नवरात्रीच्या उपवासात थकवा जाणवतो का ? असे होत असेल तर ‘हे’ ज्यूस नक्की ट्राय करा…

0

संपूर्ण भारतात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नऊ दिवसांमध्ये अनेकांना उपवास असतो. नऊ दिवसांचा मोठा उपवास असल्याने या काळात वेगवेगळे पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जातात. मात्र या काळात आलप्या आरोग्याचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य सांभाळणे महत्वाचे ठरते. या उपवासाच्या काळात वेगवेगळ्या ड्रिंक्स तुम्हाला ताजेतवाने ठेवण्याचे काम करतील. आज आपण अशाच काही एनर्जी ड्रिंक्सबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतील.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियम हे पाच महत्त्वपूर्ण पौष्टिक घटक आहेत. या व्यतिरिक्त, हे अँटीऑक्सिडेंटमध्ये देखील समृद्ध आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये याचे सेवन फायदेशीर ठरेल.

coconut water (1)

 

लिंबाचा सरबत

लिंबाचा सरबत फक्त उन्हाळ्यातच पिला जात नाही तर जेव्हा तुम्हाला उर्जा आवश्यक असेल तेव्हा तो पिता येतो. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि विद्रव्य ग्लूकोज असते जे शरीरात जाऊन आणि रक्तामध्ये विरघळतात त्यामुळे शरीराला खनिजांची पूर्तता होते.

बनाना शेक

केळी त्वरित उर्जा देण्याचे काम करते. त्यामुळे आपण बनाना शेक पिऊ शकता. त्यामध्ये उपस्थित ग्लूकोज, जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम आणि फॉस्फरस आपली थकवट दूर करून उर्जा पातळी वाढवण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Banana shake

 

अॅॅप्पल ज्यूस

सफरचंदचा रस देखील आपल्याला भरपूर ऊर्जा देते आणि बर्याच काळासाठी ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. हे दुधासह शेक बनवून देखील पिले जाऊ शकते.

बीटाचा रस

आजकाल बीटाचा रस बाजारात सहज मिळतो. हे कार्बोहाइड्रेटने परिपूर्ण आहे, जे आपल्या शरीरात त्वरित ऊर्जा संक्रमित करते. सकाळी हे पिऊन आपण दिवसभर तंदुरुस्त राहू शकता.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.