मुली लग्नासाठी बरीच तयारी करतात जसे की, चांगले पार्लर बुक करणे, सौंदर्य-संबंधित उपचार करणे, त्वचेसाठी अनेक घरगुती उपचार करणे.पण या सर्वांखेरीज आरोग्याशी संबंधित काही चेकअप्स करणे महत्त्वाचे आहे, हे कुणाच्याही सहजासहजी लक्षात येत नाही. तुम्ही रुग्णालयात बहुतेक नवीन लग्न झालेले जोडपे बघत असणार, जास्तकरून आरोग्यासंबंधित महिलांना जास्त समस्या असतात. “म्हणून लग्नानंतर तुमच्या ‘आहों’चे तुमच्यावर होणारे खर्च कमी करायचे आहेत तर हा लेख नक्की वाचा. गम्मत ओ..गम्मत”. पण वधूच्या भावी आयुष्यात आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून बॉडी चेकअप्स करणे नक्कीच गरजेचे आहे. चला तर जाणून घ्या, लग्नापूर्वी वधूने कोणती आरोग्य तपासण्या केल्या पाहिजेत-
ब्लड काउंट टेस्ट
लग्नाआधी कम्पलीट ब्लड काउंट टेस्ट केली पाहिजे. कंप्लीट ब्लड काउंट (CBC) रक्तातील पेशींचा प्रकार आणि त्यातील लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्स याविषयी माहिती देतो. सीबीसी अहवालात अशक्तपणा, थकवा यासारख्या लक्षणांची तपासणी करण्यात मदत होते. या चाचणीमुळे अनेक विकारांचे निदान लागण्यात मदत मिळते. म्हणूनच, ही चाचणी घेणे फार महत्वाचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही समस्या उद्भवू नये.
थायराइड हार्मोन प्रोफाइल
थायरॉईड ग्रंथीमधून टी 4 सह अनेक हार्मोन्स निघतात. यास संयुक्तपणे थायरॉईड हार्मोन्स म्हणतात. हे हार्मोन्स शरीरात कार्य करतात आणि शारीरिक विकास, शरीराचे तापमान आणि चयापचय (चयापचय) यावर परिणाम करतात. लग्नाआधी ही चाचणी आवश्यक आहे कारण लग्नानंतर बरेच हार्मोनल बदल होतात ज्याचा परिणाम गर्भधारणेवरही होऊ शकतो.
लिपिड प्रोफाइल टेस्ट
लिपिड प्रोफाइल टेस्ट अंतर्गत उच्च घनता द्रव कोलेस्ट्रॉल, कमी घनता कोलेस्ट्रॉल,अत्यंत कमी घनता कोलेस्ट्रॉल आणि ट्राय ग्लिसराइडची टेस्ट केली जाते. तसे, ही तपासणी दरवर्षी नियमितपणे केली पाहिजे. परंतु जर कुटुंबात उच्च रक्तदाबाचा कोणताही इतिहास असेल तर लग्नापूर्वी या चाचण्या करा.
ब्लड शुगर टेस्ट
रक्तातील साखरेची पातळी माहिती करण्यासाठी तपासणी आवश्यक आहे. आपल्याला मधुमेह आहे की नाही हे या चाचणीतून माहिती होते. विशेषत: जर तुमच्या कुटुंबातील किंवा पालकांपैकी एखादा मधुमेहग्रस्त व्यक्ती असेल तर ही चाचणी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तर लग्नाआधी चाचणी करा.
ब्लड प्रेशर टेस्ट
ब्लड प्रेशर टेस्ट हा आपला रक्तदाब खूप जास्त किंवा कमी आहे की नाही, हे तपासण्याचा एक सोपा मार्ग आहे. ही टेस्ट लग्नापूर्वी एकदाच केली जाणे आवश्यक आहे. कारण नवीन वधू नवीन वातावरणात गेल्यानंतर तिचा रक्तदाब कमी-जास्त झाला तर तिला अधिक त्रास सहन करावा लागतो.
बोन डेंसिटी टेस्ट
या चाचणीमध्ये ऑस्टिओपेनिया आणि ऑस्टिओपोरोसिस आढळतो. यामुळे हाडांबाबत माहिती मिळते. त्यामुळे जेणेकरून हाडांशी संबंधित कोणतीही समस्या टाळता येईल. लग्नानंतर मुली स्वतःकडे लक्ष देण्यास असमर्थ असतात आणि जर हाडे अशक्त असतील तर त्यांना आयुष्यभर समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून लग्नाआधी या चाचण्या करा म्हणजे भविष्यात समस्या टाळता येतील.
हे पण वाचा
नवीनचं ! रडल्याने होतो मोठा फायदा, कसे ते तुम्हीच वाचा…
मानव मेंदूचा किती टक्के वापर करतो ? यावर शास्त्रज्ञांचे दुमत, जाणून घ्या काय आहे तथ्य…
का स्टीव्ह जॉब्स आपल्या गाडीला नंबर प्लेट लावत नव्हते ? तरी US प्रशासनाने केली नाही कारवाई