जाणून घ्या ! हिंदू शास्त्राने पितृपक्षाला का दिले आहे एवढे महत्व

0

गणेश विसर्जनानंतर हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार येणार काळ हा ;पक्ष पंधरवडा’ म्हणून पाळला जातो. घरातील व्यक्ती मृत झाल्यावर, त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध मातृ व पितृ वंशपरंपरेतील मागील तीन पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते.

या वेळी श्राद्ध पक्ष 2 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. प्रतिपदेचे पहिले श्राद्ध 1 सप्टेंबरला होणार आहे. यावर्षी पक्ष पंधरवड्याचा समारोप 17 सप्टेंबर रोजी होईल. शेवटचा श्राद्ध म्हणजेच अमावस्या श्राद्ध 17 सप्टेंबरला होईल.

हिंदू ज्योतिषानुसार, पितृ दोष सर्वात जटिल कुंडली दोषांपैकी एक मानला जातो. ब्रह्मा वैवर्त पुराणानुसार देवांना प्रसन्न करण्यापूर्वी मनुष्याने आपल्या पूर्वजांना प्रसन्न केले पाहिजे. असे मानले जाते की ज्यांचे पूर्वज सुखी आहेत त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.

पूर्वजांच्या शांतीसाठी भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून अश्विन कृष्ण अमावस्या पर्यंत दरवर्षी पितृपक्षाचे श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की पूर्वज पृथ्वीवर या वेळी आहेत, म्हणून पितृपक्षात श्राद्ध करून ते त्यांचे आशीर्वाद देतात.

हे श्राद्ध भाद्रपद पक्ष पंधरवड्यातच का करायचे ?

याविषयी धर्मशास्त्राने खगोलशास्त्राचा आधार घेऊन, एक भूमिका मांडली आहे. ती म्हणजे, दक्षिणायन आणि उत्तरायण अशी सूर्याभोवतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेतील कालमापनाची गणना सर्वपरिचित आहेच. पृथ्वीवरील एक दिवस हा चोवीस तासांचा मानला गेला आहे, पण जे मृत झाले, त्या जिवांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र, तसेच दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असते. कर्क संक्र मणापासून धनुसंक्र मणापर्यंतचा कालावधी हा पितरांचा होय. मध्यान्हात पितरांना भोजन (अन्नपाणी) देण्यासाठीचा काळ म्हणजे, पक्ष पंधरवडा, म्हणजेच भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा कालावधी होय.

दरम्यान केवळ हिंदू धर्मशास्त्रातच असा अन्न, पाणी देण्याचा विचार मांडला आहे असे नाही, तर पारशी, ख्रिस्ती, मुस्लीम, जैन अशाही धर्मांमध्ये पितरांना अन्न, पाणी देण्याची प्रथा आहे.

कशी असते विधी ?

या विधीचा कोणताही नियम अगदी कट्टर नियम नाही. तुमच्या वेळेप्रमाणे आणि यथाशक्तीअनुसार हे केलं जातं. पण जर आपण विधी-विधान किंवा पुरातन मान्यतांबाबत बोलायचं झाल्यास जसं सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण लागल्यावर कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. तसंच पितृ पक्षांमध्येही कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. उदा. लग्न, घर खरेदी किंवा वाहन खरेदी इ. श्राद्ध हे दुपारच्या 12 वाजताच्या आसपास करणं योग्य मानलं जातं. एखाद्या नदी किनारी किंवा आपल्या घरीसुद्धा हे करता येतं.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.