ट्रिंग… ट्रिंग…! Hello… कोण बोलतंय ? असे म्हणतच आपण अनेकदा आपला फोन अटेंड करतो. सध्याच्या स्मार्टफोनच्या जमान्यात कोणी कॉल केला आहे. हे आपल्याला आधीचं समजते. मात्र तरीही आपण फोन घेत Hello म्हणतचं सुरवात करतो. नेमकं आपण फोन उचलल्यावर Helloचं का बरंं म्हणत असू ? नेमका हा शब्द आला कुठून याबाबत आपण कधी विचार केलायं का ? मला वाटत हा प्रश्न खूपच कमी जणांना पडला असेल. काळानुसार आणि परंपरेने चालत आलेल्या शब्दाची उकल कशाला करायची ? सगळे असेच बोलतात म्हणून आपणही याचे अनुकरण करत आलो. तर आज आम्ही या लेखात ‘Hello’ शब्द आला कुठून आणि फोनवर बोलताना तोच शब्द का बर ? वापरात याची माहिती देणार आहोत.
Hello या शब्दाची कहाणी मोठी रंजक आहे. मुळात म्हणजे हा शब्द अतिशय उर्मट असल्याचं मानलं जायचं. हॅलो हा खरं तर बर्यापैकी नवीन शब्द आहे. ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार, हा शब्द 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वापरण्यात आला असावा. इतर स्रोतांच्या माहितीनुसार हा शब्द 1827मध्ये प्रथम वापरला गेला.
खरंं तर ब्रिटीश भाषेच्या Hullo या मूळ शब्दापासून Hello या शब्दाची निर्मिती झाली आहे. सुरवातीच्या काळात एखाद्याला अभिवादन करण्यासाठी Hullo या शब्दाचा वापर केला जाई.
Hello शब्दाचा इतिहास हा अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या टेलिफोनचा शोध लागण्या आधीचा आहे. मात्र जेव्हा Hello हा शब्द काही प्रमाणत वापरात येऊ लागला. त्याचवेळी बेल यांच्या टेलिफोनचा अविष्कार झाला.
जेव्हा बेल टेलिफोनवर बोलत असत तेव्हा ते सुरवातीला Ahoy…! असे म्हणत असत. मात्र त्यावेळी Hello हा शब्द फोनवर बोलतना वापरला जात नसे. मुळात म्हणजे Hello या शब्दाचा उपयोग एखाद्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी केला जात असे. किंवा एखाद्या नवीन माणसाचा समूहात परिचय करून देण्यासाठी Hello हा शब्द वापरून समूहाचे लक्ष वेधून घेतले जात असे.
आजही माईक चेक करणारा Hello…एक दोन तीन..! अस म्हणाला तरी आपले लक्ष नकळत त्या आवाजाच्या दिशेने वेधले जाते.
मात्र या शब्दाचा अनपेक्षितरित्या वापर फोनवर बोलताना थॉमस अलवा एडिसन यांनी केला. एडिसन एकदा फोनवर बोलत असताना त्यांना पलीकडून हुलो (Hullo) असा आवाज आला. त्यानंतर उत्तरादाखल बोलताना एडिसन यांनी त्याला हॅलो म्हणत प्रतिसाद दिला. त्यानंतर फोनवर हॅलो बोलण्यास सुरवात झाली.
सुरवातीला एडिसन यांच्या या Hello शब्दाला सभ्य ब्रिटिशांनी आणि समाजाने मान्यता दिली नाही. त्यामुळे अनेकजण फोनवर बोलतना सुरवातीला गुड मोर्निंग, गुड इव्हेनिंग, गुड आफ्टरनून असे म्हणत असत.
Hello शब्दाला सभ्य समाजात मान्यता न मिळण्याचे कारण असे होते की, हा शब्द काहीसा असभ्य वाटत असे. त्यामुळे अनेकांनी या शब्दाला सुरवातीला वापरण्यास परवानगी दिली नाही.
सुरवातीला टेलीफोन ही एक ओपन लाईन होती. याचा अर्थ असा की फोन नेहमीच कनेक्ट असायचे. म्हणजे फोन उचालायचा आणि बोलणे सुरु करायचे. त्यामुळे नेहमीच कनेक्ट असणाऱ्या या लाईनवर एखाद्याचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी Hello हा शब्द वापरण्यात यावा असे मत एडिसन यांचे होते. कालांतराने एडिसन यांचे हेच मत सर्वांना पटले असावे आणि सर्वांनी हाच शब्द प्रचलित केला आणि अल्पावधीतच या Hello शब्दला जगात लोकप्रियता मिळाली. hello एक असा शब्द आहे. जो जगात कोणत्याही देशात फोन उचलल्यावर बोलला जातो. बोली भाषा कोणतीही असली तरी hello हा शब्द मात्र सर्वत्र समान आहे.
या Helloबाबत काही अफवा देखील पसरल्या आहेत. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या गर्लफ्रेंडचे नाव हॅलो असे होते. त्यामुळेबेल यांनी बनवलेल्या पहिल्या टेलिफोनवरून ते त्यांच्या गर्लफ्रेंडशी बोलताना सुरवातीला तीच हॅलो असे नाव घेत असत. त्यामुळे फोनवर बोलताना हॅलो हा शब्द वापरला जाऊ लागला असे बरेचजण सांगतात. खरंं तर जेव्हा फोनचा शोध लागला तेव्हा बेल यांचे लग्न झाले होते. ते हॅलो नावाच्या कोणत्याचं मैत्रिणीशी बोलत नव्हते. त्यामुळे ही एक अफवा आहे. तर अशी आहे या Helloची कथा…
हे पण वाचा
भारतात तर सोन्याच्या खाणीचं नव्हत्या, मग का म्हणायचे भारताला ‘सोने की चिडीया’? घ्या जाणून
अॅॅसिड पडल्याचं निमित्त झालं आणि बेल यांच्या टेलीफोनचा अनपेक्षितरीत्या शोध लागला