fbpx
8.4 C
London
Wednesday, February 1, 2023

सिम्पल आऊटफिटमध्ये आकर्षक लुक मिळवण्यासाठी, फॉलो करा कॅटरिनाचा ड्रेसिंग सेन्स

बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ बी टाऊनची सगळ्यात सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्री आहे. कॅटरिना कैफ आपल्या ग्लॅमरस लुकसोबत नेहमीच इंटरनेट विश्वामध्ये आपली जादू पसरवत असते. २००३ मध्ये ‘बूम’ या हिंदी चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बी टाऊनच्या टॉप एक्टरेसच्या लिस्ट मध्ये कॅटरिना कैफचे देखील नाव आहे.

कॅटरिना कैफ नेहमी फॅशनेबल लुक मध्ये असते. तिचे लुक सगळ्या मुलींकरता प्रेरणादायी आहेत. ती जास्तकरून सिम्पल आऊटफिट मध्ये असते. पण या सिम्पल आऊटफिट सोबतच ती खूप स्टायलिश आणि सुंदर दिसते. तिचे सिम्पल ग्लॅमरस लुक सर्व मुलींनी फॉलो करावे असेच असतात.

शॉर्ट ड्रेस लुक

कॅटरिना कैफ तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. बर्‍याचदा इंटरनेटवर कॅटरिना कैफचा फॅशनेबल लूक व्हायरल होतो. कॅटरिना कैफच्या या लूकमध्ये तिने फुलांच्या डिझाइनचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. शॉर्ट ड्रेसमध्ये कॅटरिना खूपच क्यूट दिसत आहे. तिने या ड्रेस सोबत हलके मेकअप केले आहे. हलके मेकअप आणि ओपन हेअरमध्ये हा लुक तुम्ही कॅरी करू शकता.

katrina kaif

ट्रेडिशनल लूक

कॅटरिना कैफ बर्‍याचदा आपल्या सिम्पल लूकमुळे चाहत्यांना प्रभावित करते. या लुक मध्ये तिने सिम्पल पारंपारिक ड्रेस घातला आहे. पारंपारिक ड्रेसबरोबर तिने हलका मेकअप केला आहे. फिकट तपकिरी रंगाच्या लिपस्टिकमध्ये कॅटरिना कैफ खूपच सुंदर दिसत आहे.

katrina kaif traditional

साडी लूक

कॅटरिना कैफ वेस्टर्न ड्रेसपासून ते इंडियन आउटफिटपर्यंत सर्व ड्रेसेसमध्ये अप्रतिम दिसते. व्हाइट साडीमध्ये कॅटरिना कैफ खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही कॅटरिना कैफचा हा लुकदेखील कॅरी करू शकता. कॅटरिना कैफने व्हाइट साडीसह लाईट मेकअप केला आहे. फिकट तपकिरी रंगाची लिपस्टिक बहुतेक
कॅटरिनाची आवडती असावी कारण या लुक मध्ये देखील तिने फिकट तपकिरी रंगाची लिपस्टिक लावलेली आहे. यात ती खूपच क्यूट दिसत आहे.

katrina kaif saree

ऑफ शोल्डर ड्रेस

कॅटरिना कैफ बी टाऊनमध्ये साधेपणा आणि साध्या स्टाईलसाठी ओळखली जाते. कॅटरिना कैफने यलो कलरमध्ये ऑफ-शोल्डर ड्रेस घातला आहे. मोकळे केस आणि फिकट गुलाबी रंगाच्या लिपस्टिकमध्ये कॅटरिना कैफ खूपच सुंदर दिसत आहे. मुलींनी हा लुक एकदा तरी नक्की ट्राय करावा.

katrina kaif

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here