समलैंगिक नाही तरीही भारतात ‘या’ ठिकाणी मुलीचे मुलीशीच केले जाते लग्न, कारण वाचून व्हाल थक्क

0

भारत देश आपली संस्कृती आणि विचारांसाठी जगभर ओळखला जातो. परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की संस्कृतीबरोबरच भारत विविधतेने परिपूर्ण आहे. प्रत्येक धर्म आणि जातीचे लोक या देशात राहतात. आणि प्रत्येक जातीच्या काही भिन्न प्रकारच्या परंपरा आहेत. ज्या बर्‍याच काळापासून चालत आलेल्या आहेत. त्यामुळे भारतात धार्मिक स्वातंत्र्य असल्याचे दिसून येते.

भारतातील रीतीरिवाजांबद्दल बोलायचे झाल्यास आजही लोक अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. इच्छा असूनही लोक अशा गोष्टींपासून दूर राहू शकत नाहीत. जगात असे बरेच देश आहेत जे विचित्र रीतिरिवाजांमुळे ओळखले जातात. परंतु आज आम्ही आपल्याला आपल्या देशाच्या अशा काही परंपरांबद्दल सांगणार आहोत ज्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत ज्या वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

#भारतातील या ठिकाणी मुलीचे मुलीसोबतच होते लग्न

आजपर्यंत आपण पाहिले आणि ऐकले असेल की मुलगा थाटामाटात मुलीच्या घरी जाऊन मिरवणूक काढून मुलीला आपल्यासोबत घेऊन जातो. एकदा सर्व विघ्न पार करत मुलगी वधू बनून मुलाच्या घरी आली की लग्न सुखकर झाले असे मानले जाते. परंतु आपणास हे वाचून आश्चर्य वाटेल की गुजरातमधील आदिवासी गावात लग्नांमध्ये कोणताही वर म्हणजे नवरदेव नसतो. म्हणजे कोणताही मुलगा मिरवणूक काढत नाही.

गुजरातच्या छोटा उदयपूर जिल्ह्यात मुलीचा मुलाशी नव्हे तर मोठ्या उत्साहाने मुलीशी विवाह केला जातो. मुलीला घेण्यासाठी मुलगा जात नाही, उलट तो आपल्या घरात राहतो आणि वधूची वाट पाहतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की जर मुलगा मंडपात घोड्यावर बसून आला तर ते अशुभ मानले जाते. आणि त्याचे वैवाहिक जीवन असफल मानले जाते.
असे मानले जाते की, मंडपात घोड्यावर बसून येणाऱ्या नवरदेवाचा वंश वाढत नाही. खास गोष्ट अशी आहे की, वराऐवजी त्याची अविवाहित बहीण घोड्यावर बसून मुलीच्या घरी जाते आणि वधूशी लग्न करून मुलीला घेऊन नवरदेवाच्या घरी येते. वधूला घरी आणल्यावर बहिणीचे कार्य संपते. नवरदेवाच्या घरी आल्यानंतर वधू-वरांना संपूर्ण रीतीरिवाजाने पुन्हा लग्न करावे लागते. यात लग्नाच्या सर्व विधी पुन्हा केल्या जातात. यासह दोघे एकमेकांना हार घालतात. असे म्हटले जाते की असे प्रकारचे लग्न करण्यासाठी नवरदेवाची बहीण ही बिनलग्नाची असली पाहिजे. जर वराला कोणतीही बहीण नसेल तर चुलत बहीण किंवा मावस बहीण हा विधी करू शकतात.

#आगीवर चालणे

आपण चित्रपटात अशी अनेक दृश्ये पाहिली असतील. ज्यामध्ये प्रियकर किंवा प्रेमीका त्यांच्या प्रेमाची कसोटी देण्यासाठी आगीवर चालताना दिसतात. पण हे दृश्य केवळ चित्रपटांमध्येच चांगले दिसते. वास्तविक जीवनात, कोणीही असे कृत्य करणार नाही. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतातील राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये आगीवर चालण्याची प्रथा आहे.

तामिळनाडूमध्ये लोक आगीच्या निखारावर चालतात. हा सण तमिळनाडूमध्ये उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. हा उत्सव खूप मोठ्याने साजरा केला जातो. ज्यासाठी लोकांना अनेक दिवस अगोदर तयारी करावी लागत असते. तामिळनाडूसह महाराष्ट्रामध्ये ही असे प्रकार आढळून आलेले आहेत. ज्यामध्ये पेटलेल्या कोळश्यांवर लोक चालतात.

#काठीने एकमेकांना मारण्याचा उत्सव

आंध्र प्रदेश आपल्या मनोरंजक गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील देवरगट्टू मंदिरात बाणी नावाचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात लोक एकमेकांना काठीने मारतात. त्यामुळे या वेदनादायक उत्सवात बरेच लोक मरतात. असं असलं तरीही इथले लोक दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात.

#गायींच्या खाली झोपणे

भारतात दिवाळीचा सण जोरात साजरा केला जातो. मध्य प्रदेशात दिवाळीनंतर दुसर्‍या दिवशी गोवावर्धन पूजनावेळी एक विशेष प्रथेचे आयोजन केले जाते. या प्रथेमध्ये लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पाळणाऱ्या गायी व बैलांच्या खाली झोपतात. तिथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, या प्रथेमुळे गोमाता त्यांना आशीर्वाद देतात. जे त्यांच्या
आयुष्यातील सर्व त्रास दूर करते.

या प्रथेमध्ये बरेच लोक गायीखाली गंभीर जखमीही होतात. परंतु तरीही ते हा आशीर्वाद आहे असे मानतात आणि ही प्रथा आनंदाने पूर्ण करतात. मध्य प्रदेशात बर्‍याच वर्षांपासून ही प्रथा पाळली जात आहे. तसेच या प्रथेचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक या जत्रेत जमतात.

#सुयांनी शरीराला बिळे पाडणे

ही प्रथा वेदनादायक असणार हे याच्या नावावरून आपण ओळखलंच असेल. भगवान मुर्गन यांच्या भक्तीसाठी हा वेदनादायक उत्सव तामिळनाडू जिल्ह्यात साजरे केले जातात. या प्रेथेमध्ये लोकांचे शरीर सुईने टोचले जाते. जे लोकांच्या शरीरासाठी बर्‍यापैकी कठीण आणि वेदनादायक आहे. सुया व्यतिरिक्त, लोकांच्या शरीरावर भाल्यांनी छिद्र केले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की असे केल्याने त्यांचे सर्व त्रास आणि वेदना दूर होतील. भगवान मुर्गनसुद्धा त्यांच्याशी प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद नेहमीच त्यांच्यावर ठेवतील म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.