हे माहित आहे का ? …म्हणून दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला वापरतात मोती साबण, असा आहे इतिहास

0

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सवांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक सण आणि उत्सव साजरा करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहे.

आता काही दिवसांवर दीपावली आली आहे. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी आणि मोती साबण हे जणू एक समीकरण तयार झाले.  उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली ही जाहिरात ऐकल्याशिवाय,पाहिल्याशिवाय दिवाळी आली असे वाटतच नाही.

आज आम्ही तुम्हाला याच मोती साबणाचा इतिहास आणि मोती साबण भारतात का प्रसिद्ध आहे. याविषयीची माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आत्तापर्यंत साबणांचे अनेक उत्पादने भारतीय व परदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेमध्ये आणली. त्यापैकी काही साबणांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला मात्र काही साबण काळाच्या प्रवाहात अक्षरशः दुकानांमध्ये दिसेनाशी झाली .स्पर्धेच्या या युगामध्ये एफएमसीजी उत्पादनांना एकमेकांशी टक्कर देण्यासाठी तितकेच सामर्थ्यशाली असे टँग लाईन व ब्रँड व्हॅल्यू घेऊन बाजारामध्ये उतरावे लागते.

उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली असे म्हणत घरातील व चाळीतील सर्व सदस्यांना उठवणारा तो छोटा मुलगा दिवाळीच्या अभ्यंग स्नानाची  व मोती साबण यांची ही जोडी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. मोती साबणाच्या या 2013 पासून पुन्हा एकदा टेलिव्हिजन आणि अन्य माध्यमांमध्ये जाहिरातींना विशेष असे महत्त्व आहे, कारण हा साबण अगदी बालपणापासून आपल्या दिवाळी सणाच्या आठवणी मध्ये जणू जपून ठेवलेल्या अत्तराच्या कूपी प्रमाणे नसानसामध्ये भिनला आहे. आज आपण या मोती साबणा विषयी काही तथ्य जाणून घेणार आहोत.

१). मोती साबण हा १९८० च्या दशकामध्ये निर्माण केला गेलेला साबण आहे. मोती साबणाचे सुरुवातीचे उत्पादन हे टॉमको म्हणजेच टाटा आँईल मिल्स  या कंपनीद्वारे केले जात असे.

२). टोमको या कंपनीने मोती साबणाची निर्मिती ही त्यावेळी बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या अन्य साबणांना  टक्कर देण्यासाठी एक लक्झरी ब्रँड म्हणून केली होती व यामुळेच या साबणाचा आकार हा गोल आकार होता जेव्हा अन्य साबणाचे आकार हे चौकोनाकृती होते. मोती साबण हा अन्य साबणांच्या तुलनेमध्ये वजनालाही जास्त होता व बाकीच्या साबणा सारखा चपटा नसून भरीव असा होता.

Moti Saban (1)

३). टोमको कंपनीने मोती या साबणाला लक्झरी ब्रँड म्हणून कायम लक्षात राहावे यासाठी त्याच्या किंमती कडेही विशेष लक्ष दिले होते व म्हणूनच अन्य साबणांच्या तुलनेमध्ये या साबणाची किंमत सुरुवातीच्या काळात सुद्धा जास्त होती.  मोती साबणाची सुरुवातीच्या काळातील किंमत प्रत्येक नगाला २५ रुपये इतकी होती.

४). मोती साबणाच्या शाही अंदाज हा प्रत्येक छोट्या छोट्या बाबी मधून प्रतीत करण्यासाठी या साबणाच्या निर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात आले होते .मोती साबण हा सुरुवातीला चंदन आणि गुलाब या फ्लेवर्स मध्ये उपलब्ध होता.

पूर्वीच्या काळी राण्या-महाराण्या या चंदन ,खस, गुलाब यासारख्या महाग घटकांना आपल्या अंघोळी मध्ये वापरत असत या तथ्याचा आधार घेऊन मोती साबणामध्ये या घटकांना समाविष्ट करण्यात आले होते.

५). मोती साबणाच्या स्पर्धेमध्ये बाजारपेठेत लक्स, डेटॉल यासारखे साबण त्यावेळी उपलब्ध होते. साबणाचे वेष्टन त्याच्या फ्लेवर नुसार केले जात असे. जसे की चंदनसाठी नारंगी रंगाचे वेष्टन तर गुलाबासाठी गुलाबी रंगाचे वेष्टन या साबणांना केले जात असे.१९९३ मध्ये टोमको कंपनी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड मध्ये विलीन झाली त्यामुळे आता हिंदुस्तान लिव्हर कडून मोती साबणाची निर्मिती करण्यास सुरूवात झाली.

Moti Saban 3

६). हिंदुस्तान लीवर लिमिटेड कंपनीने मोती साबणाचे उत्पादन सुरू केल्यानंतर हा साबण मुख्यत्वे कुठल्यातरी विशेष प्रसंगी सणावाराला वापरला जाण्यासाठीच आहे असे कुठेतरी ग्राहकांपर्यंत पोहोचले गेले  व विशेषतः दिवाळीच्या अभ्यंगस्नाना साठी मोती हा साबण वापरला जातो असे बिंबवले गेले कारण हिंदुस्तान लीवर लिमिटेड कंपनीच्या मोती साबणाच्या जाहिराती मध्ये एक स्त्री मॉडेल अत्यंत पारंपारिक अशा वेशभूषेचे मध्ये दाखवली गेली व या जाहिरातीमध्ये शुद्धता व पावित्र्य यावर मुख्यत्वे भर दिला गेला .

७). या अगोदर बाराही महिने बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या मोती साबण ला आता केवळ दिवाळीच्या अभ्यंगस्नाना साठी वापरल्या जाणा-या साबणाचे स्थान प्राप्त झाले.कंपनीने सुद्धा हा एक व्यवसायाला घातक ठरेल असा संदेश दूर करण्यासाठी कोणतेही मार्केटिंग नव्याने केले नाही व यामुळे कुठेतरी वेगाने निर्माण होणाऱ्या साबण व सौंदर्यप्रसाधनांच्या स्पर्धेमध्ये मोती साबण काहीसा मागे पडला.

 –  संकेत देशपांडे 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.