अपयशाने सारं काही संपत नसतं ! उठ मर्दा… यशस्वी होण्यासाठी ‘या’ १० गोष्टी कायम लक्षात ठेव

0

हिंदी मधील प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे “असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गयी तो देखो और सुधार करो” या ओळींप्रमाणे असफलता हे दुःख न मानता त्यातून योग्य तो बोध घेऊन यशस्वी होण्यासाठी चा प्रयत्न करणे महत्त्वाचे असते.

प्रत्येक व्यक्तीकडून जीवन जगत असताना काही ना काही तरी चुका होतातच आणि चुकांमधूनच तो घडतही असतो ती चूक पुन्हा होणार नाही यासाठी प्रयत्न करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच दहा गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता

१) अपयशाने सारं काही संपत नसतं

अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे अपयश आल्यास खचून न जाता त्या अपयशातून शिकून पुढे गेल्यास यश निश्चितच प्राप्त होईल.

२) आपले अपयश स्वीकारा

जे घडून गेले तो आपला भूतकाळ आहे तो सोडून द्या आणि पुढे नित्य निरंतर चालत रहा. आपण अपयश स्वीकारणे आणि पुढे चालत राहणे हे केव्हाही चांगलेच.

३) स्वतःला बदलण्याची इच्छाशक्ती ठेवा जगाला बदलण्याची नाही

बऱ्याचदा एखादी चूक झाली अथवा अपयशी झाल्यानंतर आपण परिस्थितीला दोष देऊन मोकळे होतो. परंतु आपण केलेल्या चुका त्या आपल्या अपयशाचे कारण ठरतात त्यामुळे परिस्थितीला दोष न देता स्वतःला बदलण्याची जाज्वल्य इच्छाशक्ती ठेवा.

४) अयशस्वी झाल्यानंतर स्वतःला सामर्थ्यवान बनवा

बऱ्याचदा आपल्याला अयशस्वी होण्याची भीती वाटते किंवा त्या गोष्टीला आपण घाबरतो.हे अपयश हे तुझे अंतिम अपयश आहे असे समजून पुढे चालत राहा स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवा भूतकाळातील चुकांमधून योग्य तो बोध घेऊन भविष्यकाळाकडे मार्गक्रमण करा.

५) आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा

या अपयशामुळे आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं सोडणे चुकीचे आहे अपयशावर मात करून आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊले टाकून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा.

६) कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही

संपूर्ण विश्वात अशी कोणतीही व्यक्ती नाही ती संपूर्णतः परिपूर्ण आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवसा कडून आपण काही ना काहीतरी शिकतच असतो. स्वतःची कमतरता आणि उणिवा ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास तुम्ही आपोआपच यशस्वी व्हाल.

७) प्रत्येक वेळ महत्त्वाची आहे

आपल्याला मिळणाऱ्या चोवीस तासातील प्रत्येक वेळ प्रत्येक सेकंद आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे वेळेवर लक्ष केंद्रीत करा संपूर्ण जग हे वेगवान झालेल्या आहे. वेळेचे पालन केल्यास यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

८) आपल्या मर्यादा वाढवा

यशस्वी होण्यासाठी आराम आणि कंटाळा हे शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकले पाहिजेत तुला कम्फर्ट झोन सोडून मर्यादेच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे.

९) कोणाशीही तुलना करू नका

वरती सांगितल्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही त्यामुळे कधीच कोणाशी तुलना करू नका प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती खासच आहे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगळी कौशल्य आहेत त्यामुळे मी उत्तम आहे हा विचार मनामध्ये ठेवा आणि कोणाशीही तुलना करू नका.

१०) जीवनाचा आनंद घ्या

प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये एक चांगला बदल घडविला पाहिजे. आपले जीवन हे एखाद्या प्रवाहासारखे आहे असे म्हणून पुढे जा अयशस्विता आणि असफल ते शिवाय आपले जीवन अपूर्ण आहे त्यामुळे येणार्‍या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि जीवन परिपूर्ण करा.

 – संकेत देशपांडे 

Leave A Reply

Your email address will not be published.