आज्जीचा बटवा : गवती चहा आहे खूप गुणकारी, ‘या’ आजारांवर ठरतो उपयोगी

0

आपल्यातील खुप कमी जणांना खासकरून शहरी लोकांना गवती चहाबद्दल माहीत असणे कठीण आहे. जे बागकाम करण्याची आवड ठेवतात आणि आपल्या छोट्याश्या बाल्कनीमध्ये मिनी फार्म तयार करतात. त्यांना गवती चहा हे नक्की माहिती असेल. ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या बागेत तुम्हाला गवती चहा ही औषधी वनस्पती सापडेल. गवती चहाचे भरपूर फायदे आहेत. ही औषधी वनस्पती सहजासहजी सापडते म्हणून आजीच्या बटव्यामध्ये आज आम्ही गवती चहासोबत तुमची ओळख करून देणार आहोत. अरे नक्की नक्की गवती चहाचे गुणदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर करूयात एक छोटासा परिचय गवती चहा या औषधी वनस्पतीबरोबर….

आपल्यातील अनेकांची सकाळ ही एक कप चहा घेतल्याशिवाय होऊच शकत नाही. चहा अतिला प्रमाणात घेतल्यास त्याचा त्रास होतो. मात्र दररोज एक ते दोन कप चहा घेण्यास काहीच हरकत नाही. उलट जर मसाला चहा अथवा गवती चहा नियमित घेतला तर तो शरीरासाठी फायदेशीरच ठरतो. पावसाळ्यात गवती चहा मोठ्या प्रमाणावर उगवतो. त्यामुळे पावसाळा ते हिवाळा गवती चहा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो, ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. घराच्या बाल्कनीतही तुम्ही गवती चहाचं रोप लावू शकता. गवती चहाला पातीचा चहा असे देखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो.

चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे विविध फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात गवती चहाचे आरोग्यासाठी फायदे…

  • पोट दुखत असल्यास किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा.
  •  थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.
  • जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा.
  • डोकं दुखत असल्यास साध्या चहाच्या पाण्यात चार पानं गवती चहाची घालावीत.
  • शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.
  • आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्यामोठ्या तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे.
  • घाम येऊन तापाचा कमी होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे.
  • गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात.
  • तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते.
  • गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणाऱ्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते.
  • कॉलरा झाल्यास गवती चहा त्यावर प्रतिबंध आहे.
  • अजीर्णामुळे पोट दुखत असेल तर गवती चहाच्या तेलाचे दोन थेंब बत्ताशावर टाकून खायला द्यावे. यामुळे पोटदुखी थांबते.
  • एखाद्या व्यक्तीस उलट्या, जुलाब होत असतील तर त्या व्यक्तीने गवती चहाचे सेवन करावे. यामुळे उलट्या, जुलाब थांबण्यास मदत होते.
  • गवती चहाच्या वाफेने दररोज शेक घेतल्याने भरपूर घाम जाऊन चरबी जळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
  • गवती चहा, पुदिना, दालचिनी, आलं समप्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा करावा. हा काढा अर्धा कप प्रमाणात रोज रात्री प्यावा आणि ऊबदार कपडे, पांघरुण घेऊन झोपावे. यामुळे जुनाट सर्दी पडसे कमी होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.