लाईफस्टाईल : बर्याच भारतीयांना आपल्या मोकळ्या वेळेत झोपायला आवडते, असे एका अभ्यासातून हे समोर आले आहे. भारतातील हे पहिले सर्वेक्षण आहे, ज्यात भारतीय सामान्यत: आपले दिवस कसे घालवतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला.
ग्रामीण आणि शहरी भागात लोक किती वेळ घालवतात हे शोधून काढणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. सर्व्हेच्या निकालापासून, विविध विभाग आणि मंत्रालयांना धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळणे अपेक्षित होते.
जानेवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) द्वारा हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात दोन्ही भागातील 138,799 घरांवर 5,947 गावे आणि 3,998 शहरी गट आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांची गावे वगळता संपूर्ण देशात हा सर्व्हे करण्यात आला. या सर्वेक्षणात लोक पगारच्या आणि बिना पगाराच्या कामासाठी किती वेळ देतात असे दोन विभाग केले होते.
सर्वेक्षणानुसार, प्रत्येक भारतीय सरासरी 552 मिनिटे किंवा 9.2 तास निवांत वेळ घालवतात. ग्रामीण भागात पुरुष हे काम नसताना सरासरी 554 मिनिटे झोपायची तर महिला वर्ग थोडा जास्त वेळ (557 मिनिटे) झोप घेत असल्याचं समोर आले. त्याच वेळी हे प्रमाण खेड्यांपेक्षा शहरांमध्ये कमी आढळले. शहरांमध्ये पुरुषांनी मोकळ्या वेळेत 534 मिनिटे घालविली तर महिलांनी 552 मिनिटे झोपेत वेळ घालवला.
हे पण वाचा