भारतात चवीने खाल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांना परदेशात आहे बंदी, कारण वाचून तुम्हीही हसाल…

0

प्रत्येक देशाचे स्वतःचे वेगवेगळे कायदे असतात. बर्‍याच देशांमध्ये असे कायदेशीर नियम आहेत जे वाचून आपल्याला हसू येते. भारतात खाण्यापिण्यासंबंधी कोणतेही नियम नाहीत, आपण जेव्हा आणि जे आवडेल खाऊ पिऊ शकतो. परंतु आपण भारतात मोठ्या उत्साहाने खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींवर बर्‍याच देशांमध्ये बंदी आहे. कोणत्या देशात कोणत्या खाद्यपदार्थावर बंदी आहे ते आज जाणून घेऊया…

समोसा

Samosa

समोसा हा भारतीय लोकांचा सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे. समोसा हे नाव ऐकून तोंडाला पाणी येते. परंतु मुस्लिम देश सोमालियामध्ये समोस्यावर बंदी आहे. समोसा हा त्रिकोणी असतो म्हणून जेहादी दहशतवादी संघटनेने यावर बंदी घातली होती. कारण तेथे त्रिकोणाचे आकार ख्रिस्ती धर्माचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या पदार्थावर बंदी आहे.

च्यूइंगम

chewing gum

भारतात च्युइंगम खाणे ही सामान्य गोष्ट आहे, आपणास लहान मुलापासून वृद्धावस्थेपर्यंत च्युइंगम खाणारे दिसतील. परंतु सिंगापूरमध्ये आपण च्युइंगम खाऊ शकत नाही, तेथे च्युइंगम बॅन आहे. 1992 मध्ये एका व्यक्तीने सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या वाहनावर च्युइंगम चिकटवले होते. यामुळे बरेच तास सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला होता.
च्युइंगम बंदीचे आणखी एक कारण आहे. सरकारचे म्हणणे आहे की लोक च्युइंगम चघळतात आणि रस्त्यावर थुंकतात. त्यामुळे ते लोकांचा चपलांना चिकटते त्यामुळे रस्ते खराब होतात म्हणून सिंगापूरमध्ये च्युइंगमवर बंदी आहे.

टोमॅटो कॅचअप

टोमॅटो कॅचअप

फ्रान्स आपल्या खाद्यपदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे. टोमॅटो कॅचअपसह फ्रेंच फ्राई खाण्याची खुप मजा येते. परंतु फ्रान्सची प्रसिद्ध फ्रेंच डिश तेथे कॅचअपसह खाऊ शकत नाही. फक्त फ्रेंच फ्राईजच नाहीत, तर कॅचअप सोबत तिथे काहीही खाल्ले जात नाही, कारण फ्रान्समध्ये कॅचअपवर बंदी आहे. वास्तविक २०११ मध्ये सरकारने कॅचअप खूप मसालेदार असल्याचे सांगून त्यावर बंदी घातली आहे.

किंडर जॉय

Kinder Joy

किंडर जॉयची भारतातली जाहिरात पाहिल्यावर लहान मुले पालकांकडून किंडर जॉय खाण्याचा आग्रह करतात. ही भारतातील मुलांची आवडती चॉकलेट आहे. परंतु किंडर जॉय अमेरिकेत बॅन आहे. अमेरिकन सरकार मुलांच्या खाद्यपदार्थांबाबत खूप सावध आहे. तेथील सरकारचा प्लास्टिकला तीव्र विरोध आहे. आणि किंडर जॉय हे चॉकलेट प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेले असते म्हणून तेथे यावर बंदी आहे.

दुग्धजन्य पदार्थ

Milk Made

कॅनडा आणि यूएसएच्या काही राज्यांमध्ये मलई दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर निर्बंध आहेत, कारण या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात जंतू आढळले आहेत. या अन्नाचे सेवन केल्याने विषबाधा होऊ शकते म्हणून यावर बंदी आहे.

मॅक्रोनी

Macaroni

मॅक्रोनी आणि चीज नॉर्वे आणि ऑस्ट्रियामध्ये त्यांच्या रंगामुळे बॅन आहेत. कारण या रंगाचे खाद्य मुलांसाठी चांगले मानले जात नाही. आश्चर्य म्हणजे केवळ मॅकरोनी आणि चीजच नाही तर या रंगाच्या सर्व खाद्यपदार्थांवरही बंदी घातली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.