fbpx
5.5 C
London
Sunday, December 4, 2022

दररोज गूळ खाणे शरीरासाठी आहे फायदेशीर, ‘या’ आजारांना ठेवाल कायमचे दूर

आपण जे पदार्थ दररोजच्या जेवणात खातो त्या प्रत्येक पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म असतात. आज आपण आयुर्वेदिक महत्व असणाऱ्या गुळाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला दमा असल्यास, गुळ आपल्या स्वयंपाकघरात असणे आवश्यक आहे. गुळामध्ये काही घटक असतात जे श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात. गुळामध्ये भरपूर प्रमाणात साखर, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात, जे आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी चांगले मानले जातात. कॅल्शियम व्यतिरिक्त, लोह, फॉस्फरस, प्रथिने, बी जीवनसत्व असते. गुळामुळे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊयात.

गुळामुळे हाडे मजबूत होतात

गुळामुळे हाडे मजबूत होतात. विशेषत: अशा लोकांसाठी ते फायदेशीर ठरतात ज्यांना नेहमीच सांधेदुखी असते. गूळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. दुसरीकडे, जर एखाद्याला हिवाळ्यामध्ये सांधे दुखण्याचा त्रास होत असेल तर दररोज आल्याच्या तुकड्यासोबत गूळचा तुकडा खा. असे केल्याने तुम्हाला फायदा होईल.

दम्यावर प्रभावशाली

दम्याच्या रूग्णांसाठी गुळ फायदेशीर आहे. हे केवळ शरीराचे तापमान नियंत्रित करतेच परंतु अँटीएलर्जीमुळे दम्याच्या रूग्णाला आराम देते. त्यामुळे दम्याच्या रुग्णाने निरंतर गुळाचे सेवन केले पाहिजे.

लोहाची कमतरता दूर होईल

गूळ खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता कधीच उद्भवणार नाही. विशेषत: जे अशक्तपणाचा बळी आहेत त्यांनी साखरेऐवजी गूळ खावा. याचा त्यांना फायदा होईल.

हिवाळ्यात फायदेशीर

हिवाळ्यात आपल्यासाठी गुळाचा वापर अमृतसारखा असेल. त्याच्या उबदारतेमुळे आपल्याला सर्दी आणि विशेषत: कफपासून दूर ठेवण्यास मदत करेल. यासाठी गूळ, दूध किंवा चहामध्ये टाकून प्यायले पाहिजे. तसेच आपण त्याचे डीकोक्शन देखील तयार करू शकता.

शरीराला ऊर्जा देते

जर तुम्हाला खूप थकवा व अशक्तपणा जाणवत असेल तर गुळ खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. खास गोष्ट अशी की गुळाचे पटकन पचन होते आणि उर्जेची पातळी वाढते. म्हणून जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा लगेच गूळ खा. मात्र मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी गूळ खाणे टाळावा.

गुळाविषयी अधिक माहिती

गुळ तयार करताना यातील पोषकद्रव्ये वेगळी केली जात नाहीत. बहुतांशी नवीन पिढीसाठी गुळाची ओळख केवळ साखरेसाठी पर्याय अशी आहे परंतु गुळाचा अभ्यास केला तर निश्चितच यातील गुणधर्मांची ओळख पटेल. गुळाला एक औषधी म्हणून सुद्धा महत्व आहे आणि ते परंपरेने चालत आले आहे. गुळाच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख अगदी पुरातन काळापासून सापडतो. सुश्रुत संहीतेमध्ये गुळाचे वर्णन रक्तशुद्धीकारक, अत्युच्च मुल्ये असलेला, वात व पित्त दोषांचे शमन करणारा व यकृताचे रक्षण करणारा पदार्थ असे आहे.

गुळातील पोषकद्रव्यांकडे एक नजर टाकू. 100 ग्राम गुळापासून मिळणारे घटक.

कँलरीज – 383 सुक्रोज – 65 ते 85 ग्राम फ्रुक्टोज व ग्लुकोज 10 ते 15 ग्राम प्रोटीन्स 0.4 ग्राम फँट 0.1 ग्राम

मित्रांनो गुळात असणा-या मिनीरल्स कडेही एक नजर टाका. साधारणत: 100 ग्राम गुळापासून आपणाला 11 मिलीग्राम लोह मिळते. म्हणजे शरीरासाठी लोहची जी दैनंदीन गरज आहे त्याच्या साधारणत: 61 टक्के गरज 100 ग्राम गुळापासून पूर्ण होते. साधारणत: 1 चमचा गुळापासून आपली 12 टक्के गरज पूर्ण होते. लोह शिवाय गुळात मँगनीज 10 ते 20 टक्के, मँग्नेशिअम 20 टक्के तसेच पोटँशिअम साधारणत: 30 टक्के असते. यासोबतच गुळापासून मोठ्या प्रमाणात बी काँम्प्लेक्स तसेच कँल्शीअम, झिंक, फाँस्फरस व काँपर ही मूलद्रव्ये मिळतात.

मित्रांनो आजकाल गुळाला आकर्षक करण्यासाठी काही रसायनंचा वापर केला जातो. रसायनविरहीत गुळ काळा दिसतो. बाजारात आकर्षक रंगाचा गुळ दिसला तर ओळखावे की त्यात रसायने मिसळली आहेत.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here