणं शक्य आहे आणि अत्यंत सुरक्षितही आहे. एकावेळी तुम्ही केवळ दोनच उशा आतामध्ये टाकू शकता. यामुळे या उशा एकमेकांना टक्कर देणार नाहीत आणि व्यवस्थित धुतल्या जातील.

दुसरी पद्धत

उशा धुण्यासाठी तुम्ही व्यवस्थित म्हणजे ना जास्त ना कमी अशा स्वरुपात डिटर्जंट डिस्पेन्सर घाला. जर तुम्हाला वाटत असेल की, जास्त डिटर्जंटचा वापर केल्याने उशा अधिक चांगल्या धुतल्या जातील तर तुम्ही अत्यंत चुकीचे आहात. यामुळे केवळ जास्त फेस येतो आणि त्यामुळे उशीतून साबण काढणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही साबण घालताना अगदी प्रमणाता याचा वापर करा आणि उशा धुताना याची काळजी घ्या.

तिसरी पद्धत

उशा हलक्या गरम पाण्याने स्वच्छ करा आणि वॉशिंग मशीनमध्ये घालून दोन वेळा मशीन चालू करा. लक्षात ठेवा यामधील साबण  व्यवस्थित निघून जातो की नाही याकडे नीट पाहा. वॉशिंग मशीन दोन वेळा चालविल्यानंतर हे ड्रायरला लावा. ड्रायरमधून काढण्यासाठी तुमची उशी जर कापसाची  असेल तर ड्रायर हा एअर क्लफ नो हिट मोडवर ठेवा. तसंच जर उशी सिंथेटिक असेल तर ड्रायर कमी हिटवर ठेवा.

चौथी पद्धत

हे सुकविण्यासाठी टेनिस बॉलचा वापर करू शकता. टेनिस बॉल्स तुम्ही एका स्वच्छ मोज्यामध्ये घाला. त्यानंतर तुम्ही तुमच्या उशीसह ड्रायरमध्ये हे घाला. यामुळे उशी पटकन सुकते. ड्रायर सुरू केल्यावर तुम्हाला उशी फुललेली दिसून येईल आणि ही पटकन सुकेलही.

पाचवी पद्धत

फायबरमिलसाठी कमीत कमी मीडियम हिटवर किमान एक तासापर्यंत उशी सुकवा आणि मग डाऊन हिलसाठी एक्स्ट्रा घ्या अथवा नो हिटचा पर्याय निवडा. ड्रायरचे काम झाल्यावर तुम्ही उशी नीट तपासून घ्या आणि कोणत्याही बाजून उशी ओली तर नाही ना हे पाहून घ्या. त्यानंतर साधारण अर्धा तास तसंच राहू द्या. उशी नवी दिसण्यसाठी याचे कव्हरही स्वच्छ धुवा आणि त्याचा  वापर करा. तसंच उशी सुकविण्यासाठी एका स्वच्छ ठिकाणी ठेवा जिथे धूळ  अथवा घाण चिकटणार नाही.

महत्त्वाची बाब

उशा स्वच्छ करताना काही महत्त्वाच्या बाबी तुम्ही लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

वर्षातून किमान 3-4 वेळा उशी धुवायला हवी.  कारण उशीवर तेल, कोंडा,  घाम सगळेच चिकटलेले असते

दोन ते तीन महिन्याच्या आत उशीमधून घाण वास येऊ लागतो. त्यामुळे वेळोवेळी याची स्वच्छता होईल याची काळजी घ्या

जर तुमची उशी धुण्याच्या परिस्थितीत नसेल तर तुम्ही ती उशी वापरू नका. फेकून द्या

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.