fbpx

कोणत्याही पूजेसाठी नारळ आणि सुपारी का वापरली जाते, जाणून घ्या महत्व

0

नारळ या फळाला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. तसेच नारळ श्रीफळ असेही म्हटले जाते. हे फळ खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात पूजा करताना नारळ व सुपारीचा उपयोग बर्‍याचदा केला जातो. इतकेच नाही तर आपण नवीन वाहन विकत घेतले किंवा नवीन घरात प्रवेश केला तरीही सर्व प्रथम आपण केवळ नारळ फोडतो. कोणत्याही शुभ कार्यात नारळ फोडणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच, सुपारीचेही पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे. या लेखामध्ये आज आम्ही तुम्हाला नारळ आणि सुपारी पूजेसाठी का वापरली जाते याविषयी माहिती सांगणार आहोत.

प्रथम नारळाबद्दल बोलूया. असे म्हणतात की, नारळ आपल्या यशाचा मार्ग तयार करते. बराच वेळ काम होत नसेल तर पूजेमध्ये नारळ वापरतात. जो नारळ पूजामध्ये वापरता त्या नारळाला लाल कपड्यात गुंडाळा. आपल्याला पाहिजे असलेली इच्छा व्यक्त करीत वाहत्या पाण्यात नारळ फेकून द्या अशाने रखडलेली कार्ये पूर्ण होतील.

हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये नारळाला फार महत्त्व आहे. पूजेसाठी पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर बाजूंनी आंब्याची पाने लावून मधोमध नारळ उभा ठेवतात. शुभकार्यात पाहुणे मंडळींना नारळ देण्याची पद्धत आहे. तसेच इमारतीच्या पायाभरणीप्रसंगी आणि देवदेवतांसमोर नारळ फोडतात व खोबरे प्रसाद म्हणून वाटतात.

पूजेच्या वेळी सुपारी ही गणेशाचे प्रतीक आणि नारळ हा माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ठेवले जाते. नारळ व सुपारी पूजेमध्ये ठेवल्यास हे काम कोणत्याही अडचणीशिवाय होते. असेही म्हटले जाते की जर सुपारीची पूजा केली जात असेल तर त्याचा चमत्कारिक परिणाम होतो. यामुळे धनाची कमतरता उद्भवत नाही. या व्यतिरिक्त असेही म्हटले जाते की जनयुमध्ये सुपारी गुंडाळली गेली आणि त्याची पूजा केली तर त्यातून आनंद व समृध्दी निर्माण होते. तसेच जनयुमध्ये सुपारी गुंडाळून तिजोरीत ठेवणे हे शुभ मानले जाते.

असेही मानले जाते की, सुपारी ही गणपती च रूप मानलं जात. गणपतीची पूजा सर्व देवांच्या अगोदर आणी चांगल्या मुहूर्तावर किंवा एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्या अगोदर केली जाते. गणपती ची मूर्ती सहजासहजी कुठेही उपलब्ध नसते. त्यामुळे सुपारीची गणपती म्हणून पूजा करतात.

(टीप – या लेखातील कोणत्याही माहितीची आम्ही हमी देत नाही. ही माहिती हिंदू धर्मातील विविध माध्यमांद्वारे / ज्योतिषी / पंचांग / प्रवचन / विश्वास / शास्त्रवचनांकडून संकलित करुन तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.)

Leave A Reply

Your email address will not be published.